Creation of Ayushman cards for govt semi govt employees and families
Creation of Ayushman cards for govt semi govt employees and families
Preparation of Ayushman Cards for Government and Semi-Government Employees and Families
Creation of 100% Ayushman cards for government and semi-government employees and their families
Creation of Hundred Percent Ayushman cards for government and semi-government employees and their families
PM-JAY
MUPJAY
महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) (एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना)
क्र. राआहसो/प्रजआयो/वकास/१०८४९/२०१५/२०२५
दिनांक :- १०/११/२०२५
विषयः शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण करणे
संदर्भ-
१. मा. सचिव २ सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र क्र. PHD/३७/२०२५-MJPJAY/AB-PMJAY
दि. १३.०८.२०२५
२. जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदूर्ग यांचे पत्र क्र जिशचिसि / MJPJAY/आ.का/१५०९४-९७/२०२५-२६ दि. ३०.१०.२०२५
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचा-यांच्या कार्ड निर्माणाकरीता सुचना देण्यात आल्या अहेत. त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये 5 लक्ष प्रती कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत. यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्मान कार्ड Beneficiary Login मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
असे बनवा आयुष्यमान कार्ड अगदी सहज सोपे त्यासाठी ओळीला स्पर्श करा
२. वरिल सूचनानुसार दि. १६ ऑगस्ट २०२५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत.
३. आता संदर्भ २ च्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाजकल्याण कार्यालय इ. ठिकाणी शिबीरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे.
४. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यांत सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी (कंत्राटी कर्मचा-यांसह) यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सुचना निर्गमित कराव्यात. अशा कर्मचा-यांसाठी Beneficiary लॉगीनद्वारे कार्ड निर्माणाकरीता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्यमित्र यांच्या मदतीने शिबीरे आयोजीत करावीत व कार्ड निर्माणाचा अहवाल सोबात जोडलेल्या प्रपत १ मध्ये या कार्यालयास सादर करावा अशी विनंती आहे.
सोबत - प्रपत्र १ परिपत्रक पीडीएफ लिंक
मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी, महाराष्ट्र शासन
website www.jeevandayee.gov.in

