ePPO eGPO eCPO Pension Approval Order Available In Digilocker निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश अंशराशीकरण प्रदान आदेश डिजी लॉकर सुविधेमध्ये उपलब्ध

ePPO eGPO eCPO Pension Approval Order Available In Digilocker

ePPO eGPO eCPO Pension Approval Order Available In Digilocker

Regarding making pension payment orders, gratuity payment orders, installment payment orders (e-PPO, e-GPO, e-CPO) available to pensioners in the DigiLocker facility

निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान आदेश, उपदान प्रदान आदेश, अंशराशीकरण प्रदान आदेश (e-PPO, e-GPO, e-CPO) DigiLocker सुविधेमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत.

दिनांक : ०३ ऑक्टोबर, २०२५.

वाचा: १. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण/२०२२/प्र.क्र.८२/कोषा प्रशा-५. दि. २४.०८.२०२३.

२. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.३४/२०२४/कोषा प्रशा-५, दि. २२.०५.२०२४.

प्रस्तावना:-

3) निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन प्रकरण मंजूरी, प्रथम प्रदान व तद्नंतर नियमित मासिक प्रदानांच्या अनुषंगाने निवृत्तीवेतन प्रदान आदेश (Pension Payment Order), उपदान प्रदान आदेश (Gratuity Payment Order), अंशराशीकरण प्रदान आदेश (Commutation Pension Payment Order) है अत्यंत महत्त्वाचे शासकीय आधारभूत अभिलेख आहेत. या दस्तऐवजाच्या आधारे निवृत्तीवेतन व इतर निवृत्तीवेतन विषयक लाभ प्राप्त होतात.

e-PPO, e-GPO, e-CPO प्रणाली संदर्भात सूधारित सूचना…..

आ) यापूर्वी महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर निवृत्तीवेतन प्रदान आदेश मुद्रित स्वरूपात, कागदावर कोषागार कार्यालयास व निवृत्तीवेतनधारक यांना टपालाने व यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी कार्यालय, मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयास टपालाने किंवा हस्त बटवड्धाने पाठविण्यात येत असत. परंतु अनेकदा सदर अभिलेख / आदेश हरवणे, खराब होणे किंवा व्यवस्थित जतन न करणे, निवृत्तीवेतनधारक व कोषागार कार्यालयास निवृत्तीवेतन प्रदान आदेश उशीराने प्राप्त होणे, पडताळणी प्रक्रियेत होणारा विलंब, या अडचणी दूर करून व शासकीय कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार शासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने उपरोक्त वाचा मधील शासन निर्णयर्यान्वये e-PPO, e-GPO, e-CPO कार्यप्रणाली सुरू करण्यात आलेली आहे.

डिजीलॉकर खाते कसे तयार करावे?
How to Create a DigiLocker Account?

5) भारत सरकारने “Digital India” या उपक्रमांतर्गत DigiLocker ही सेवा सुरू केली असून त्यान्वये नागरिकांना त्यांचे शासकीय दस्तऐवज / अभिलेख सुरक्षित व डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतात. महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा अंतर्गत निवृत्तीवेतन विषयक लाभ प्रदान करण्याच्या प्रयोजनार्थ महालेखापाल कार्यालयांकडून मंजूर करण्यात आलेले व अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना अग्रेषित करण्यात आलेले e-PPO, e-GPO, e-CPO प्रदान आदेश Digil.ocker सोबत संलग्न (Linked) करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

      शासन निर्णय

१. महालेखापाल कार्यालय (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई व नागपूर यांचेकडून यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना उपरोक्त वाचामधील शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेल्या दिनांकांपासून निर्गमित करण्यात आलेल्या व कोषागार कार्यालयामार्फत रक्कम प्रदान करण्यात आलेल्या सर्व प्रकरणी; तसेच भविष्यात मंजूर करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्तीवेतन प्रकरणी निवृत्तीवेतन प्रदान आदेश, उपदान प्रदान आदेश, अंशराशीकरण प्रदान आदेश (e-PPO, e-GPO, e-CPO) DigiLocker सेवेशी दि.०६.१०.२०२५ पासून संलग्न (Linked) करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. निवृत्तीवेतनवाहिनी ही प्रणाली निवृत्तीवेतनधारकांसाठी त्याच्या निवृत्तीवेतन प्रक्रियेच्या सुरूवातीपासून ते निवृत्तीवेतन प्रदान करण्यापर्यंत ‘एकल खिडकी आज्ञावली’ असून निवृत्तीवेतनधारकांना त्याचे DigiLocker खाते निवृत्तीवेतनवाहिनी प्रणालीसोबत संलग्न (Linked) करण्याचा आणि e-PPO, e-GPO, e-CPO सहजतेने डिजिटल स्वरूपात मिळवण्याचा पर्याय याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

३. संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि महालेखापाल कार्यालय (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई व नागपूर यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेल्या अनुक्रमे निवृत्तीवेतनवाहिनी आणि e-PPO, e-GPO, e-CPO प्रणाली या DigiLocker सेवेशी संलग्न (Linked) केल्यामुळे, निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या वैयक्तिक DigiLocker लॉगीनमध्ये निवृत्तीवेतन प्रदान आदेश, उपदान प्रदान आदेश, अंशराशीकरण प्रदान आदेश (e-PPO), e-GPO, e-CPO) अधिक सुलभतेने आणि तत्परतेने उपलब्ध होतील.

४. e-PPO, e-GPO, e-CPO प्रदान आदेश Digilocker मध्ये उपलब्ध होण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी अनुसरावयाची कार्यपध्दती सोबतच्या “परिशिष्ट-१ मध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१००३१४५३०१९३०५ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

 शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

शासनाचे उप सचिव

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७१/कोषा प्रशा-५, मंत्रालय, मुंबई

ePPO eGPO eCPO Pension Approval Order Available In Digilocker
ePPO eGPO eCPO Pension Approval Order Available In Digilocker

Leave a Comment

error: Content is protected !!