Clean And Green School Rating
Clean And Green School Rating
Clean and Green School Assessment
Clean And Green School Rating Registration Link
Regarding the Clean and Green School Rating (SHVR) 2025-26 rating
Swachh harit Vidyalay Manankan mulyankan
Swachh harit Vidyalay Nondani Manankan mulyankan
Regarding the participation of all management schools in the Clean and Green School Assessment (SHVR) 2025-26 to promote behavioral change, cleanliness, hygiene habits and environmental protection through school education to maintain cleanliness, greenery and an all-inclusive and enjoyable school environment in schools on a regular basis
शालेय शिक्षण व क्रीडा विभा समग्र शिक्षा
निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/PM SHAI/१२/२०२५-२६/२५८१
दिनांक:- २२ ऑगस्ट, २०२५
प्रति,
१. आयुक्त, महानगरपालिका, सर्व
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
३. मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपरिषद (सर्व)
विषयः- शाळांमध्ये स्वच्छता, हिरवळ आणि सर्व समावेशक आनंददायक शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकनासाठी (SHVR) २०२५-२६ मध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभाग घेणेबाबत.
संदर्भ:-
१. केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No.३-३/२०२५,SHVR, दि.०५/०८/२०२५
२. केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.N०.३-३/२०२५, SHVR, दि.११/०८/२०२५
३. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंवप्रपम/विवि/SHVR/२०२५, दि.१९/०८/२०२५
आपणांस कळविताना खूप आनंद होत आहे की स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP- २०२० च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ जुलै २०२५ रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) २०२५ येथे मा. केंद्रीय शिक्षणमंत्री यांचेव्दारे उद्घाटन करण्यात आलेले आहे. स्वच्छ आणि हरित्त विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ हा उपक्रम पूर्वीच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार (SVP) च्या धर्तीवर व्यापक व सार्वत्रिकपणे सर्व शाळांमध्ये राबविण्यासाठी नव्याने विस्तार करण्यात आलेला आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना ६ घटकांवर आधारित ६० सूचक प्रश्नावल्यांवर निर्देशकानुसार व्यापक सर्वेक्षणाच्या आधारे शाळेच्या प्रगतीबाबत स्वयंमूल्यांकनाव्दारे शाळांना माहिती होईल आणि त्या प्रगतीच्या टप्यानुसार नियमित सुधार व शाश्वत विकास निरंतर सुरू राहील. स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ चे रचनात्मक मापदंड हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP-२०२० च्या दृष्टीक्षेपात आणि भारताच्या दृष्टीकोनानुसार स्वच्छता, हिरवळ आणि सर्व समावेशक शालेय वातावरण इत्यादिशी सुसंगत आहे. सदर उपक्रम संरचनात्मक संस्थात्मक चौकटीद्वारे शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान बदलाबाबतची लवचिकता इत्यादि बाबींवर उत्सफुर्तपणे अंमल करण्यास प्रोत्साहीत करतात.
२ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ बाबत भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाव्दारे शाळांमध्ये स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरण संरक्षण इत्यादि महत्त्वपूर्ण बाबींची सुलभ कार्यपध्दतीव्दारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP-२०२० ध्या दृष्टीक्षेपात घनिष्ठ स्वरूपात संबंधित आहे. ज्यामध्ये समग्र, समावेशीत आणि अनुभव आधारित शिक्षणाला प्रोत्साहीत करते. तसेच स्वास्थ्य, स्वच्छता आणि निरंतर शैक्षणिक प्रणाली एकीकृत करण्यास मदत करते.
३ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ च्या सुलभ अंमलबजावणीसाठी SHVR पोर्टल आणि मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे. परिणामी शाळांना डिजिटल कार्यपध्दतीव्दारे सुलभपणे सहभागी होता येईल, स्वयंमूल्यांकन आणि सनियंत्रण करण्यास मदत होईल अशा पध्दतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
४ सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा सहभाग अनिवार्यः स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ करिता देशातील सर्व शाळांनी सहभागी होणे अनिवार्य असून यामध्ये शासकीय, खाजगी अनुदानित, खाजगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या (केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेव्दारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांना सहभागी व्हावयाचे आहे.
५ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ साठी ६ प्रमुख घटकांवर मूल्यांकन करण्याकरिता ६० प्रश्नः स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ करिता पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या सहा प्रमुख विषयांवर आधारित बार्वीचे ६० प्रश्नांव्दारे स्वयं-मूल्यांकन करतील आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करावयाचे आहे.
९ शाळा, जिल्हा व राज्य स्तरावरील भागधारक घटक व त्यांची भूमिकाः-
९.१ शाळा स्तरावरील भागधारक घटक व त्यांची भूमिकाः मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी,
इको क्लब आणि बाल संसद, शाळा व्यवस्थापन समिती (SMC), शाळा विकास व्यवस्थापन समिती (SDMC), पंचायत/शहरी स्थानिक संस्था आणि समुदाय इत्यादि घटकांचा समावेश आहे. यांची भूमिका स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ बाबत जाणीव-जागृती करणे, सहभागी होण्याची कार्यपध्दती जाणून घेणे, प्रश्न समजून घेणे, अचूकपणाची खात्री करून घेणे, फोटो आणि वस्तूःस्थितीदर्शक माहिती उपलब्ध ठेवणे, वेळेत अर्ज सादर करणे, वस्तूःस्थिती नियोजन नियमित प्रगती आणि शाश्वत विकास टिकवून ठेवणे. उपरोक्त अंमलबजावणी दि.१/०८/२०२५ ते दि.३०/०९/२०२५ या कालावधीत शाळांनी ऑनलाईन अर्ज करणे.
९.२ जिल्हा स्तरावरील भागधारक घटकांची भूमिकाः जिल्हास्तरीय समिती, अध्यक्ष, जिल्हाधिकारी किंवा यांचे व्दारे (नियुक्त अधिकारी) आणि इतर सदस्य हे जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांमधून शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), तीन उत्कृष्ट शिक्षक, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग आणि सिव्हील सोसायटी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांमधून जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेले दोन प्रतिनिधी, जिल्हा नोडल अधिकारी आणि मूल्यांकन कर्ते इत्यादिंचा सहभाग राहील. यांची भूमिका स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ च्या अंमलबजावणीबाबत समन्वयन करणे, जिल्हास्तरीय समितीच्या बैठका, SHVR उद्देश व कार्यपध्दतीबाबत तालुका, केंद्र आणि शाळा यांचे सक्षमीकरण करणे, उपक्रमांना प्रोत्साहीत करणे, नियमित आढावा घेऊन १००% शाळांना सहभागी करून घेणे, नोंदविलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे मूल्यांकन करणे, मूल्यांकन कर्ते निवडणे, उद्बोधन आणि वेळेत प्रत्यक्ष पडताळणी करणे. कमिटीव्दारे शाळांची निवड अंतिम करणे, पात्र शाळांचे राज्य स्तरावर नामांकन करणे. शाळांची निवड करणेचा कालावधी दि.१/१०/२०२५ ते दि.३१/१०/२०२५ आहे. तसेच शाळांचे राज्य स्तरासाठी नामांकन करावयाचा दि.०७/११/२०२५ आहे.
९.३ जिल्हा स्तरावरील मूल्याकंन कर्त्यांची भूमिकाः जिल्हा स्तरीय मूल्यांकन कर्ते निवडीसाठी पुढीलप्रमाणे विभाग सूचविण्यात आलेले आहेत.
