NEW CURRICULUM FRAMEWORK DRAFT STD 3rd To 12th SCHOOL EDUCATION STATE OF MAHARASHTRA

NEW CURRICULUM FRAMEWORK DRAFT STD 3th To 12th SCHOOL EDUCATION STATE OF MAHARASHTRA

bal
NEW CURRICULUM FRAMEWORK DRAFT STD 3rd To 12th SCHOOL EDUCATION STATE OF MAHARASHTRA

NEW CURRICULUM FRAMEWORK DRAFT STD 3th To 12th SCHOOL EDUCATION STATE OF MAHARASHTRA

इयत्ता 11 आणि 12 वी मध्ये इंग्रजी भाषा आवश्यक नाही

English Language is not Necessary in Class 11 & 12

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या NEP 2020 अनुषंगाने महारष्ट्र राज्याचा नवीन अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून महारष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने SCERT अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्य अभ्यासक्रम आराखडा SCF ( STATE CURRICULUM FRAMEWORK) मसुदा तयार केला आहे. हा मसुदा / DRAFT नागरिकांसाठी जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २३ मे २०२४ पासून ३ जून २०२४ पर्यंत सूचना आणि आक्षेप /Feedback नोंदवता येणार आहेत.

आपल्याला सूचना आणि आक्षेप नोंदविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

तूर्तास आराखड्यावर आता फक्त अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानंतर मसुदा अंतिम होईल. त्यानंतर महारष्ट्र शासन धोरण निश्चित करेल

राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात समावेश

अकरावी व बारावीला सध्या असलेल्या कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा विविध शाखांमध्ये असलेले विभाजन आता भविष्यात राहणार नाही. तर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीची संधी दिली जाणार आहे. त्यानुसारच अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आता भाषा शिक्षणातून दोन विषयांचाच अभ्यास करावा लागणार आहे. किमान एक भाषा मूळची भारतातील असावी लागणार आहे. विशेष म्हणजे या वर्गासाठी आता इंग्रजी हा विषय अनिवार्य राहणार नाही.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अभ्यासक्रमात महत्त्व- पूर्ण बदल होणार आहेत. अकरावी आणि बरावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आशयाचे ओझे कमी करुन चिंतनासाठी अधिक वेळा दिला जाणार आहे. शाखांचे ओझे आता असणार नाही विद्यार्थी संगणक विज्ञान किंवा बँकिंग यांसारख्या द्विलक्षी ( बायफोकल ) विषयाची निवड करून दुसरी भाषा सोडू शकणार आहे. ही तरतूद नव्या धोरणात आली आहे. यामुळे शालेय शिक्षण व्यवस्थेत यापुढे कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयांची संकल्पना राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याचा पर्याय असणार आहे. मसुद्यानुसार नवीन आराखड्यातील निवडक विषयांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे ज्यात विज्ञान आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान, कला शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, गणित आणि संगणकीय विचार आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तीन गटांपैकी किमान दोन गटांमधून चार विषय (वैकल्पिक पाचवा विषय असलेले) निवडण्याची सक्ती असणार आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ SCF-SE मसुदा खालील लिंक मध्ये पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे

image 4
  • सहावी ते आठवीच्या वर्गासाठी इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल हे समाजशास्त्र नावाच्या सामान्य विषयामध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय, कला शिक्षण आणि पूर्व-व्यावसायिक कौशल्ये यांचा समावेश असलेले दोन नवीन विषय तयार केले आहेत.
  • नववी आणि दहावीसाठी कला शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण नव्याने विषय समावेश केले आहेत. यात सामाजिक व्यक्तिमत्व आणि पर्यावरण शिक्षण हे इतर अनिवार्य विषय केले आहेत.
  • अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता अभिजात भाषांबरोबरच परदेशी भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे. त्यासोबतच सध्या अनिवार्य असलेला इंग्रजी विषय आता सक्तीचा असणार नाही.

मातृभाषा आणि भारतीय भाषांना आराखड्यात विशेष महत्व देण्यात आल्याचे दिसते आहे. त्याचबरोबर परदेशी भाषा शिक्षणाचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावेत अशीही सूचना देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी SSC HSC EXAM परीक्षा पध्दतीत बदल करण्यात येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा विषयांसह किमान दोन गटांमधील सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आराखड्यावर आता अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानंतर मसुदा अंतिम होईल. त्यानंतर दहावी-बारावी परीक्षासंदर्भात शासन धोरण निश्चित करेल, शासनाच्या धोरणानुसार दहावी- बारावीच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात येणार असून शासनाच्या निर्देशानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

  • शरद गोसावी, अध्यक्ष राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मसुदा तयार करण्यात आलेला तिसरी ते बारावीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा जनतेसाठी खुला करण्यात आला असून त्यावर जनतेचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

  • तीन भाषा शिकणे प्रत्येक विद्यार्थ्यांला तीन भाषा येणे आणि त्यासाठी त्याला सक्षम बनवणे हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयाचे ध्येय आहे. बहुभाषिकता मुळे विद्यार्थ्याला संवादाचे अनेक पैलू, सांस्कृतिक समृद्धता आणि बहुविध बोधात्मक क्षमतांचा विकास असे अनेक फायदे होतात. विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात तीन भाषा शिकतील. या तीन भाषांतील पर्याय म्हणून संस्कृत भारतीय भाषादेखील उपलब्ध असेल. ज्यामुळे प्राचीन भारतीय परंपरेची ओळख विदयार्थ्यांना होईल, हा हेतूही व्यक्त करण्यात आला आहे.
  • धार्मिक व्यक्तींच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्याची सूचनाही मसुद्यात करण्यात आली आहे. तसेच शेती, पशुपालन, भारतीय सण, भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी, खगोलशास्त्र आणि इतर विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

विद्या प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावी-बारावी परीक्षेच्या बदलांबाबत नमूद करण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार राज्य अभ्यासक्रम तयार केला आहे

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मसुदा अभ्यासक्रम आराखडा इयत्ता 3री ते 12वी

इंग्रजी भाषेचे “परदेशी भाषा” म्हणून वर्गीकरण केले जाईल आणि महाराष्ट्रातील दीर्घकाळ चालत आलेल्या प्रथेपासून विचलित होऊन, ज्युनियर कॉलेज (Junior College / JC) स्तरावर (इयत्ता 11 आणि 12) यापुढे ती सक्तीची राहणार नाही. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) बुधवारी जारी केलेल्या इयत्ता 3 ते 12 वीच्या शालेय शिक्षणासाठी (एसई) मसुदा राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एससीएफ) द्वारे मांडलेल्या शिफारशींपैकी ही एक आहे.

प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी ‘इंग्रजी ही परकीय भाषा कशी मानता येईल? अधिकृतपणे त्याचे महत्त्व दर्शवित आहे

प्रस्तावित विषयांतर्गत इयत्ता 11 आणि 12 च्या योजनेमध्ये विद्यार्थी आठ विषय निवडू शकतात – दोन भाषा, पर्यावरण आणि शारीरिक शिक्षण आणि त्यांच्या आवडीचे चार विषय. SCF चे उद्दिष्ट शेवटी प्रवाह-विशिष्ट (कला, वाणिज्य, विज्ञान) शिक्षण काढून टाकण्याचे आहे. SCF च्या भाषा तक्त्यानुसार, 17 मूळ भारतीय भाषा आणि नऊ परदेशी भाषांची यादी असलेल्या, इंग्रजी शीर्षस्थानी असलेल्या भाषांपैकी एक भाषा भारतीय वंशाची असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!