राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या युडीआयडी कार्डची पडताळणी आदेश Verification of UDID Card in ST Bus

Verification of UDID Card in ST Bus

Verification of UDID Card in ST Bus

Verification of UDID cards of Divyang persons availing travel concession in ST buses

Regarding verification of UDID cards of disabled persons availing travel concession in R.P. Corporation buses

Maharashtra State Road Transport Corporation

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई-०८

gmtraffic msrtc

क.राप/वाह/सवलत / ३७९

दिनांकः-२२/०१/२०२६

प्रति,
प्रादेशिक व्यवस्थापक, सनियंत्रण समिती क्र. १, २, ३, ४, ५ व ६

विभाग नियंत्रक,
रा.प.मुंबई/पालघर/रायगड (पेण)/ रत्नागिरी/सिंधुदूर्ग/ठाणे/नाशिक/धुळे/जळगांव/अहिल्यानगर/पुणे/कोल्हापूर/सांगली/सातारा/सोलापूर/छत्रपती संभाजीनगर/बीड/जालना/लातूर/नांदेड/धाराशिव/परभणी/नागपूर/भंडारा/चंद्रपूर/वर्धा/गडचिरोली/अमरावती/अकोला/यवतमाळ /बुलडाणा विभाग.

विषयः- रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास सवलतीचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींच्या UDID कार्डची पडताळणी करण्याबाबत.

संदर्भः- दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र. संकिर्ण-२०२६/प्र.क्र. ०४/कार्यासन-३, दि.०६/०१/२०२६.

उपरोक्त विषयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ तसेच शासनस्तरावरुन वेळोवेळी निर्गमित आदेशांनुसार राज्य परिवहन महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात येत आहे. सदर सवलतीचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर असुन, या सवलतीचा लाभ केवळ पात्र दिव्यांग व्यक्तींनाच मिळावा यादृष्टीने पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार कळविलेले आहे.

सदर पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, शासनाने प्रदान केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (UDID) कार्डची पडताळणी करीता रा.प. आगारातील सर्व वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच रा.प. विभागीय कार्यालयातील मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी मोबाईलमध्ये UDID Dept. of Empowerment pf PWD

LINK

https://play.google.com/store/apps/details?id=com.swavlambancard.udid

हे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करुन UDID कार्ड तपासणी करणेबाबत सुचना देण्यात यावे.

१) प्रवासावेळी दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (UDID) कार्डचा क्रमांक व जन्म दिनांक नमुद करुन कार्डच्या वैधतेची पडताळणी करावी.

२) पडताळणीवेळी UDID कार्ड वैध असल्यास दिव्यांग व्यक्तींस प्रवास सवलत देण्यात यावी.

३) तसेच UDID कार्ड बनावट, अवैध व चुकीचे असल्याचे आढळुन आल्यास, सदर ओळखपत्र जप्त करण्यात यावे व आगारात जमा करण्यात यावे.

४) आगाराद्वारे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम-९१ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.

५) रा.प. आगार व विभागीय स्तरावर ओळखपत्र जप्त केल्याच्या नोंदी दप्तरी ठेवण्यात याव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल दरमहा या कार्यालयास सादर करण्यात यावा.

६) सदरची कार्यवाही करतांना प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

सोबत संदर्भित पत्र पीडीएफ प्रत लिंक

महाव्यवस्थापक (वाहतूक)
२१/१/२६

Verification of UDID Card in ST Bus रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या UDID कार्डची पडताळणी करण्याबाबत.
Verification of UDID Card in ST Bus रा.प. महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या UDID कार्डची पडताळणी करण्याबाबत.

Leave a Comment

error: Content is protected !!