शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धा Energy Conservation Painting Competition For Students

Energy Conservation Painting Competition For Students

Energy Conservation Painting Competition For Students

Painting competition based on energy conservation for students

Urja Sanvardhan Chitrakala Spardha

Regarding organizing a painting competition based on energy conservation for school students

    विषय :- शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत

संदर्भ :- मा. ओम प्रकाश बकोरिया, भा.प्र.से, महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांचे पत्र क्रमांक इसीएन/२०२५-२६/सीआर-३४/१९८ दिनांक ३०.०९.२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संदर्भीय पत्रान्वये ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते. ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेने वापर, ऊर्जा बचत व अपारंपरिक ऊर्जेव्दारे वीज निर्मिती केल्यास कार्बन उर्सजनास प्रतिबंध होऊन जागतिक तापमान वाढ कमी करणे शक्य आहे. या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी (गट-अ) व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी (गट-ब) असे गट करुन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. असे संचालनालयास कळविण्यात आलेले आहे. (सोबत संदर्भीय पत्रासोबत परिपत्रकाची प्रत जोडली आहे.)

राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन : प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून

त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना संदर्भीय पत्रातील बाबी निदर्शनास आणून शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धेमध्ये शाळेला सहभागी होणेसाठी आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

परिपत्रक लिंक

Energy Conservation Painting Competition For Students
Energy Conservation Painting Competition For Students

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य,पुणे

क्र. शिसं/संकीर्ण/२०२५-२६/अ-२/विद्याशाखा / 5010

महत्वाचे /कालमर्यादित/ई-मेल व्दारे
दि.१६/१०/२०२५
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व,
३) शिक्षणाधिकारी बृन्हमुंबई.
४) शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
५) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (सर्व).

विषय शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत.
संदर्भ ऊर्जा दक्षता ब्यूरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचे दि.२२ सप्टेंबर, २०२५ रोजीचे पत्र.

महोदय,
ऊर्जा दक्षता ब्यूरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत दरवर्षी National Painting Competition on Energy Conservation या स्पर्धेचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते. ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेने वापर, ऊर्जा बचत व अपारंपरिक ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केल्यास कार्बन उत्स॑जनास प्रतिबंध होऊन जागतिक तापमान वाढ कमी करणे शक्य आहे. या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी (गट-अ) व इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (गट-ब) असे गट करुन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या अनुषंगाने राज्यातून जास्तीत जास्त शाळांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने विद्युत मंत्रालय यांचे “शालेय स्तरीय चित्रकला स्पर्धा – २०२५” साठीचे परिपत्रक सोबत जोडले आहे. सदर चित्रकला स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे विषय देण्यात आले आहेत –
अ. Save Energy, Save Earth (ऊर्जा वाचवा, पृथ्वी वाचवा)
ब. Be a Star – Use BEE Star Appliances (स्टार मानांकन असणाऱ्या उपकरणांचा वापर करा)
सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शाळेला

या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच गट-अ व गट-ब करीता शालेय स्तरावर दोन तासाची चित्रकला स्पर्धा आयोजित करुन प्रत्येक गटातील दोन उत्कृष्ट चित्र दि.३१ ऑक्टोबर, २०२५ पूर्वी राज्याच्या नोडल ऑफिसरला पाठविण्यात यावीत. त्याचप्रमाणे सर्व स्पर्धकांची यादी संकेतस्थळावर अपलोड करावयाची आहे. त्यानुसार नोडल ऑफिसरमार्फत दि.१४ ते २५ नोव्हेंबर, २०२५ दरम्यान मुंबई येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिक देण्यात येणार आहे

अ.क्र. बक्षिस रक्कम (रु.)

१. प्रथम क्रमांक ५०,०००/-
२. द्वितीय क्रमांक ३०,०००/-
३. तृतीय क्रमांक २०,०००/-
४. उत्तेजनार्थ (दहा पारितोषिके) ७,५००/-

तसेच राज्यस्तरीय विजेत्यांना दि.११ डिसेंबर, २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित “राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये” भाग घेण्याची संधी मिळणार आहे. सदर स्पर्धेतील विजेत्यांना दि.१४ डिसेंबर, २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मा.राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते पारितोषिक मिळणे नियोजित आहे. राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे –

    अ.क्र. बक्षिस रक्कम (रु.)

१. प्रथम क्रमांक १,००,०००/- + लॅपटॉप + गोल्ड मेडल
२. द्वितीय क्रमांक ५०,०००/- लॅपटॉप + सिल्व्हर मेडल
३. तृतीय क्रमांक ३०,०००/- + लॅपटॉप + ब्रांझ मेडल
४. उत्तेजनार्थ (दहा पारितोषिके) १५,०००/-+ टॅबलेट

त्याचप्रमाणे राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना व त्यांचे पालकांना जानेवारी, २०२६ मध्ये गुजरात येथे पर्यटनास ऊर्जा दक्षता ब्युरो, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत पाठविण्यास येणार आहे.
तरी या अनुषंगाने आपणास विनंती की, उपरोक्त चित्रकला स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शाळांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने शाळांना आपलेमार्फत सूचित करावे. सदर स्पर्धेबाबतची सर्व माहिती

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर स्पर्धेसाठीच्या नोडल ऑफिसरचा पत्ता खालीलप्रमाणे आहे –

आयोजकांचा संपर्कासाठीचा पत्ता:-

श्री. अप्रित पराशर, व्यवस्थापक (एच. आर) (एनटीपीसी-डब्ल्यूआर-१एचक्यू) समृध्दी व्हेंचर पार्क, २ रा मजला, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३. दूरध्वनी क्र. ०२२-२८३१०२१३ मोबाईल क्र. ७५४२९०९१४८ फॅक्स क्र. ०२२-२८२५९३३१
सोबत – वरीलप्रमाणे.
आपला स्नेहांकित,

महासंचालक,.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महाराष्ट्र शासनाची संस्था
महासंचालक

इसीएन/२०२५-२६/सीआर-३४/१९८
दि. ३० सप्टेंबर, २०२५
प्रति,
शिक्षण आयुक्त, पहिला मजला, सेंट्रल बिल्डिंग, डॉ. अॅनी बेझंट रोड, आगरकर नगर, पुणे – ४११००१.

Energy Conservation Painting Competition For Students
Energy Conservation Painting Competition For Students

Leave a Comment

error: Content is protected !!