Compassionate Appointments FAQ
Compassionate Appointments FAQ
Questions and answers regarding compassionate appointment (FAQ)
Guidance on the challenges faced in implementing the comprehensive revised policy on compassionate appointments
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः अकंपा-१२२५/प्र.क्र.१९४/म.लो.आ., मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : २२ ऑगस्ट, २०२५
संदर्भ :-
१. शासन निर्णय क्र.अकंपा-१२२५/प्र.क्र.१२१/म.लो.आ., दि. १७ जुलै, २०२५
२. शासन परिपत्रक क्रमांक: अकंपा-१२२५/प्र.क्र.१२१/म.लो.आ., दि.१७ जुलै, २०२५
परिपत्रक
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण दि. १७ जुलै, २०२५ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले असून संदर्भाधीन क्र.२ येथील परिपत्रकान्वये अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने उपस्थित होणारे प्रश्न व त्यांची उत्तरे (FAQ) निर्गमित करण्यात आली आहेत.
शासन निर्णय क्र.अकंपा-१२२५/प्र.क्र.१२१/म.लो.आ., दि. १७ जुलै, २०२५ वाचा या ओळीला स्पर्श करून
सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार कार्यवाही करताना उद्भवणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत विविध नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. नियुक्ती प्राधिकाऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत उपस्थित केलेल्या मुद्ये व त्यावरील स्पष्टीकरण याबाबतचे परिशिष्ट-अ सोबत जोडण्यात आले आहे.
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०८२२१८१५३००००७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
सह सचिव, महाराष्ट्र शासन