Abhimat Vidyapeeth Vyavsayik Abhyaskram Shishyavrutti Pratipurti Yojana

Abhimat Vidyapeeth Vyavsayik Abhyaskram Shishyavrutti Pratipurti Yojana

IMG 20250127 204050
Abhimat Vidyapeeth Vyavsayik Abhyaskram Shishyavrutti Pratipurti Yojana

Abhimat Vidyapeeth Vyavsayik Abhyaskram Shishyavrutti Pratipurti Yojana

Scholarship Reimbursement Scheme

Regarding implementation of prevailing scholarship reimbursement scheme of the government for the students of professional courses in the opinion universities of the state

राज्यातील अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाची प्रचलित शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबत…

दिनांक :- २४ जानेवारी, २०२५.

संदर्भ :-
१) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक ईबीसी- २००९/प्र.क्र.१४६/मावक-२, दि.२७.०७.२००९.

२) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय, क्र. टीईएम-२०१०/ (१२५/२०१०) /तांशि-४, दि.०६.११.२०१०.

३) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे क्र.६९/२०११ या जनहित याचिकेत दि.२०.०३.२०१५ रोजीचे आदेश.

४) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७/प्र.क्र.३३२/ तांशि-४, दि.०७.१०.२०१७.

५) University Grants Commission Notification No.F.१-२/२०१८ (CPP- I/DU) UGC (Institutions Deemed to be Universities) Regulations. २०१९, dated २०.०२.२०१९.

६) शासन निर्णय समक्रमांक दि.१४.१०.२०२१ व दि.०७.१२.२०२१.

७) मा.न्या. श्री.एम.एन.गिलानी (निवृत्त) तथा माजी अध्यक्ष शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांच्या समितीचा दि. २७.१२.२०२१ रोजीचा अहवाल.

८) मा. राज्य मंत्रिमंडळाच्या दि. ३१.०१.२०२३ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त.

९) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय सिटीसी २०२०/प्र.क्र.२३/तांशि-४, दिनांक २३.२.२०२३

१०) समक्रमांकाचा शासन निर्णय दिनांक २९ जुलै, २०२४

सुधारणा / शुध्दिपत्रक-

संदर्भाधिन अनु. क्र.१० च्या राज्यातील अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाची प्रचलित शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबतच्या दिनांक २९ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयातील अनु. क्र.७ मधील तरतूदीमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

“संदर्भाधीन क्र. (०४) येथील दि.०७.१०.२०१७ च्या शासन निर्णयानुसार शासकीय, शासन अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/शासकीय विद्यापीठे व त्या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्र अथवा राज्य शासनाच्या सक्षम प्राधिकरणांमार्फत (उदा.CET -Cell, AACCC इ.) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणे व शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे निश्चित केल्याप्रमाणे शिक्षण शुल्क आकारणे हया अटी, अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही लागू राहतील.”

IMG 20250127 204116
Abhimat Vidyapeeth Vyavsayik Abhyaskram Shishyavrutti Pratipurti Yojana

प्रस्तुत शासन शुध्दिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०१२४१६५६५९९६२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

Circular PDF link

(वर्षा देशमुख)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन
सामाजीक न्याय व विशेष सहाय विभाग
शासन शुध्दिपत्रक क्र. इबीसी-२०२३/प्र.क्र.११४/शिक्षण-१ मंत्रालय, मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!