Shivrajyabhishek Din Quiz With Certificate
Shivrajyabhishek Din Quiz With Certificate
Shivrajyabhishek Din
शिवराज्याभिषेक दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि प्रमाणपत्र पीडीएफमध्ये प्राप्त करा
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिन : प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुद्धा भारतात अनेक राजघराणे होते आणि ते स्वतःस ‘राजे’ म्हणून घेत होते. यात राजपूत आघाडीवर होते. महाराष्ट्रातही शिर्के, मोरे, निंबाळकर, दळवी असे घराणे होते. हे जरी स्वतःला राजे म्हणवून घेत असले तरी पण ते स्वतंत्रपणे राज्यकारभार करू शकत नव्हते. कारण ते आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही चे मांडलिकत्व स्विकारलेले राजे होते. हे सर्व घराणे या चारही शाह्यांची गुलामी करण्यातच धन्यता मानत होते. राजकीय गुलामगिरी बरोबर धार्मिक व सांस्कृतिक गुलामगिरीही निर्माण झालेली होती. राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आणि बहुजन देखील स्वतःचे राज्य व राजा निर्माण करू शकतात हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिजाऊ आणि शहाजी राजेंनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वतंत्र राज्य निर्मितीच्या दृष्टीने विचारांची पेरणी केली, त्यांना तसं संस्कारित केले. शिवाजी महाराजांनी जिजाऊ – शहाजीराजेच्यां विचार – संस्कार आणि मावळ्यांच्या बळावर ६ जून १६७४ ला श्रमकरी, महिला, शेतकरी, दलीत – वंचिताना न्याय देण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली.
६ जुनलाच का ? :- ६ जून १६५९ ला औरंगजेबाचा सिंहसनारोहण झाला होता. आता मोगलाईचा अस्त होवून भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडे उगवलेला आहे. हा संकेत देण्यासाठी ५ जूनला मध्यरात्रीपासून राज्यभिषेकाला सुरुवात होवून ६ जूनला सकाळी स्वराज्याचा पहिला दरबार भरविला होता. औरंगजेबाला कळावं की भारतात स्वाभिमानी राज्याची स्थापना झाली आणि औरंजेबाच्या ढासळत्या डोलाऱ्याची त्याला कल्पना करून देण्यासाठी महाराजांनी जाणीवपूर्वक राज्यभिषेकाची तारीख ६ जून निवडली होती.
शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा दिवस हा भारतीय जनतेचा पहिला स्वातंत्र्य दिन होय. राज्यभिषेकदिन हा गणराज्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाप्रमाणे राष्ट्रीय दिन म्हणून शासनाने घोषीत करायला हवे.
३५१ वर्षांनंतरही आम्हाला जन कल्याणाचा विचार करणाऱ्या राजेंचा राज्यभिषेकदिन लोकशाही शासन व्यवस्थेच्या काळात कायम मनामनात घर करुन आहे. तर सध्या काल कोणी शपथ घेतली हे आम्हाला आज आठवत नाही हा फरक आहे. म्हणून आजही शिवाजी महाराजांचा जयजयकार होत आहे.
स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले व राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगड या ठिकाणी झाला. जगातील पहिले छत्रपती पद धारण करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज हे होते. हा एतीहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यांवर शिवराज्याभिषेक दीन म्हणून साजरा केल्या जातो. त्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या सर्व शिवप्रेमींना शिवमय शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ प्रश्नमंजुषा सोडवा आणि प्रमाणपत्र पीडीएफमध्ये प्राप्त करा
शिवराज्याभिषेक दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि प्रमाणपत्र प्राप्त करा
Shivrajyabhishek Din Quiz With Certificate
प्रश्नमंजुषा छान होती. धन्यवाद!!!