शासकीय अधिकारी (सार्वजनिक आरोग्य शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण
विभाग, ग्रामीण विभाग, वन विभाग. प्रशिक्षण संस्था आणि शैक्षणिक प्रशिक्षणार्थी मुख्य योजनेतंर्गत तज्ज्ञ जसे, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण/शहरी, मनेरेगा) इत्यादि शैक्षणिक आणि संशोधन संस्था सिव्हील सोसायटी संघटना, स्वयंसेवी संस्था, समुदाय आधारित संस्था/युवक मंडळे लोकप्रतिनिधी
१० राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) आणि शालेय शिक्षा आणि साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या समन्वयाने दि.१३/०८/२०२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ बाबत राज्य स्तरीय कार्यशाळेत प्रशिक्षण समन्वयक म्हणून प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, अधिव्याख्याता किंवा वरिष्ठ अधिव्याख्याता आणि नोडल अधिकारी म्हणून, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व आणि जिल्हा नोडल अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची नियुक्ती करून त्यांना स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ बाबत राज्य स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्र. क्षण परिषद, पुणे आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या समन्वयाने दि.२०/०८/२०२५ रोजी आयोजित कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
११ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVIR) २०२५-२६ अंतर्गत उपरोक्त उपक्रमांची क्षेत्रीय यंत्रणेव्दारे व शाळांव्दारे यशस्वी अंमलबजावणी करणेसाठी स्थानिक स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी (अधिव्याख्याता किंवा चरिष्ठ अधिव्याख्याता), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, जिल्हा नोडल अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी SHVR फ्रेमवर्क नुसार प्रत्येक टप्प्यांवरचे नियोजन, संबंधित तालुका नोडल अधिकारी, केंद्रस्तरीय नोडल अधिकारी आणि शाळा स्तरावरील भागधारक घटकांची भूमिका आणि जबाबदारीबाबत संकल्पना स्पष्ट होणेसाठी उद्बोधन प्रशिक्षण कार्यशाळाब्दारे क्षमता सक्षमीकरण करावे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संदर्भिय पत्र क्र. ३, दि. १९/०८/२०२५ रोजीच्या पत्रान्वये आपणांस प्रशिक्षण घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्याप्रमाणे कालमर्यादेत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी.
१२ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ साठी अनिवार्यपणे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी दि. ०४/०८/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधी दरम्यान मोबाईल अॅप किंवा वेब पोर्टलव्दारे आपल्या सोयीनुसार सहभागी व्हावे, स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ वेबसाइट 🌐 https://shvr.education.gov.in मध्ये Android आणि IOS मोबाइल अॅप्स डाउनलोड करण्यासाठी QR कोड देखील प्रदान केले आहेत, वेब पोर्टलव्दारे सहभागी होणाऱ्या शाळा होमपेजवर उपलब्ध असलेल्या लॉगिन/साइनअप पर्यायात्रा उपयोग करू शकतात.. याबाबत सुलभ संदर्भासाठी 🌐 https://shvr.education.gov.in/resources या लिंकवर SHVR मार्गदर्शक हस्तपुस्तिका (इंग्रजी व मराठी), वेब पोर्टलवर शाळांनी माहीती भरण्यासाठी मार्गदर्शक मॅन्यूअल (हिंदी व इंग्रजी) आणि अॅपवरून शाळांनी माहीती भरण्यासाठी मार्गदर्शक मॅन्यूअल (हिंदी व इंग्रजी) मध्ये उपलब्ध आहे. तसेच व्हिडीओज आणि PPT’s उपलब्ध असून त्यावरून सदर सामग्री डाऊनलोड करून घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल असे पाहावे. सदर साहीत्य आपणांस यापूर्वीही पाठविण्यात आलेले आहेत. सदर उपक्रम केंद्रशासनाचा महत्त्वकांक्षी व कालमर्यादित उपक्रम आहे. त्यानुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी दि. ३०/०९/२०२५ पूर्वी ऑनलाईन अॅप्लीकेशन सादर (सबमिट) करणे बंधनकारक आहे. त्यानंतर जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील छाननी करून अंतिम क्रमांक काढण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विहित कालमर्यादेत अंमलबजावणी करण्यात यावी.
