Eco Club for Mission Life Manch
Eco Club for Mission Life Manch
Eco Club for Mission Life Forum establishment
Eco Club for Mission Life Manch for Students
Regarding the effective implementation of environmental activities at the school level by establishing the Eco Club for Mission Life platform.
Regarding the establishment of an Eco Club for Mission LiFE platform to develop an environmentally friendly and conservation-sensitive approach among students and the community through school education, and to effectively implement environmental activities at the school level.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/इको क्लब/२/२०२५-२६/3945
दि. 26/12/2025
विषय : निसर्गाला अनुकूल व पर्यावरणविषयक संवर्धन संवेदनशीलतेचा दृष्टीकोन शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यामध्ये व समूदायामध्ये विकसित करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन करून पर्यावरण विषयक उपक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत.
संदर्भ :
१) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको/२/२०२४-२५/१४४५,
दि. २२/०५/२०२५
२) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इकोक्लब (Plant४mother)/२ /२०२४-२५/१७७१, दि. २४/०६/२०२५
३) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको
(Plant४mother)२/२०२४-२५/१९९५, दि. ०९/०७/२०२५
४) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको
(Plant mother)२/२०२४-२५/२२६४, दि. २५/०७/२०२५
५) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको
(Plant४mother)/२/२०२४-२५/२२९१, दि. २८/०७/२०२५
६) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको
(Plant४mother)२/२०२४-२५/२३६७, दि. ०१/०८/२०२५
७) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२ २०२४-२५/२८४८, दि. २३/०९/२०२५
८) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२ २०२४-२५/३०५०, दि. ०९/१०/२०२५
९) केंद्रशासनामार्फत आयोजित V.C. दिनांक १६/१२/२०२५
१०) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२ २०२४-२५/३८४३, दि. १८/१२/२०२५
National-Level Webinar on World Environment Day
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, केंद्र शासनाने इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरण
विषयक उपक्रम राबविण्यासाठी १००% सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इको क्लब स्थापन करून
त्याबाबतची माहिती
http://ecoclubs.education.gov.in
या पोर्टलवर अपलोड करणेवावत संदर्भिय पत्रांन्वये आपणांस कळविण्यात आले होते.
प्रत्येक शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच दि. २५/०७/२०२५ पर्यंत स्थापन करणे व इको क्लब स्थापन केल्याचे विहित नमुन्यातील अधिसूचना इको क्लब फॉर मिशन लाईफ अपलोड करणेबाबत विस्तृत पणे मार्गदर्शक सूचना या कार्यालयाच्या संदर्भ पत्र क्र. १ अन्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत.
तथापि, इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवरील
http://ecoclubs.education.gov.in
प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांनी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन केल्याबाबतची माहिती कमी प्रमाणात पोर्टलवर अपलोड केली असल्याचे दिसून येत आहे.
सदर वस्तुस्थिती जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना नियमित Whatsapp Group शेअर करण्यात येते. इको क्लब फॉर मिशन जागतिक पर्यावरणीय उपक्रम २०२५-२६ पोर्टलवरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता इको क्लब स्थापनेची दि. १४/१२/२०२५ रोजी टक्केवारी ६२.६५% इतकी होती व आज रोजी दि. २४/१२/२०२५ रोजी टक्केवारी ६३.३०% इतकी आहे. शाळांमध्ये १००% इको क्लब मंच स्थापन करणेबाबतची कार्यवाही दि. २९/१२/२०२५ पर्यंत पूर्ण करणेबाबत आपल्या स्तरावरून निर्देश देणेवावत संदर्भ १० अन्वये कळविण्यात आले होते.
सोबत (Annexure -१ ) मध्ये जिल्हानिहाय वस्तुस्थिती दर्शविण्यात आलेली आहे. विशेषतः पुणे, लातूर, नागपूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, सोलापूर, धुळे, सांगली, छत्रपती संभाजीनगर या जिल्हयांतील ५०% पेक्षा कमी शाळांमध्ये अद्यापही इको क्लब मंच स्थापन केलेले दिसून येत नाही. तरी उपरोक्त जिल्हयांनी ५०% पेक्षा कमी शाळांमध्ये अद्यापही इको क्लब मंच स्थापन करणेबाबतची कार्यवाही का केलेली नाही. याबाबतची कारणे उपरोक्त जिल्हयांकडून अद्यापही प्राप्त झालेली नाहीत.
सोबत (Annexure – १) मध्ये जिल्हानिहाय वस्तुस्थिती देण्यात आलेली आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये १००% इको क्लब मंच स्थापन करणेबाबत कार्यवाही दि. ३१/१२/२०२५ रोजीपर्यंत करणेबाबत सर्व जिल्हयांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. इको क्लब फॉर मिशन लाईफबाबतचे उद्दिष्टे पूर्ण होईल, असे पाहावे.
राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.
