Creation of Ayushman cards for govt semi govt employees and families
Creation of Ayushman cards for govt semi govt employees and families
Preparation of Ayushman Cards for Government and Semi-Government Employees and Families
Creation of 100% Ayushman cards for government and semi-government employees and their families
Creation of Hundred Percent Ayushman cards for government and semi-government employees and their families
PM-JAY
MUPJAY
महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) (एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना)
Regarding providing medical expenses benefits under the Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana to teachers/non-teaching staff of 100 percent subsidized private schools in the state.
Creation of Ayushman cards for govt semi govt employees and families
क्र. शिसंमा/२०२६/टि-७/आभा कार्ड/ 6893
दिनांक : २२/०५/२०२६.
विषय- राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) कार्ड काढणेबाबत.
संदर्भ : १. शासन पत्र क्रमांक वैखप्र-१६२५/ (१४९/२५)/ टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.
२. प्रस्तूत कार्यालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६/टि-७/आयुष्यमान /६१५७ दिनांक ०५/०३/२०२६.
उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचात्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली होती.
तथापि, याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचायांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून सर्वांना अवगत करण्यात यावे असे कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपध्दती तसेच व्हिडीयो लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे.
यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रु ५.०० लाखापर्यंतचे वैदयकीय प्रतिपूर्तीचे देयक स्विकारले जाणार नाही
(डॉ. एकनाथ आंबोकर) शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत माहितीस्तव सविनय सादर
मा. आयुक्त (शिक्षण), म. रा. पुणे
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत,पुणे
आबा (ABHA – आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड हे तुमच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी एक १४ अंकी ओळखपत्र आहे. तुम्ही हे कार्ड ऑनलाइन (मोबाईल/कॉम्प्युटर) किंवा ऑफलाइन (रुग्णालय/CSC केंद्र) अत्यंत सोप्या पद्धतीने मोफत काढू शकता.
असे बनवा आयुष्यमान कार्ड अगदी सहज सोपे त्यासाठी ओळीला स्पर्श करा
Ayushman BHARAT Health Account CARD CREATE & DOWNLOAD LINK
https://abha.abdm.gov.in/abha/v3/register/aadhaar
https://abha.abdm.gov.in/abha/v3/register/driving-licence
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियाः
अधिकृत संकेतस्थळः नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या ABHA नोंदणी पोर्टलवर जा.
Create ABHA Number: मुख्य पानावर ‘Create ABHA Number’ हा पर्याय निवडा,
आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सः नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करा.
ओटीपी पडताळणीः तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP (One Time Password) टाका,
आभा सअॅड्रेस (ABHA Address) तयार कराः तुमचे नाव किंवा पसंतीचा युझरनेम टाका,
कार्ड डाउनलोडः यशस्वी नोंदणीनंतर तुमचे १४ अंकी आभा कार्ड स्क्रीनवर दिसेल, ते तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
ऑफलाइन नोंदणी प्रक्रियाः
जर तुमच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेट नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सन्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊ शकता, तिथे तुमचे आधार कार्ड आणि ओळखपत्र दाखवून संबंधित कर्मचारी तुम्हाला आभा कार्ड तयार करून देतील.
टीप: हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य नसले, तरीही ते असल्यास नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी होते.

Creation of Ayushman cards for govt semi govt employees and families
————- ALSO READ 👇 —————
क्र.शिसंमा/२०२५-२६/टि-७/आयुष्यमान / 6157
दिनांक :- 05/०३/२०२६.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, संबंधित सर्व.
३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/ दक्षिण/पश्चिम) मुंबई.
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) संबंधित सर्व.
विषय- राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली वैद्यकीय खर्चाचे लाभ देणेबाबत.
संदर्भ : १. शासन पत्र क्रमांक: वैखप्र-१६२५/(१४९/२५)/ टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.
उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचान्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली आहे.
तथापि, याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
त्याअनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून अवगत करावे
(डॉ. सुचिना पाटेकर)
शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत,पुणे
पत माहितीस्तव सविनय सादर
मा. आयुक्त (शिक्षण), म. रा. पुणे


ALSO READ –
क्र. राआहसो/प्रजआयो/वकास/१०८४९/२०१५/२०२५
दिनांक :- १०/११/२०२५
विषयः शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण करणे
संदर्भ-
१. मा. सचिव २ सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र क्र. PHD/३७/२०२५-MJPJAY/AB-PMJAY
दि. १३.०८.२०२५
२. जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदूर्ग यांचे पत्र क्र जिशचिसि / MJPJAY/आ.का/१५०९४-९७/२०२५-२६ दि. ३०.१०.२०२५
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचा-यांच्या कार्ड निर्माणाकरीता सुचना देण्यात आल्या अहेत. त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये 5 लक्ष प्रती कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत. यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्मान कार्ड Beneficiary Login मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
असे बनवा आयुष्यमान कार्ड अगदी सहज सोपे त्यासाठी ओळीला स्पर्श करा
२. वरिल सूचनानुसार दि. १६ ऑगस्ट २०२५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत.
३. आता संदर्भ २ च्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाजकल्याण कार्यालय इ. ठिकाणी शिबीरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे.
४. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यांत सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी (कंत्राटी कर्मचा-यांसह) यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सुचना निर्गमित कराव्यात. अशा कर्मचा-यांसाठी Beneficiary लॉगीनद्वारे कार्ड निर्माणाकरीता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्यमित्र यांच्या मदतीने शिबीरे आयोजीत करावीत व कार्ड निर्माणाचा अहवाल सोबात जोडलेल्या प्रपत १ मध्ये या कार्यालयास सादर करावा अशी विनंती आहे.
सोबत - प्रपत्र १ परिपत्रक पीडीएफ लिंक
मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी, महाराष्ट्र शासन
website www.jeevandayee.gov.in

