Bhatke Vimukta Divas ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणुन साजरा करणेबाबत शासन निर्णय

Bhatke Vimukta Divas

Bhatke Vimukta Divas

Vimukta Jati and Nomadic Tribes Diwas

Bhatke Vimukta Din

Regarding celebrating “August 31st” as “Bhatke Vimukta Divas”.

“३१ ऑगस्ट” हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणुन साजरा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-२०२५/प्र.क्र.९८/मावक, मुंबई- ४०००२०

दिनांक : ३१ जुलै, २०२५.

प्रस्तावना :-

सन १८७१ साली ब्रिटिश सरकारने C*riminal Tribes Act अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले. यामुळे या जातींमधील समाजबांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला, पर्यायाने याचे दिर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले. स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी C*riminal Tribes Act हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना “विमुक्त जाती” (म्हणजे मुक्त झालेल्या) म्हणून घोषित करण्यात आले. भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” साजरा करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

     शासन निर्णय

“३१ ऑगस्ट” हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्यास शासन मान्यता देण्यात येत
आहे.

२. “भटके विमुक्त दिवस” हा दिवस राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर साजरा करण्यात यावा. सदर दिवशी भटक्या विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे जीवनमुल्य, परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात यावे. शासकीय व अनुदानित आश्रमशाळा/शासकीय वसतीगृहे या ठिकाणी विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर/आधारकार्ड नोंदणी/जातीचे दाखले/जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांविषयी माहिती याकरीता शिबीराचे आयोजन करावे.

३. विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

४. “३१ ऑगस्ट” या दिवशी सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टी असली तरीही त्याच दिवशी “भटके विमुक्त दिवस” साजरा करावा.

५. सदर बाबीवर होणारा खर्च “मागणी क्रमांक झेड जी-३, प्रधानशीर्ष २२२५, अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्ग अल्पसंख्याक यांचे कल्याण, ०३ मागासवर्गीयांचे कल्याण, ००१ संचालन व प्रशासन, (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण, (०१) (०१) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र संचालनालय (अनिवार्य) (दत्तमत) (२२२५ ई ७९५)” या लेखाशिर्षाखाली “१३-कार्यालयीन खर्च” या तपशीलवार शीर्षखाली असलेल्या अनुदानातून रु.१०.०० लक्ष इतक्या मर्यादेत खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

६. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०७३११७०८०७३५३४ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

उप सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20250801 083822
Bhatke Vimukta Divas
1753978196548
Bhatke Vimukta Divas

Leave a Comment

error: Content is protected !!