१३ देशातील सुमारे २४.८० कोटी विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या १४,७५ लाख शाळासाठी पॉश आणि मिशन लाईफ डेटाबेस तयार करण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ महत्त्वपूर्ण ठरेल. है पोर्टल शाश्वत पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित निर्देशकांशी संबंधित माहिती संकलित करेल, ही एक सार्वत्रिक माहिती असेल ती इतर विभाग आणि मंत्रालयीन विभागांच्या विविध विश्लेषणासाठी एक उपलब्ध माहितीचा स्रोत म्हणून उपयोग करेल. या माहितीच्या आधारे विविध निर्देशकांवर जिल्हा /राज्य अहवाल कार्ड तयार केले जातील तर त्याच डॅशबोर्डवर जिल्ह्यांचे अहवाल कार्ड प्राप्त होतील.
१४ अपेक्षित फलनिष्पत्तीः
स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVA) २०२५-२६ साठी सर्व जिल्हा आणि महानगरपालिकांनी १००% शाळांचा सहभाग सुनिश्चित करणे.
सुलभ समन्वयर्यासाठी समन्वय यंत्रणा स्थापन करणे, सदर यंत्रणेव्दारे विहीत वेळेत नियोजन, प्रशिक्षण आणि मूल्यांकन करणे.
प्रत्येक स्तरावर क्षमता बांधणी करून विकेंद्रित नियोजनाला प्रोत्साहन देणे.
शालेय स्वच्छता आणि हरित शाळा करण्यासाठी नवोपक्रमांना प्रोत्साहीत करून स्वःची जाणीव करून शाश्वत विकासास प्रोत्साहन देणे.
समस्यानिवारण आणि मार्गदर्शनासाठी सक्रिय सहभाग घेणे.
१५ शालेय नेतृत्व प्रमुखांसाठी विशेष प्रोत्साहनः
संयुक्त शाळा अनुदानातंर्गत रू.१ लाख राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापकांच्या शाळांना स्वच्छता आणि हरित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी रु.१ लाखाचे प्रोत्साहन संयुक्त अनुदान म्हणून दिले जाईल.
तीन दिवसीय शैक्षणिक अनुमवात्मक कृति कार्यबाबत सहल निवडलेल्या शाळा प्रमुखांना आपल्या देशातील प्रमुख संस्थांना तीन दिवसांचा शैक्षणिक अनुभवात्मक भेट दिली जाईल. शाश्रुतता, विज्ञान आणि पर्यावरणीय शिक्षणात नाविन्यपूर्ण नेतृत्वाला प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश असेल.
१६ इको-क्लब आणि प्रमुख मोहिमाः
शाळांना पुढील गोष्टी करण्यास प्रोत्साहित करण्यात येईल.
इको क्लबचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी सक्षमीकरण करणे,
पुढील उपक्रमांचे नेतृत्व करणे: “एक पेड माँ के नाम माता आणि पृथ्वी मातेला समर्पित राष्ट्रव्यापी वृक्षारोपण मोहीसबाबत आपण अधिक माहिती या लिंकवरून जाणून घेऊ शकता:
🌐 https://usof.gov.in/en/ek-ped-man-ke-naam NCERT या संकल्पनेवर एक विशेष मॉडयूल
देखील विकसित केलेले आहे. याचे मोडयुल्स आपणांस पाठविण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी आपण
🌐 https://ncert.nic.in/specialmodules.php?in-en या लिंकवर पाहावे.
मिशन लाईफ मोहिनाः ऊर्जा बचत, प्लास्टिकमुक्त कॅम्पस, जलसंवर्धन इ.
१७ सुलभ मार्गदर्शनासाठी संपर्क करणे.
राज्ये/केंद्रशासित प्रदेश SHVR सेल, CIET-NCERT शी संपर्क साधू शकतात
📧 sher support@ciet.nic.in
📞 टोल फ्री क्रमांक ८८००-४४०-५५९
१८ त्यानुषंगाने जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणि तालुका व केंद्र स्तरावर स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन SHVR २०२५-२६ बाबत जाणीव जागृतीसाठी व्यापक प्रसार आणि प्रचार करणे आणि १००% शाळा सहभागी होतील याची खात्री करणे.
१९ स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ मध्ये सर्व शाळांना उत्सर्पूतपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे. परिणामी शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्वसमावेश आनंददायक शालेय वात्तावरण नियमित टिकवून ठेवण्यास शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्याच्या दिशेने मार्गक्रमण होईल.
(संजय यादव, मा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक
म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. मंत्री शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे खाजगी सचिव,
२. मा प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे स्वीय सहायक,
३. मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव-
१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुगे
२. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
३. शिक्षण संचालक, प्रत्थमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
६. शिक्षणाधिकारी, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व.
५. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्च.
७. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक), जिल्हा परिषद सर्व.
८. शिक्षण निरिक्षक उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग मुंबई,
९. प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी, महानगरपालिका सर्व.
१०, जिल्हा नोडल अधिकारी, इको क्लब फॉर मिशन जिल्हा परिषद व महानगरपालिका, सर्व
११. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व
१२. तालुका नोडल अधिकारी, पंचायत समिती, सर्व
Also Read 👇
स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र.राशैसंवप्रपम/विवि/ SHVR/२०२५/प्रति,
दि.१९/०८/२०२५.
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग),
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व जिल्हे
शिक्षणाधिकारी (प्राथ.) / (माध्य), (सर्व जिल्हे).
शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई.
शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी (सर्व म.न.पा./न.पा.)
विषय: स्वच्छ एवम हरित विद्यालय मानांकन (SHVR) २०२५-२६ च्या मानांकनाबाबत
संदर्भ :- दि.१३/०८/२०२५ रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रशिक्षणातील सूचना.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP- २०२० च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ जुलै २०२५ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या द्वारा स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ उपक्रमाची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या समन्वयाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
देशातील सर्व शाळांनी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ करिता सहभागी होणे अनिवार्य असून यामध्ये शासकीय, खाजगी अनुदानित, खाजगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या (केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेव्दारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांना पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या सहा प्रमुख विषयांवर आधारित बार्बीचे स्वयंमूल्यांकन करतील आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करावयाचे आहे.
१) पाणी
२) शौचालये
४) ऑपरेशन आणि देखभाल
५) वर्तन बदल आणि क्षमता बांधणी
या अनुषंगाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करावयाचे असून जिल्हास्तरावरून दोन जिल्हा नोडल अधिकारी (शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे) व एक प्रशिक्षण समन्वयक यांची नियुक्ती आपल्या मार्फत करण्यात आलेली आहे.
स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ अंतर्गत उपरोक्त उपक्रमांची क्षेत्रीय यंत्रणेव्दारे व शाळांव्दारे यशस्वी अंमलबजावणी करणेसाठी स्थानिक स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांनी SHVR आराखड्यानुसार प्रत्येक टप्यांवरचे नियोजन, संबधित भागधारक घटकांची भूमिका आणि जबाबदारी याबाबत उद्बोधन प्रशिक्षण कार्यशाळाव्दारे क्षमता बांधणी व उद्बोधन करावयाच्या उद्देशाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन, SHVR, २०२५-२६ च्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय यंत्रणेचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
Time: Aug 20, 2025 10:30 AM India
Join Zoom Meeting
https://ns06web.zoom.us/j/81950305867?pwd=41ebt2zvITs3gylSb98qIEfg8bZ4qe.1
Meeting ID: 819 5030 5867
Passcode: 547435
राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दि. २५/०८/२०२५ पर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण ऑनलाईन स्वरुपात आयोजित करून आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील १००% शाळांची नोंदणी दि. ३०/०९/२०२५ अखेर पूर्ण करावयाच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याने सर्व जिल्हा नोडल अधिकारी व प्रशिक्षण समन्वयक यांना उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे. तसेच कार्यवाहीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास आणि सादर करावा.
Wise School registration on SHVR Web Portal Link
स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६
Harit Vidyalaya Rating Clean and Green School Rating
District-Wise SHVR Progress Tracker Link
https://shvr.education.gov.in/progress
परिपत्रक पीडीएफ लिंक
(राहुल रेखावार भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे- ३०
प्रत माहितीस्तव सविनय सादर,
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे – ०१

Implementation of the Clean and Green School Evaluation (SHVR) 2025-26 initiative SCERT PUNE GUIDELINES