Class 10th 12th All Duplicate Certificate Through Online RFP Process

Class 10th 12th All Duplicate Certificate Through Online RFP Process

Class 10th 12th All Duplicate Certificate Through Online RFP Process

Class 10th 12th Duplicate Marksheet Certificate Provisional Certificate Migration Certificate Submitting Only through online system through RFP process

करा.मं/परीक्षा-३/४००२
पुणे – ४११००४
दिनांक – १९/११/२०२५

विषय – माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीश्वेचे द्वितीय गुणपत्रक/प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र RFP प्रकीयेद्वारे ऑनलाईन प्रणालीमधून देणेबाबत..

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेचे व्दितीय गुणपत्रक / प्रमाणपत्र (Duplicate Marksheet Certificate), तात्पुरते प्रमाणपत्र (Provisional Certificate) व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) देण्यासाठी दिनांक १९/११/२०२५ पासून मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने कार्यपध्दती सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात दि. २३/०७/२०२५ रोजीच्या परीक्षा समितीमध्ये यासाठी आकारावयाचे शुल्क व कार्यपध्दती पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली असून दि. १७/१०/२०२५ रोजीच्या कार्यकारी परीषदेमध्ये त्यास मान्यता देण्यात आली आहे.


१ द्वितीय गुणपत्रक/प्रमाणपत्र (Duplicate Marksheet/Certificate), तात्पुरते प्रमाणपत्र (Provisional Certificate) व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) यासाठी यापूर्वीचे सर्व प्रकारचे शुल्क रद्द करण्यात आले आहे. व्दितीय गुणपत्रक/प्रमाणपत्र (Duplicate Marksheet/ Certificate), तात्पुरते प्रमाणपत्र (Provisional Certificate) व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी (Migration Certificate) प्रती प्रमाणपत्र रू. ५००/-(रूपये पाचशे फक्त) शुल्क आकारण्यात यावे (कोणत्याही प्रतीसाठी) मागणी अर्जासाठी स्वतंत्र शुल्क आकारू नये.

२ माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना यासाठी आधारकार्ड OTP based च्या आधारे व्दितीय गुणपत्रक / प्रमाणपत्र (Duplicate Markseet / Certificate) तात्पुरते प्रमाणपत्र (Provisional Certificate) व स्थलांतर प्रमाणपत्रसाठी (Migration Certificate) अर्ज करता येईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यासंबंधीची कार्यवाही विभागीय मंडळानी ०३ दिवसात पूर्ण करावी.

३ सद्यस्थितीत १९९० सालापासून e-marksheet प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्व data उपलब्ध आहे. त्यामुळे १९९० नंतरचे duplicate गुणपत्रक /प्रमाणपत्राची मागणी आल्यास त्याची Soft Copy अर्जदार तसेच विभागीय मंडळास उपलब्ध होईल.

४ प्रमाणपत्राची मागणी पोस्टाने केल्यास ते Speed post ने पाठविण्यात यावे.

५ प्रचलित पद्धतीमध्ये द्वितीय प्रमाणपत्रावर संबंधित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का, मुख्याध्यापक/प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्यात येत होती. तथापि सद्यस्थितीत ONLINE प्रणालीमध्ये माध्यमिक शाळेचे /कनिष्ठ महाविद्यालयाचे शिफारसपत्र घेण्यात येवू नये तसेच द्वितीय प्रमाणपत्रावर संबंधित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का, मुख्याध्यापक/प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही.

६ ऑनलाईन प्रणालीत एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

तरी याबाबत सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करावे.

सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४.

प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे.

Leave a Comment

error: Content is protected !!