Webinar On STEM Robotics For Students
Webinar On STEM Robotics For Students
Guided Webinar 2025 on STEM and Robotics scert live link
Guided Webinar 2025 on STEM and Robotics
वेबिनारचा विषय STEM व रोबोटिक्स
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/वि.वि/सेशन/२०२४/०६३४०
दि २७/१२/२०२४
विषय :- STEM व रोबोटिक्स या विषयावर आयोजित मार्गदर्शन वेबिनार २०२५ बाबत….
संदर्भ :-. मा. संचालक, प्रस्तुत यांनी दिलेले निर्देश दि. २४/१२/२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानविषयक आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी शालेय स्तरावरून कोडींग, कृत्रिम बुद्धिमत्ता इ. विषयांच्या संदर्भात आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने राज्य शासनामार्फत शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी यांचेसाठी प्रशिक्षण, रोबोटिक लॅब व इतर साहित्य उपलब्ध करून देणे, मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्राचे आयोजन करणे इ. अनेक शैक्षणिक उपक्रम घेण्यात येत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रातील संधी |
कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रातील संधी या बद्दल अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून |
शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या रोबोटिक लॅब, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा इ. साहित्याच्या प्रभावी वापरातून रोबोटिक्स संदर्भात होणाऱ्या स्पर्धांमध्ये प्रोटोटाईप कसे तयार करावेत. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागासाठी माहिती होणे यासाठी उद्बोधनपर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनारचा तपशील पुढीलप्रमाणे-
अभ्यास कसा करावा मार्गदर्शन सत्र नक्की बघा या ओळीला स्पर्श करून
वेबिनारचा विषय STEM व रोबोटिक्स
दिनांक व वेळ – दि. ०१/०१/२०२५ रोजी दुपारी ४ ते ५:३० वाजता
यु-ट्यूब लिंक –
Online Webinar Session for Class V to Class X Students
सदर ऑनलाईन वेबिनार सत्र इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोटोटाईप सादर करणे आणि रोबोटिक्स व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धामध्ये सहभागी होणे इ. विषयी माहिती होण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते इयत्ता
दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी वेबिनार सत्रामध्ये सहभागी होतील या दृष्टीने आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी.
परिपत्रक पीडीएफसाठी या ओळीला स्पर्श करा
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे-
Also Read –
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चर्चा प्रज्ञावंतांशी - क्षेत्र रोबोटिक्स (Interaction with Super Talented Students) या मासिक ऑनलाईन वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाणार आहे.
याचे पहिले पुष्प ज्यांच्यासमवेत गुंफले जाणार आहे ते आहेत…
प्रज्ञावंत
क्रिश कल्ला
इयत्ता 11 वी
School : Phillips Exeter Academy, USA
मुलाखतकार
राहूल रेखावार भा.प्र.से.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
दिनांक: दि. 1 जानेवारी 2025
वेळ : 4.00 pm
युट्युब लिंक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्य
Good question
Hii, my name is Vijay Hiraman Tagad
Restitution number