Class 9th 10th Revised Subject Evaluation
Class 9th 10th Revised Subject Evaluation
इयत्ता ९ वी व इ. १० वी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना.
Class 9th and 10th Subject Scheme and Revised Assessment Scheme
इयत्ता ९ वी व इ. १० वी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क. (२४३/१९)/एसडी-४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय (विस्तार), मुंबई-३२ दिनांक :- ०८ ऑगस्ट, २०१९.
संदर्भ- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. अभ्यास-२११८/प्र.क्र.२४३/एस.डी.४, दि.९ जुलै, २०१९.
प्रस्तावना-
इयत्ता ९ वी ते इ. १२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्याकरिता शासन निर्णय दि. ९ जुलै, २०१९ अन्वये शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन इ.९ वी व इ. १० वी करिता या शासन निर्णयान्वये सन २०१९-२० पासून विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय-
सन २०१९-२० पासून इ.९ वी व इ. १० करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
१) लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात येत आहे.
२) इ.९ वी व इ. १० करिता भाषा आणि सामाजिक शाखे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे राहील.
३) इ. १० वीची अंतिम परीक्षा (राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी) ही केवळ इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
४) अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत.
५) इ.९ वी व इ. १० वीच्या अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व घटकनिहाय गुणभार राज्य मंडळ स्तरावर संबंधित विषयांच्या अभ्यास समितीच्या/अभ्यास गटाच्या सहायाने निश्चित केले जाईल.
६) इ.९ वी व इ. १० मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.
७) राज्य मंडळाच्या प्रचलीत निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace Marks System) सुरू राहील तसेच शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या/सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सवलती अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरू राहतील.
८) इ.९ वी व इ. १० वी साठी विषय योजना, मूल्यमापन योजना व परीक्षेचा कालावधी याबद्दलचा तपशील सोबत दिल्याप्रमाणे आहे.
२. इ. ९ वी साठी विषयनिहाय मूल्यमापन योजना-
१) ‘ भाषा’ विषयांसाठी लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-
प्रथम सत्र
लेखी परीक्षा- ८० गुण
अंतर्गत मूल्यमापन- २० गुण
१) तोंडी परीक्षा- श्रवण कौशल्य-५ गुण भाषण कौशल्य – ५ गुण
२) स्वाध्याय- प्रत्येकी ५ गुणांचे २ स्वाध्याय घ्यावेत-१० गुण
द्वितीय सत्र
लेखी परीक्षा- ८० गुण
अंतर्गत मूल्यमापन- २० गुण
१) तोंडी परीक्षा- श्रवण कौशल्य-५ गुण भाषण कौशल्य – ५ गुण
२) स्वाध्याय- प्रत्येकी ५ गुणांचे २ स्वाध्याय घ्यावेत-१० गुण
तोंडी परीक्षेकरिता पुढील २ कौशल्ये निवडण्यात यावीत.
श्रवण कौशल्य- (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)
१. परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५ प्रश्न)
२. ५ वाक्य किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.
३. कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)
४. Audio Clip ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)
भाषण कौशल्य- (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)
१. वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करावे.
२. दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करावे (सदर विषय विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाशी सुसंगत असावेत).
२) गणित विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-
प्रथम सत्र
लेखी परीक्षा – ८० गुण
गणित भाग १ (बीजगणित) – ४० गुण
गणित भाग २ (भूमिती) – ४० गुण अंतर्गत मूल्यमापन- २० गुण
१) गृहपाठ- २ गृहपाठ (गणित भाग १ व भाग २ प्रत्येकी एक) यावर आधारित (प्रत्येकी ५ गुण) -१० गुण
२) प्रात्यक्षिक परीक्षा / बहुपर्यायी प्रश्न परीक्षा (भाग १- १० गुण व भाग २- १० गुण) या २० गुणांचे रूपांतर १० गुणांत करावे.
