Vyvsay Din Margdarshan Saptah for Students
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र.राशैसंप्रपम/VGPG / व्यवसाय मार्गदर्शन दिन / २०२५-२६
दिनांक, १/१/२०२६
विषय: सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १४ जानेवारी व्यवसाय मार्गदर्शन दिनानानिमित्त व्यवसाय
मार्गदर्शन साप्ताह राबविण्याबाबत
संदर्भ : जा.क्र. राशैसंप्रपम/व्यमावसमुवि/व्य मा दिन/२०२४-२५/०६४२२, दि. ३०/ १२ / २०२४
उपरोक्त विषयान्वये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध संधी व कोर्सेसची माहिती व्हावी म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिवर्षी १४ जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यस्क्रम आराखडा २०२३ व राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्याबाबतचे महत्व अधोरेखित केले आहे.
यासाठी इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग असणाऱ्या शाळांना व्यवसाय मार्गदर्शन दिनाच्या औचीत्यानुसार या संबंधी लाभ मिळावा म्हणून दिनांक १४ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सप्ताह साजरा करण्यात येत आहे. हा सप्ताह साजरा करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये खालील नियोजनानुसार कार्यक्रम राबविण्यात येण्या संबंधी सूचना देण्यात याव्यात.
अ उपक्रम आयोजनाचा घ्यावयाचा उपक्रम
दिनांक
दिनांक १४ जानेवारी
करिअरच्या विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने करिअर विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे.
२०२६
२ दिनांक १५ जानेवारी
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रण देऊन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे.
२०२६
३ दिनांक १६ जानेवारी
यशस्वी व्यावसायिकास विद्यालयात आमंत्रित करून यशस्वी व्यवसायाचा मंत्र या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे.
दिनांक १७ जानेवारी उद्योग कारखाना लघु उद्योग / ग्रामीण उद्द्योग केंद्रास भेटीचे आयोजन करून
विद्याथ्यर्थ्यांकडून सविस्तर अहवाल लेखन करून घ्यावे. २०२६
दिनांक १९ जानेवारी
सर्व पालक विद्यार्थी यांना माय करिअर अडवायझर एप तमन्ना चाचणी व करिअर कार्डस बाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून मार्गदर्शन उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे.
२०२६
२०२६
फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत
६ दिनांक २० जानेवारी परिषदेमार्फत २५ ते २७ नोवेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या व परिषदेच्या यु ट्यूब channel वर उपलब्ध ताण तणाव व्यवस्थापन वेबिणार बाबत विद्यार्थी व पालकांना माहिती द्यावी व उपलब्ध वेळेनुसार त्याचा लाभघेण्यास प्रेरित करावे.
मानसशास्त्र तज्ञांचे व्याख्यान आयोजित करावे.
७दिनांक २१ जानेवारी करिअर मेळ्याचे आयोजन करणे. यासाठी परिसरातीत उद्योजक कंपनी
२०२६ /कारखाने येथील व्यवस्थापक यांना बोलवून त्यांच्याकडे असणारी रिक्त पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता देण्यात येणारे वेतन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दयावी.
उपरोक्त संदर्भानुसार सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग असणाऱ्या सर्व शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित शाळांमध्ये केंद्र स्थापन झाले आहेत याबाबत खात्री करावी. सदर सप्ताह या केंद्राच्या समन्वयाने राबविण्यासाठी सूचित करण्यात यावे.
या कालावधीत सर्व आपल्या अधिनस्त सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांच्या शाळा भेटीचे नियोजन करून जिल्ह्यातील इयता ९ वी ते १२ वीच्या जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्यात याव्यात. या भेटीबाबतचा अहवाल गुगल लिंक द्वारे संकलित करण्यात येणार आहे.

Date: 05-01-2026
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Vyvsay Din Margdarshan Saptah for Students
Vyvsay Din Margdarshan Saptah SCERT Guidelines
विषय : व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्याबाबत….
संदर्भ : जा क्र. रा शैसंप्रपम/व्यमावसमुवि/समुपदेशन केंद्र / २०२४-२५/०६२३९दिनांक २२/१२/२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध संधी व कोर्सेसची माहिती व्हावी म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिवर्षी १४ जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा म्हणून इयत्ता ९ ते १२ वीचे वर्ग असणाऱ्या संबंधित शाळांना खालील प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगून व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सूचित करण्यात यावे.
Maharashtra Career Guidance Portal LINK
यासाठी खालीलप्रमाणे दिवसनिहाय नियोजन करून उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
१ एक दिवस करिअरच्या विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने करिअर विषय मार्गदर्शन
आयोजित करावे – दि. १४ जानेवारी २०२५
२ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे- दि. १५ जानेवारी २०२५
३ यशस्वी व्यावसायिकास विद्यालयात आमंत्रित करून यशस्वी व्यवसायाचा मंत्र या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे. दि. १६ जानेवारी २०२५
४ राज्यस्तरावर करिअर मार्गदर्शन संदर्भात प्रस्तुत परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या वेविणार मालिकेचे प्रसारण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. शाळेत विद्यार्थ्यांना सदर प्रसारण उपलब्ध करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी- दि. १७ जानेवारी २०२५
५ विद्यालय स्तरावर जवळपास असणारे कारखाने, लघु उद्योग यांना भेट देण्यास विद्यालय स्तरावर सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय, उद्योग याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगावा. दि. १८ जानेवारी २०२५


६ इयत्ता ९ वी ते १२ वीच्या पालकांसाठी पालकांची अपेक्षा, विद्यार्थ्याची आवड व त्यांची क्षमता व उपलब्ध करिअर करिअर मार्ग याबाबत शाळा व्यवस्थापन / व्यवस्थापन विकास समिती बैठकीत मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे दि. २० जानेवारी २०२५
७ येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या १० वी व १२ वी च्या वोर्ड परीक्षांची पार्श्वभूमीनुसारमानसशास्रातील तज्ञांचे परिक्षा व ताण तणावाचे निवारण यावर सत्र आयोजित करावे.
दि.२१ जानेवारी २०२५ उपरोक्त संदर्भानुसार सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
सदर सप्ताह या केंद्राच्या सहाय्याने शाळेमध्ये रावविण्यास सांगण्यात यावे. सदर सप्ताहादरम्यान आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय अधिकारी यांच्या शाळा भेटीचे नियोजन करून जिल्ह्यातील इयत्ता ९ ते १२ वीच्या जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्यास सूचना देण्यात याव्यात. या भेटी दरम्यान प्रस्तुत परिषदेमार्फत प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३ ते ४ या दरम्यान आयोजित करिअर मार्गदर्शक वेविणारबद्दल माहिती देण्यात यावी. सदर भेटीसंदर्भात लिंकद्वारे भेटीचा अहवाल संकलित करण्यात येणार आहे.
परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
(राहूल रेखावार भा प्र से) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
Career Guidance Program for Students By SCERT Guidelines