Declaration Of Revised Nakshal Affected Areas In State Of Maharashtra महाराष्ट्र राज्यातील सुधारित नक्षलग्रस्त भाग घोषित

Declaration Of Revised Nakshal Affected Areas In State Of Maharashtra

IMG 20250627 171151 1
Declaration Of Revised Nakshal Affected Areas In State Of Maharashtra

Declaration Of Revised Nakshal Affected Areas In State Of Maharashtra

Regarding declaration of revised Naxal affected areas in the state of Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील सुधारित नक्षलग्रस्त भाग घोषित करण्याबाबत.

दिनांक : २७ जून, २०२५.

वाचा :-

१) शासन निर्णय क्र. एनएएक्स- २००४/प्र.क्र. ४८/विशा-१ब, दि. ७/१२/२००४.

२) शासन निर्णय क्र. एनएएक्स- २००५/प्र.क्र. १४/विशा-१ब, दि. २०/५/२००५.

३) शासन निर्णय क्र. एनएएक्स- ०९१२/प्र.क्र. ३६९/विशा-१ब, दि. ४/२/२०१३.

४) शासन निर्णय क्र. एनएएक्स ०९१२/प्र.क्र. ३६९/विशा-१ब, दि. ५/४/२०१३.

५) शासन निर्णय क्र. एनएएक्स ०९१२/प्र.क्र. ३६९/विशा-१ब, दि. २६/१२/२०१४.

६) शासन निर्णय क्र. एनएएक्स ०९१२/प्र.क्र. ३६९/विशा-१ब, दि. १८/२/२०१५.

७) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. पोमंस/२१ अ/१९५/नक्षलग्रस्त भाग/१५८/२००७, दि. २९/०६/२०२२.

प्रस्तावना-

राज्यातील काही भागांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्याने शासन निर्णय दि. ७/१२/२००४ व दि. २०/५/२००५ अन्वये राज्यातील जिल्हे, तालुके, गावे नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र आढाव्याअंती सदर दोन्ही शासन निर्णय उपरोक्त दि. ४/२/२०१३ च्या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करुन नव्याने नक्षलग्रस्त जिल्हे व तालुके घोषित करण्यात आले होते. तदनंतर सदर शासन निर्णयास दि. ५/४/२०१३ च्या शासन निर्णयान्वये पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिलेली होती. त्यानंतर दि. २६/१२/२०१४ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हे, तालुके, गावे नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली होती. तथापि, सदर शासन निर्णयास उपरोक्त दि. १८/२/२०१५ च्या शासन निर्णयान्वये पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिलेली आहे.

राज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक लाभाच्या व बिगर आर्थिक लाभाच्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत. या सवलतीमध्ये कालानुरुप बदल करुन शासन निर्णय दि. ७/१२/२००४ व दि. २०/५/२००५ अन्वये घोषित केलेले नक्षलग्रस्त भाग विचारात घेऊन सुधारित सवलतीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मंत्रीमंडळ मान्यतेसाठी दि. ५/११/२०२१ च्या मंत्रीमंडळ बैठकीत सादर केला होता. सदर बैठकीत केंद्र शासनाच्या नक्षलग्रस्त भागाच्या यादीनुसार तपासणी करुन नक्षलग्रस्त भागाचा फेरविचार करण्याच्या सूचना मंत्रीमंडळातील काही सन्माननीय सदस्यांनी दिल्या असल्याने त्यास अनुसरुन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करणे बाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. त्याचा सर्वकष विचार करून पुढीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय क्रमांकः एनएएक्स-१२२०/प्र.क्र.२५३/वि.शा.१ब

      शासन निर्णय

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सादर केलेल्या अहवालानुसार तसेच राज्यातील नक्षलवाद्यांच्या कारवायांची सध्याची परिस्थिती पाहता दि. ७/१२/२००४ व दि. २०/५/२००५ रोजीचे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील खालीलप्रमाणे जिल्हा/तालुके नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात येत आहेत.

अ.क्र.जिल्हा जिल्ह्यातील तालुके
१. गडचिरोली – संपूर्ण जिल्हा

२. गोंदिया – गाँदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगांव

२. वर नमूद केलेल्या नक्षलग्रस्त जिल्हा/तालुक्यांच्या तसेच राज्यातील इतर भागाच्या नक्षलग्रस्ततेसंदर्भात आवश्यकतेनुसार आढावा घेऊन त्यात बदल करण्यासंदर्भातील प्रस्ताव पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी शासनाकडे पाठवावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६२७१४३५०६०७२९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक- एनएएक्स-१२२०/प्र.क्र. २५३/वि.शा.१ब, मंत्रालय, मुंबई-३२.

IMG 20250627 162053
Declaration Of Revised Nakshal Affected Areas In State Of Maharashtra

Leave a Comment

error: Content is protected !!