Appointment of Ph D Teachers Class 1 2 Posts In Education Department
Appointment of Ph D Teachers Class 1 2 Posts In Education Department
Appointment of PhD holders to Class-1 and Class-2 posts in the Education Department
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
मंत्रालयीन सेवा
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
क्रमांक : संकीर्ण-१५२५/प्र.क्र.२७२/आस्था-१४
दिनांक:- १९ सप्टेंबर, २०२५.
प्रति,
१) विभागीय आयुक्त (सर्व)
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
विषय :- विधानपरिषद विशेष उल्लेख सूचना क्र.४८८९ पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदावर नेमणूक करण्याबाबत.
संदर्भ:- शासनाचे पत्र क्र. संकीर्ण-४०२२/प्र.क्र.६३/आस्था-१४, दि.७.८.२०२५..
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन पत्रान्वये मा. श्री. बाळाराम पाटील, मा.वि.प.स. यांनी “पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांवर नेमणूक करण्याबाबत” उपस्थित केलेल्या विशेष उल्लेख सूचनेच्या अनुषंगाने संदर्भाधिन दि.७.८.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्त यांचेकडून अहवाल/अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
३. तथापि, सदर विशेष उल्लेख सूचना शालेय शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली असल्यामुळे या सूचनेसंदर्भात प्रचलित शासन नियमातील तरतुदी तपासून संबंधित मा. विधान परिषद सदस्यांना या विभागाकडून वस्तुस्थिती कळविण्याची आवश्यकता दिसून येत नाही. त्यामुळे या कार्यासनामार्फत निर्गमित केलेले संदर्भाधिन दि.७.८.२०२५ रोजीचे पत्र व त्याबाबत शासन स्तरावरुन यापूर्वी करण्यात आलेला पत्रव्यवहार रद्द समजण्यात यावा.
आपली,
(ज्योत्स्ना अर्जुन)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
विधानपरिषद विशेष उल्लेख मुद्दा क्र. ४८८९ पीएचडी धारक
ALSO READ 👇
क्र. संकीर्ण-४०२२/प्र.क्र.६३/आस्था-१४
दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२५
विषय – विधानपरिषद विशेष उल्लेख मुद्दा क्र.४८८९ पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांवर नेमणूक करण्याबाबत.
संदर्भ :- शासन समक्रमांक दि.०७.११.२०२३ रोजीचे पत्र.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत शासन समक्रमांक दि.०७.११.२०२३ रोजीचे पत्र कृपया पहावे.
उपरोक्त विषयांकित विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सविस्तर टिप्पणी व संबंधित कागदपत्रांच्या प्रतींसह सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले होते.
तथापि, याबाबतचा अहवाल अद्यापही शासनास प्राप्त झालेला नाही. सदरची बाब अतिशय गंभीर असून, विधानमंडळ प्राथम्य विचारात घेता, याबाबतचा अहवाल शासनास तात्काळ उलटटपाली सादर करण्याची आपणांस विनंती आहे. सदरचा अहवाल विहीत कालमर्यादेत प्राप्त न झाल्यास, याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, मुंबई
प्रति,
मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व.