शाळांच्या नावाबाबत करावयाची कार्यवाही Action Taken Names Of Schools

Action Taken Names Of Schools

Action Taken Names Of Schools

Action to be taken regarding the names of schools.

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

जा.क्र.शिसंमा/२०२५/स्वयंअर्थसहायित/एस ४

दि.१५/१२/२०२५

प्रति,
१. अध्यक्ष, क्षेत्रस्तरीय प्राधिकरण स्वयंअर्थसहाय्यित शाळा तथा विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व).

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व)

३. शिक्षणनिरीक्षक, बृहन्मुंबई, (उत्तर/दक्षिण/पश्चिम),

४. सदस्य सचिव, क्षेत्रस्तरीय प्राधिकरण स्वयंअर्थसहाय्यित शाळा तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सर्व जिल्हे.

विषय: शाळांच्या नावाबाबत करावयाची कार्यवाही.

राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्या बाबत शाळांच्या नावांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता दिसून येते, काही शाळा या राज्यमंडळ संलग्नित असतात. त्यांच्या नावामध्ये International, Global, CBSE अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग केलेला दिसून येतो. तसेच काही शाळांच्या नावामध्ये English Medium असा उल्लेख असतो परंतु सदर शाळा मान्यता मराठी माध्यम अशी असल्याचे दिसून येते. वास्तविकता शाळांचे नाव ठरवितांना International, Global असा शब्द प्रयोग करतांना त्या शाळेच्या अन्य शाखा परदेशात असणे अपेक्षित आहे. तसेच त्या शाळेची मंडळ संलग्नता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळाशी संलग्न असणे अपेक्षित आहे. काही शाळांच्या नावामध्ये CBSE असा शब्द प्रयोग केला जातो. हा शब्द प्रयोग करणे कायदेशीरदृष्टया योग्य नाही, कारण CBSE हे नामविधान हे केंद्रशासनाद्वारे स्थापित परिक्षा मंडळाचे नाव आहे.

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता शाळांच्या नावामध्ये उपरोक्त इंटरनॅशनल, ग्लोबल, सीबीएसई, इंग्लिश मिडीयम, (International, Global, CBSE, English Medium) शब्दांचा उपयोग करुन शासनाची, समाजाची, पालकांची, विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा समाजावर प्रतिकूल परिणाम होवू शकतो ही पार्श्वभूमी लक्षात घेता स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळा मान्यता/दर्जावाढ प्रस्तावांच्या छाननीसाठी आयोजित राज्यस्तरीय प्राधिकरणाच्या दि.१०.१२.२०२५ च्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली आणि याबाबत पालक, विद्यार्थी यांच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद शब्द किंवा त्याअनुषंगाने असणारे शब्द अशी नावे देण्यामागील पार्श्वभूमी काय आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, करीता असे शब्द असणाऱ्या शाळांची नावे बदलण्याबाबत संबंधित शाळांना सूचित करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार यापुढे शाळा मान्यतासाठी नव्याने येणारी प्रकरणांची तपासणी करतांना शाळेचे नाव, त्यांचे मंडळ व माध्यम, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्या संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या अन्य शाळा, इ. चा सर्वकष विचार करुन पालक व विद्यार्थ्यांवर प्रतिकुल परिणाम होईल अशी नावे असल्यास ती नावे बदलण्याबाबत संबंधित संस्थांना कळविण्यात यावे, तद्नंतर अशा शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्यात यावी. सदर बाब क्षेत्रस्तरावरील सर्व अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांच्या निदर्शनास आपल्या स्तरावरुन निदर्शनास आणून द्यावी. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद प्रकारचे शब्द आहेत याबाबत आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी. माहे डिसेंबर २०२५ मध्ये राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त प्रकरणांपैकी सोबत जोडलेल्याप्रमाणे ११ प्रकरणांमध्ये क्षेत्रस्तरावरुन नावाबाबत खातरजमा करुन फेर प्रस्ताव सादर करावेत.

सहपत्र: शाळांची नावे व परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

IMG 20251219 164355

सदस्य स्तरीय प्राधिकरण तथा

सहसंचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे

प्रत: मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांना माहितीस्तव

Leave a Comment

error: Content is protected !!