Attendance Register Signing
Attendance Register Signing
Shikshak Shikshakektar karmchari hajari patavar svakshari
Allowing teaching and non-teaching staff to sign the employee attendance register
Regarding allowing teachers and non-teaching staff to sign the employee attendance register as soon as they arrive at school.
जा.क्र. शिसंमा/उमा/हजेरीस्वाक्षरी/ए-१/विद्याशाखा/२०२५-२६/1774046
11 MAR 2026
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व विभाग)
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व
३) शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४) शिक्षणाधिकारी/शिक्षण प्रमुख/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका (सर्व)
विषय :- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करु देण्याबाबत.
संदर्भ :- अनिल महादेव शिवणकर, अध्यक्ष भापज शिक्षक आघाडी, पूर्व विदर्भ यांचे दि.१२/०२/२०२६ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरु होण्या आगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करुन त्या संबंधित शिक्षकांना शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी करु न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्यावर स्वाक्षरी करायला स्वाक्षरी हजेरी देतात ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य असल्यबाबत कळविले आहे.
त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विहित वेळेत शाळेत हजर झाल्यानंतर लगेचच त्यांची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी घेण्यात यावी तसेच स्वाक्षरीच्या वेळी हजेरी पत्रक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळा/ उच्च माध्यमिक शाळांना कळविण्यात यावे.
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR Date: 11-03-2026 14:42:24 (डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक,)
माहितीस्तव सविनय सादर,
मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. ४११०४१.
प्रत माहितीस्तव-
श्री. अनिल महादेव शिवणकर, अध्यक्ष भापज शिक्षक आघाडी, पूर्व विदर्भ, १०५, एंजल वन अपार्टमेंट, प्लॉट नं.१०१, दहिपूरा, उंटखाना, नागपूर-४४००२४.
