Five Percent Relaxation In Marks CTET TET Exam
Five Percent Relaxation In Marks CTET TET Exam
Five Percent Relaxation In Percentage of Qualifying Marks In TET CTET Exam
शिक्षक पात्रता परीक्षेत पात्रता गुणांच्या टक्केवारीत किंवा पात्रता गुणांमध्ये ५ टक्के सूट
TET CTET परीक्षेतील पात्रता गुणांच्या टक्केवारीत पाच टक्के सूट
इयत्ता १ ली ते ८ वी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरीता केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेत पात्रता गुणांच्या टक्केवारीत किंवा पात्रता गुणांमध्ये अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती-ब,भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, इतर मागास प्रवर्ग,विशेष मागास प्रवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक,दिव्यांग उमेदवार, इतर प्रवर्गाच्या, उमेदवारांसाठी ५ टक्के सूट देण्यात आली आहे
5 % Relaxation In TET CTET Exam
For the posts of primary and upper primary teachers of classes 1st to 8th, 5 % (Five) percent relaxation has been given in the percentage of qualifying marks or qualifying marks in the Central Teacher Eligibility Test (CTET ) And Teacher Eligibility Test (TET) conducted by the Central Government and the State Government or by the agency authorized by them for candidates belonging to Scheduled Castes, (SC)Scheduled Tribes,(ST) Deemed Castes, Nomadic Tribes-B,(NTB) Nomadic Tribes-C, (NTC)Nomadic Tribes-D,(NTD) Other Backward Classes, (OBC) Special Backward Classes, (SBC) Socially and Educationally Backward Classes, (SEBC) Economically Weaker Sections of Open Category,(EWS) Divyang Candidates, (PWD),Persons with Disabilities,Handicap, Other Categories.
शिक्षक पात्रता परीक्षेकरीता
शिक्षक पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दालन क्र. ४३९, चौथा मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मुंबई
क्रमांक : संकीर्ण २०२३/प्र.क्र. १५१/टिएनटि-१,
दिनांकः ०९ जून, २०२३.
विषय: – शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ मधील परिच्छेद क्र.३
संदर्भात स्पष्टता आणणेबाबत.
संदर्भ:
१. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र.३९७/टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९२.
शासन अधिसूचना, असाधारण क्र.४०९, दि.२६.११.२०१९
महोदय,
शासन निर्णय, दिनांक ०७.०२.२०१९ अन्वये राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. यामधील परिच्छेद क्र. ३ अन्वये, इयत्ता १ ली ते ८ वी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरीता अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती/भटक्या जमाती-ब/भटक्या जमाती-क/ भटक्या जमाती-ड/ इतर मागास प्रवर्ग/विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग / खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये ५ टक्के सूट देण्यात आली आहे.
तथापि, शासन निर्णय दिनांक ७.२.२०१९ मधील परिच्छेद ३ मध्ये केंद्रशासन व राज्यशासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने CTET उत्तीर्ण आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांतील (EWS) उमेदवारांना सदर परीक्षेतील गुणांमध्ये ५ % सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे यासंदर्भात विविध संघटनांची व लोकप्रतिनिधीची निवेदने प्राप्त होत आहेत.
Also Read –
Fifteen Percent Marks Concession InTET CRET Exam
याअनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन व राज्य शासन आयोजित अथवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमधील सूट
याबाबतची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मध्ये नमूद आहे.
तसेच संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ मध्ये देखील याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या करण्यात आली आहे.
०३. यास्तव स्पष्ट करण्यात येते की, सदर शासन निर्णयातील परिच्छेद ३ येथील पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेकरीता लागू आहे.
आपला,
(म.मि.काळे) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रति,
१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे