Withdraw Amount From DCPS NPS account
Defined Contribution Pension Scheme And National Pension Scheme
Withdraw Amount From DCPS NPS Account
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग जिल्हा कोषागार कार्यालय,
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (प.) ४०० ६०१
दुरध्वनी क्र. ०२२-२२५४४५५८४,२५३४११६२ Email to.thane@zillamahakosh.in
सुचना
डी सी पी एस / एन पी एस खात्यातुन परतावा रक्कम खालील कारणासाठी काढता येते. त्यासाठी समोर दखविण्यात आलेली कागदपत्रांची आवश्यकता आहे. सदर रक्कम ही कर्मचारी यांचे खात्यात जमा असलेल्या एकुण रक्कम पैकी त्यातील शासनाच्या हिस्याची जमा रक्कम व एकुण जमा व्याज रक्कम वजा जाता केवळ आपल्या हिस्याच्या जमा रक्कमे पैकी जास्तीत जास्त २५ टक्केच रक्कम काढता येते.
Withdraw amount from DCPS / NPS account
🙋 Also Read – हे ही वाचाल –
अ.क्र. | कारण | आवश्यक पेपर |
१ | स्वतःसाठी घरबांधणी घर खरेदी साठी | १) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) नोंदणीकृत करारनामा / जुने घर असल्यास घरपट्टी व स्थानिक प्राधिकारी यांचे ना हरकत दाखला ३) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ४) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ५) परतावा रक्कम हयाच कारणासाठी वापरणार असलेबाबत रु.१००/-च्या स्टॅम्पवर हमीपत्र ६) बँकेचे शिल्लक हप्ते बाबतचे स्टेटमेंट वरील सर्व कागदपत्रे मुळ + एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे. |
२ | मुलांना उच्चशिक्षण घेणे साठी | १) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ३) प्रवेश निवड यादीची प्रत ३) मुलाचे बोनाफईड ४) प्रवेश घेणा-या संस्थेचे फी बाबत अंदाजपत्रक ५) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ६) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत – वरील सर्व कागदपत्रे दोन प्रतीत (मुळ + एक प्रत) कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे. |
३ | मुलांच्या लग्नासाठी | १) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ३) लग्नाची पत्रीका ३) कुटुंबाचा दाखला ४) मुलाचे आधारकार्ड ५) लग्नाच्या खर्चाचे अंदाजपत्रक ६) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ७) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मुळ एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे. Withdraw Amount From DCPS NPS Account |
४ | कुटुंबातील अवलंबीत सदस्याच्या आजारपणासाठी | १) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रह केलेला धनादेश ३) दवाखान्याचे खर्चाचे अंदाजपत्रक ३) कुटुंबाचा दाखला ४) आजारी व्यक्तीचे आधारकार्ड ५) परतावा रक्कम हयाच कारणासाठी वापरणार असलेबाबत रु.१००/-च्या स्टॅम्पवर हमीपत्र ६) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ७) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मुळ एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे. |
५ | कुटुंबातील अवलंबीत सदस्याच्या कोवीड- १९ आजारपणासाठी | १) स्वतःचा मागणी अर्ज (आवश्यक माहिती भरुन) कार्यालया मार्फत २) कर्मचा-याचा रद्द केलेला धनादेश ३) दवाखान्याचे खर्चाचे अंदाजपत्रक ३) कोवीड – १९ असलेबाबत डॉक्टरचे प्रमाणपत्र ४) कुटुंबाचा दाखला ४) आजारी व्यक्तीचे आधारकार्ड ५) ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत (टीओ ला फॉरवर्ड केलेल्या) ६) कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवापुस्तकाची छायांकित प्रत वरील सर्व कागदपत्रे मूळ + एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करुन पत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे |
शासन निर्णय – वाचण्यासाठी किवां पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध