राज्यातील सर्व शाळांमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानाला गती देण्यासाठी निपुण अध्ययनस्तरांना संलग्न असलेले खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरील ई-साहित्य उपलब्ध करून देणे बाबत E Material Available On Khan Academy Platform For NIPUN

E Material Available On Khan Academy Platform For NIPUN

E Material Available On Khan Academy Platform For NIPUN MAHARASHTRA

E Material Available On Khan Academy Platform For NIPUN MAHARASHTRA

E-materials on Nipun Khan Academy platform available in all schools

Regarding making available e-material on the Khan Academy platform related to the Nipun study levels to accelerate the Nipun Maharashtra Mission in all schools in the state.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

राज्यातील सर्व शाळांमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानाला गती देण्यासाठी निपुण अध्ययनस्तरांना संलग्न असलेले खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरील ई-साहित्य उपलब्ध करून देणे बाबत..

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे

जा.क्र./प्राशिसं/संकीर्ण/२०२५

दिनांक : 29,जानेवारी, 2026

प्रति,

  1. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
  2. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
  3. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), (सर्व)
  4. प्रशासन अधिकारी (मनपा) (सर्व)

विषय : राज्यातील सर्व शाळांमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानाला गती देण्यासाठी निपुण अध्ययनस्तरांना संलग्न असलेले खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरील ई-साहित्य उपलब्ध करून देणे बाबत..

संदर्भ: १) शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२१/प्र.क्र. १७९/एसडी-६, दिनांक 5 मार्च, 2025

२) महाराष्ट्र शासन व खान अकॅडमी यांच्यामध्ये करण्यात आलेला सामंजस्य करार दि. 30 जुलै, 2025

भारत सरकारने निपुण भारत (NIPUN- National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्ता 2 री पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यानुषंगाने इयत्ता 2 री ते ५ वी च्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केल्या नाहीत, त्यानांही त्या प्राप्त करण्याची उचित संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे म्हणून राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे.

सदर अभियानांतर्गत अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सराव साहित्य उपलब्ध करून देणे नियोजित आहे. या अनुषंगाने निपुण महाराष्ट्र अभियानाला अधिक गती देण्यासाठी डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरील निपुण अध्ययन स्तरांना संलग्न असलेले प्लॅटफॉर्मवरील निवडक ई-साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यामध्ये इ २ री तसेच इ ३ री ते ५ वी साठी संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयात नमूद गणित विषयासाठी अध्ययन स्तरनिहाय व्हिडीओ व स्वाध्याय यांचे मॅपींग करून दिलेले आहे.

https://docs.google.com/spreadsheets/d/12ql1bckVK-4ca5mCxz6In2lvDRAEt3ACR7IfjIkTQm4/edit?usp=drive_link

संदर्भ क्र 1 अन्वये, निपुण लक्ष्यांच्या संबंधित अध्ययनरतरांना संलग्न ई-साहित्य (व्हिडिओ आणि स्वाध्याय) शिक्षकांना वरील लिंकवर आणि QR Code च्या माध्यमाने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिक्षकांनी अध्ययन स्तरनिहाय मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेत तयारी करून घ्यावी तसेच विद्यार्थ्यांना उपरोक्त लिंक पाठवून घरी संबंधित व्हिडीओ पाहण्यासाठी आणि सराव प्रश्न सोडवण्यासाठी सूचना द्याव्यात.

त्याच बरोबर, संदर्भ क्र. 2 अन्वये, महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये गणित आणि विज्ञान विषयाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबविण्याबाबत खान अकॅडमी इंडिया यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर शिक्षकांना राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी भाषेमध्ये राज्याच्या अभ्यासक्रमाशी संलग्न असलेले पुढील साहित्य उपलब्ध आहे.

डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबविण्याबाबत अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

इयत्ता 1 ली ते 10 वी साठी गणित विषय,

इयत्ता 6 वी ते 10 वी साठी विज्ञान विषय.

इयत्ता 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषय. सद्यस्थिती, सदर कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील जवळपास 32 हजार शाळा, 72 हजार शिक्षक आणि 11 लाख विद्यार्थी प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत आहेत. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध साहित्याचा अध्ययन अध्यापनासाठी वापर करण्यासाठी शिक्षकांनी पुढील प्रक्रिया करावी,

शिक्षकांसाठी प्रक्रियाः

१. खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर शिक्षक खाते बनवणे..

https://mr.khanacademy.org

२. खात्यामध्ये योग्य शाळा निवडणे.

३. प्लॅटफॉर्मवर वर्ग तयार करणे आणि संबंधित अभ्यासक्रम निवडणे.

४. विद्यार्थी जोडणे (विद्यार्थी युझरनेम आणि पासवर्ड तयार करणे).

५. विद्यार्थ्यांना संबंधित इयत्तेचे साहित्य सरावासाठी देणे.

क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी यांनी निपुण महाराष्ट्र अभियान कार्यक्रमाची उद्दिष्टये साध्य करण्यासाठी अध्ययन स्तरनिहाय साहित्य (व्हिडिओ आणि स्वाध्याय) यांचा वापर करणेबाबत सर्व शिक्षकांना सूचना द्याव्यात. तसेच गणित व विज्ञान बाबत दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खान अकॅडमी प्लॅटफॉर्मचा वापर करणेबाबत सूचित करावे.

 परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक 

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे-1.

प्रत : माहितीस्तव सादर.

  1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
  2. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
  3. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
  4. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
  5. सिनिअर प्रोग्राम लीड, खान अकॅडमी
E Material Available On Khan Academy Platform For NIPUN
राज्यातील सर्व शाळांमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानाला गती देण्यासाठी निपुण अध्ययनस्तरांना संलग्न असलेले खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरील ई-साहित्य उपलब्ध करून देणे बाबत E Material Available On Khan Academy Platform For NIPUN

Leave a Comment

error: Content is protected !!