Aurobindo National History Essay Competition
Aurobindo National History Essay Competition
Aurobindo Rashtriy Itihas Nibandh Spardha
जा.क्र. शिसंमा/संकीर्ण/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/5121
दि.३०/१०/२०२५
विषय :- श्री अरबिंदो राष्ट्रीय इतिहास निबंध स्पर्धा आयोजित करणेबाबत…
संदर्भ :-
१) अवर सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र दि.२३/१०/२०२५.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक :- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२५२/एस.डी. ४ दिनांक २८ ऑक्टोबर, २०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शासनाच्या संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये लहान मुलांमध्ये देशभक्ती, कुतूहल आणि भारताच्या ऐतिहासिक वारशाची सखोल समज निर्माण करण्याच्या उद्देशाने फाऊंडेशन फॉर इंडियन हिस्टॉरिकल अॅड कल्चरल रिसर्च ही संस्था, इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी माहे नोव्हेंबर, २०२५ मध्ये “श्री अरबिंदो राष्ट्रीय इतिहास निबंध स्पर्धा” आयोजित करत असल्याचे संदर्भ क्रमांक १ च्या केंद्र शासनाच्या पत्रान्वये शासनास कळविण्यात आलेले आहे. (सोबत शासन पत्राची प्रत व त्यासोबतच्या केंद्रशासनाच्या सहपत्राची प्रत जोडली आहे.)
त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/ प्राचार्य यांना शासन पत्रासोबतच्या केंद्रशासनाच्या सहपत्रातील बाबी निदर्शनास आणाव्यात. तसेच आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस निबंध स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे याकरिता सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत,पुणे
Government of India
Ministry of Education
Department of School Education & Literacy
New Delhi, the 23rd October, 2025
F.No. 17-47/2025-Coord
Subject: Sri Aurobindo National History Essay Competition-reg.
Sir/Madam,
I am directed to state that Foundation for Indian Historical and Cultural Research (FIHCR) has been organizing the Sri Aurobindo National History Essay Competition with an objective to inculcate a spirit of patriotism, curiosity, and deeper understanding of India’s historical legacy among young children.
- The first edition of the competition held in 2024-25 witnessed enthusiastic participation from students of classes 6 to 9 across 21 States of the country.
- Building on this success, FIHCR proposes to conduct the second edition of the Sri Aurobindo National History Essay Competition in November 2025 for students of classes 7 to 9. Detailed overview, including the proposed timeline, eligibility criteria, and evaluation process is enclosed for ready reference.
- I would request you to kindly disseminate this information to all schools under your jurisdiction and encourage participation in the competition.
With regards,
Yours sincerely.
[Encl: As above]
Under Secretary to Government of India
