World Teachers Day जागतिक शिक्षक दिन

World Teachers Day

World Teachers Day

World Teacher’s Day

Jagtik Shikshak Din

जागतिक शिक्षक दिन

आज जागतिक शिक्षक दिन (World Teacher’s Day). दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जागतिक शिक्षक दिन ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. जागतिक शिक्षक दिन जगातील १०० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविणाऱ्या शिक्षकांना सक्षम बनविणे, तसेच शिक्षकांचे जीवनातील महत्त्व आणि गरज लक्षात आणून देणे आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

👉 दरवर्षी भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो शिक्षक दिन जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून 👈

या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. या दिवशी शिक्षकांचा सत्कार आणि आभार व्यक्त केले जातात. याशिवाय शिक्षकांना येणाऱ्या समस्यांवरही चर्चा केली जाते. ५ ऑक्टोबर १९६७ या दिवशी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी ‘शिक्षकांचा दर्जा’ या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या. त्या अनुषंगाने १९९४ पासून युनेस्को तर्फे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातोय. जागतिक शिक्षक दिनाची सुरुवात फ्रान्स मध्ये १९६६ मध्ये झाली. हा तो काळ होता जेव्हा शिक्षकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच शिक्षकांसाठी काही विशेष अधिकार निर्माण करण्यासाठी युनेस्को ऑर्गनायझेशन ऑफ नॅशनल असोसिएशनने हा निर्णय घेतला होता. ज्या अंतर्गत ५ ऑक्टोबर १९६६ रोजी फ्रान्स मध्ये एक करार झाला होता. त्याचे नाव होते ‘Teaching to Freedom’. त्यानंतर शिक्षकांच्या परिस्थितीत बरीच सुधारणा दिसून आली. तेव्हा पासून दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला. जगभरातील सर्व गुरुजनांना, जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

👉 शिक्षक दिना बद्दल महत्त्वपूर्ण माहिती लेख व प्रश्नमंजुषा प्रमाणपत्रासह त्यासाठी या ओळीला स्पर्श करा 👈

Leave a Comment

error: Content is protected !!