Celebrating Ganeshotsav as a State Festival
Celebrating Ganeshotsav as a State Festival
Ganeshotsav Rajya Mahotsav
गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव म्हणून साजरा करणेबाबत.
दिनांक: २४ ऑगस्ट, २०२५
वाचा
: १५० शा.नि. क्र.: पुलदे-२०२५/प्र.क्र. ७४ (ई-११४४०१५७ सां.का.२, दि.२० जून २०२५.
२) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी विधिमंडळात गणेशोत्सव डा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणेबाबत केलेली घोषणा.
३) संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे दि.२५.०७.२०२५ चे पत्र
प्रस्तावनाः
लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती व जनतेला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. या निमित्ताने सामाजिक एकोपा आणि संघटनात्मक चळवळी तसेच विविध कला, देखावे आणि सांस्कृतिक उपक्रम यांच्याद्वारे देशडिताचा व्यापक विचार समाजात रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आले.
राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देशविदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा असा उत्सव आहे. गणेशोत्सव काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व व्यवसाय यांना चालना मिळत असून राज्यात एकूणच सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक अभिसरण होते. त्यामुळे डी परंपरा व संस्कृति जपली जाबी, वृद्धिंगत व्हावी, यासाठी गणणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी दि. १८ जुलै २०२५ रोजी राज्य विधिमंडळात केली आहे. त्यास अनुसरून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय-
राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने राज्यातील गणेशोत्सवानिमित्त अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजन्या होणान्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करणारे उपक्रम उदा. विविध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करणे, महाराष्ट्रात शिकणाऱ्या परदेशातील तसेच अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना या राज्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्राहित करणे इ. उपक्रमांसड, गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र. | विभाग | कार्ये |
१ | सांस्कृतिक कार्य संचालनालय | राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना भांडवली खर्चासाठी अनुदान देण्यात येईल. या संदर्भातील अटी व शरतींचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी ५ कोटी रुपये इतकी तरतूद करणे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे स्थानिक संस्थांच्यासोबत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजन करणे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचे आयोजन करणे. प्रामुख्याने राजधानीच्या शहरात ड्रोन शोचे आयोजन करणे, राज्य महोत्सव टपाल तिकिट काढणे. राज्य महोत्सव विशेष नाणे प्रसिध्द करणे. |
२ | कला अकादमी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र | उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत करणे, राज्यातील सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे १.५० कोटी रुपये इतक्या रकमेची पारितोषिके वितरित करणे. या स्पर्धांचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांकरिता पारितोषिक वितरण समारंभअकादमीतर्फे आयोजित करणे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्य व्याख्यानमालेचे आयोजन करणे. राज्यातील प्रमुख गणेश मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांचे ऑनलाइन दर्शन करता यावे, याकरिता एक पोर्टल निर्माण करणे. घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करता यावीत, याकरिता एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणे. घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करता यावीत, याकरिता एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणे. या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी याकरिता वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि समाज माध्यमे यांच्या माध्यमातून देशभरात प्रचार व प्रसिद्धी करणे, उपरोक्त बाबींचा एकत्रित शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. |
३ | दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव | दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाला व्यापक स्वरुप यावे, या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम हाती घेणे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातून गणपती विषयक रिल्स स्पर्धा महसूल विभागीय व राज्यस्तरावर आयोजित करणे, ज्या मराठी चित्रपटांमधून गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा व प्रथा यांचे उत्तम चित्रण करण्यात आले आहे, अशा चित्रपटाचा गौरव करणे. |
४ | सर्व जिल्हाधिकारी | उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समित्या गठित करणे, स्पर्धेसाठी अकादमीतर्फे पाठविण्यात आलेल्या अर्जाचे प्रत्यक्ष भेटीद्वारे समितीमार्फत परिक्षण करणे, गुणांकन करणे व अंतिम निकालपत्र अकादमीकडे पाठविणे. राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आल्यानंतर तालुका व जिल्हास्तरीय (द्वितीय व तृतीय) विजेत्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत करणे. राज्य महोत्सवाच्या अनुषंगाने शहरांतील प्रमुख ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, विसर्जन मिरवणुकांचे संयोजन व समन्वयन करणे. शासन निर्णयामध्ये नमूद उपक्रम, कार्यक्रम यांचे स्थानिक स्तरावर नियंत्रण, समन्वयन आणि प्रचार व प्रसिध्दी करणे. |
३. उपरोक्त तक्त्यामधील नमूद यंत्रणांनी सदर प्रस्तावित कार्यक्रम / उपक्रमांच्या अनुषंगाने स्वतंत्रपणे आवश्यक ती कार्यवाही करावी.
४. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या संदर्भीय क्रमांक १ येथील शासन निर्णयामध्ये अनुषंगिक सुधारणा करुन स्वतंत्रपणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.
५. उपरोक्त परिच्छेदामध्ये दर्शविण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या संदर्भात आवश्यक असलेला खर्च हा संबधित कार्यालयांनी त्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या निधीतून भागवावा.
६. सर्व जिल्हाधिकारी यांनी गणेशोत्सव डा राज्य महोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या कार्यक्रम/उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाडी करावी.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०८१४१७२९०९३६२३ असा आहे. डा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
शासन निर्णय क्रमांक- पुलदे-२०२५/प्र.क्र.११४/१२५५४१२)/सां.का.२
मंत्रालय, मुंबई-३२.