Changes In Duration Eligibility For Admission Of Diploma In Arts Courses महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या कला पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी व प्रवेशासाठीच्या पात्रतेत बदल

Changes In Duration Eligibility For Admission Of Diploma In Arts Courses

IMG 20250606 204523
Changes In Duration Eligibility For Admission Of Diploma In Arts Courses

Changes In Duration Eligibility For Admission Of Diploma In Arts Courses

Board of Arts Education Changes In Duration Eligibility for Admission Of Diploma In Arts Courses

Regarding changes in the duration and eligibility for admission of the Diploma in Arts courses of Maharashtra State Board of Arts Education

Approval is being given to change the duration and eligibility for admission of the Diploma in Arts courses of the Maharashtra State Board of Arts Education, and to implement the admission process from the academic year 2025-2026 as per the eligibility shown in the table below.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या कला पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी व प्रवेशासाठीच्या पात्रतेत बदल करणेबाबत

Kala shikshan Mandal kala padavika abhyaskram kalavadhi Pravesh patrata Badal GR shasan nirnay

दिनांक:- ०६ जून, २०२५.

वाचा:-
१) महाराष्ट्र कला शिक्षण मंडळ अधिनियम क्र..XII दिनांक १९ जानेवारी, २०२४.
२) महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे पत्र क्र. कशिमं-२०२५/तीन/अभ्यासक्रम कालावधी व पात्रता बदल/४६६, दिनांक २७ मे, २०२५
३) कला संचालक यांचे पत्र क्रमांक डिओओ-२०२५/दोन/८९७, दि. २८ मे, २०२५.

प्रस्तावना:-

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून राबविण्यात येत असलेले अभ्यासक्रम सन १९७७पासून अद्याप सुधारीत केलेले नाहीत. तसेच, सदर अभ्यासक्रमांचा कालावधी व प्रवेशासाठीची पात्रता साधारणपणे ५० वर्षापूर्वीची आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या व उद्योजकतेच्या पुरेशा प्रमाणात संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कला पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल कमी झाला असल्याने प्रवेशित विद्यार्थी संख्या कमी होत आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने प्रस्तावित केलेल्या अभ्यासक्रमाच्या कालावधीत व प्रवेशाच्या पात्रतेत बदल केल्यास विद्यार्थ्यांना नोकरीच्या व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, नवीन शैक्षणिक धोरण-२०२० नुसार अभ्यासक्रमात व कालावधीत बदल करणे आवश्यक आहे. सबब, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने व संचालक, कला संचालनालय यांनी प्रस्तावित केलेल्या कला पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी व शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यास व सदर पात्रतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

    शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या कला पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी व प्रवेशासाठीच्या पात्रतेत बदल करण्यास, तसेच खालील तक्त्यात दर्शविलेल्या पात्रतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

IMG 20250606 204911
Changes In Duration Eligibility For Admission Of Diploma In Arts Courses

अ. क्र. अभ्यासक्रमाचे नाव

१ उपयोजित कला पदविका (Diploma in Applied Art)

२ रेखा व रंगकला पदविका (Diploma in Drawing and Painting)

३ शिल्पकला व प्रतिमानबंध पदविका (Diploma in Sculpture and Modeling)

४ कला व हस्तकला-अंतर्गत गृहसजावट पदविका

(Diploma in Art and Craft- Interior Decoration)

५ कला व हस्तकला-वस्त्रकाम (टेक्सटाईल) पदविका-

प्रिंटींग अॅन्ड डाईंग [Diploma in Art and Craft- Textile Design (Printing and Dyeing)]

६ कला व हस्तकला-वस्त्रकाम (टेक्सटाईल) पदविका-व्हिव्हिंग [Diploma in Art and Craft- Textile Design (Weaving)]

७ कला व हस्तकला-मातकाम (सिरॅमिक व पॉटरी) पदविका (Diploma in Art and Craft- Ceramics and Pottery)

८ कला व हस्तकला-धातुकाम (मेटल क्राफ्ट) पदविका (Diploma in Art and Craft- Metal Craft)

प्रवेशासाठी सुधारीत पात्रता

१० वी / एस.एस.सी. उत्तीर्ण

१० वी / एस.एस.सी. उत्तीर्ण

१० वी / एस.एस.सी. उत्तीर्ण

१० वी / एस.एस.सी. उत्तीर्ण

१० वी / एस.एस.सी. उत्तीर्ण

१० वी / एस.एस.सी. उत्तीर्ण

१० वी / एस.एस.सी. उत्तीर्ण

१० वी / एस.एस.सी. उत्तीर्ण

सुधारीत कालावधी (वर्ष)

३ (६ सत्र)

३ (६ सत्र)

३ (६ सत्र)

३(६ सत्र)

३ (६ सत्र)

३ (६ सत्र)

३ (६ सत्र)

३ (६ सत्र)

०२. कला शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ वी / एच.एस.सी. उत्तीर्ण असण्याची पात्रता ठेवण्यात आली आहे. मुलभूत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १० वी /एस.एस.सी उत्तीर्ण असण्याची पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच, मुलभूत अभ्यासक्रमाच्या नावात खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

सध्याचे नाव

मुलभूत (Foundation Course) कालावधी १ वर्ष

सुधारीत नाव

फाऊंडेशन सर्टीफीकेट इन आर्ट अॅन्ड डिझाईन (Foundation Certificate in Art and Design) कालावधी १ वर्ष (२ सत्र)

०३. तसेच, कला शिक्षणशास्त्र पदविका (Diploma in Art Education) व आर्ट मास्टर प्रमाणपत्र-सुट्टीतील / अंशकालीन (Art Master’s Certificate – Part Time / Vacation) या अभ्यासक्रमांच्या कालावधीत व प्रवेशासाठीच्या पात्रतेत बदल करण्यात आलेला नाही.

०४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६०६१६४९०९४००८ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास वक्त या ओळीला स्पर्श करा

सह सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक:- एडीआर-२०२५/प्र.क्र.५०/तांशि-६, मुंबई

Higher and Technical Education Department
Regarding changes in the duration and eligibility for admission of the Diploma in Arts courses of Maharashtra State Board of Arts Education

Leave a Comment

error: Content is protected !!