द्वितीय सत्र
लेखी परीक्षा – ८० गुण
गणित भाग १ (बीजगणित) – ४० गुण
गणित भाग २ (भूमिती) – ४० गुण
अंतर्गत मूल्यमापन – २० गुण
१) गृहपाठ- २ गृहपाठ (गणित भाग १ व भाग २ प्रत्येकी एक) यावर आधारित (प्रत्येकी ५ गुण) -१० गुण
२) प्रात्यक्षिक परीक्षा/ बहुपर्यायी प्रश्न परीक्षा (भाग १- १० गुण व भाग २- १० गुण) या २० गुणांचे रूपांतर १० गुणांत करावे.
प्रथम सत्र परीक्षा – १०० गुण द्वितीय सत्र परीक्षा १०० गुण २०० / २ = १०० गुण सरासरी.
३) विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-
प्रथम सत्र
विज्ञान भाग १-४० गुण
विज्ञान भाग २- ४० गुण
प्रात्यक्षिक परीक्षा व उपक्रम- २० गुण
प्रयोग- १२ गुण (पेपर १-६ गुण, पेपर २-६ गुण)
नोंदवही – ०४ गुण (पेपर १-२ गुण, पेपर २-२ गुण)
उपक्रम नोंदणी- ०४ गुण (पेपर १-२ गुण, पेपर २- २ गुण)
उपक्रम नोंदवही शाळास्तरावर ठेवणे आवश्यक राहील.
प्रथम सत्र परीक्षा – १०० गुण द्वितीय सत्र परीक्षा १०० गुण २०० / २ = १०० गुण सरासरी.
उत्तीर्णतेसाठी गणित व विज्ञान विषयांचा एक गट असेल. दोन्ही विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी २०० गुणांपैकी किमान ७० गुण प्राप्त होणे आवश्यक आहे व त्यापैकी प्रत्येक विषयात किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.
४) सामाजिक शास्त्रे विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-
प्रथम सत्र
इतिहास व राज्यशास्त्र – २८ + १२ = ४० गुण
भूगोल = ४० गुण
द्वितीय सत्र
इतिहास व राज्यशास्रख २८ + १२ = ४० गुण
भूगोल = ४० गुण
अंतर्गत मूल्यमापन = २० गुण (प्रथम व द्वितीय सत्रासाठी प्रत्येकी)
विषय
गृहपाठ (प्रत्येकी ५ गुणांचे)
गुण
रूपांतर (गुण)
५
५
बहुपर्यायी प्रश्न
गुण
रूपांतर (गुण)
इतिहास + राज्यशास्र
१+१
१०
१ चाचणी
८+२
५
भूगोल
२
१०
१ चाचणी
१०
५
प्रथम सत्र परीक्षा – १०० गुण द्वितीय सत्र परीक्षा १०० गुण २०० / २ = १०० गुण सरासरी.
इ.९ वीमध्ये सराव चाचण्या, गृहपाठ व अन्य लेखी कार्य प्रचलित पध्दतीप्रमाणे सुरू राहील.
३. इ.१० वी साठी विषयनिहाय मूल्यमापन योजना-
इ. १० वीच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा (Preliminary Examination) या इ.९वी च्या विषयनिहाय मूल्यमापन आराखड्याप्रमाणे आयोजित केल्या जातील.
राज्य मंडळामार्फत आयोजित माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा पुढील मूल्यमापन योजनेप्रमाणे राहील.
१) भाषा विषयांसाठी लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-
अंतिम लेखी परीक्षा
८० गुण
अंतर्गत मूल्यमापन
२० गुण
१) तोंडी परीक्षा-
१० गुण
श्रवण कौशल्य-५ गुण
भाषण कौशल्य – ५ गुण
२) स्वाध्याय- प्रत्येकी ५ गुणांचे २ स्वाध्याय घ्यावेत
१० गुण
तोंडी परीक्षेकरिता पुढील २ कौशल्ये निवडण्यात यावीत.
🌐👉 शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करून डाऊनलोड करू शकता 👈