Class 9th History Political Swadhyay Gruhpath Second Term Exam

Class 9th History Political Swadhyay Gruhpath Second Term Exam

image 116
Class 9th History Political Swadhyay Gruhpath Second Term Exam

Class 9th History Political Swadhyay Gruhpath Second Term Exam

Class IX History Political Science Second Semester Self-study homework with Answers

                  इयत्ता नववी इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र अंतर्गत मूल्यमापन स्वाध्याय गृहपाठ उत्तरासह
    

१) संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
उत्तर :संविधानाने अल्पसंख्याकांना खालील प्रमाणे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले
i) भारतात विविध धर्मांचे, पंथांचे, संस्कृतींचे आणि विविध भाषिक लोक राहतात.
ii) यातील अल्पसंख्य समूहांना आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा, आपली भाषा विकसित करण्याचा हक्क असला पाहिजे.
iii) आपल्या शिक्षण संस्था स्थापन करता आल्या पाहिजेत.
यासाठीच संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.

इयत्ता ९ वी द्वितीय संत्रातच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

२) कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा :
उत्तर : सन १९८८ साली सुरू झालेल्या कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे सांगता येतील
i) या रेल्वेचा मार्ग ७६० किलोमीटर लांबीचा आणि चार राज्यांना जोडणारा आहे.
ii) या मार्गावर एकूण १२ बोगदे असून त्यातील करबुडे येथील ६.५ किलोमीटर लांबीचा सर्वांत मोठा बोगदा आहे
iii) या मार्गावर १७९ मोठे व १८१९ छोटे पूल असून शरावती नदीवरील बांधलेला २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत लांब आहे.
iv) रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा सर्वांत उंच पूल आहे.
v) दरडी कोसळणाऱ्या मार्गावर वेळीच धोका टाळण्यासाठी इंजिनामध्येच सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
iv) अशा विविध ठिकाणी प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा शासनाकडून आणि खाजगी व्यावसायिकांकडून करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भारतात पर्यटन उ‌द्योग वाढीला लागला आहे.

४) ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.
उत्तर : i) भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांमध्ये ग्रामीण भागाच्या विकासाला महत्त्व दिले होते.
ii) ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्याची खूपच वानवा होती. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असे.
iii) महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्र सरकारने ग्रामीण पाणी पुरवठा व लोकांचे आरोग्य या प्रश्नांकडे
लक्ष दिले
iv) ग्रामीण भागात विहिरी खणणे व नळांवाटे लोकांना पाणीपुरवठा करणे, या हेतूने शासनाकडून ‘ग्रामीण पाणीपुरवठा योजना’ सुरू करण्यात आली.

इयत्ता ९ वी इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र अंतर्गत मूल्यमापन उत्तरासह द्वितीय सत्र / स्वाध्याय गृहपाठ बहुपर्यायी चाचणी (MCQs)

५) संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहा.
उत्तर : संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे खालील प्रमाणे सांगता येतील
i) जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे.
ii) राष्ट्राराष्ट्रांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे.
iii) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.
iv) मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन

Leave a Comment

error: Content is protected !!