Veer Gatha 5.0 Project
Veer Gatha 5.0 Project
Regarding the implementation of the Veer Gatha 5.0 project.
जा.क्र./राशैसंप्रपम/सा.शा.वि/वीर गाथा ५.० वे.ब. / २०२५
दिनांकः ०१/११/२०२५
विषय: वीर गाथा ५.० प्रकल्प मुदतवाढ बाबत.
संदर्भ : १. Hon. Joint Secretary, Government of India, Ministry of Education, Department Of School Education and Literacy, Shastri Bhawan, New Delhi Date: 01/09/2025
२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र SCERT-50.0/77/2025-SOCIAL SCI I/1427104/2025 दि.१६/०९/२०२५
३. Hon.K. C. Meena, Under Secretary to the Government of India यांचे पत्र F.No. ४-११२०२९-PMP-६ (Part-१) Government of India Ministry of Education (Department of SchoolEducation & Literacy) Dated: ३०th September, २०२५
४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र SCERT-50.0/77/2025-SOCIAL SCI I/1462636/2025 दि.०१/१०/२०२५
५. Hon. Under Secretary to the Government of India यांचे पत्र F.No. ४-१/२०२५-PMP-६ (Part-१)Government of India Ministry of Education (Department of School Education & Literacy) Dated: ३१st October, २०२५
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वीर गाथा ५.० हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. संदर्भ क्र. २ नुसार वीर गाथा ५.० प्रकल्प राबविणेबाबत कळविण्यात आलेले आहे.
संदर्भ क्र. ५ नुसार सदर वीर गाथा ५.० प्रकल्पाच्या वेळापत्रकात बदल झाल्याचे कळविण्यात आलेले आहे. तरी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी पर्यंत वीर गाथा ५.० प्रकल्प मधील स्पर्धा घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या MYGOV या पोर्टलवर वीर गाथा ५.० स्पर्धेची माहिती पत्रात दिलेल्या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे भरण्यात यावी. शाळांना MyGov पोर्टलवर नोंदणी करण्याची मुदत दिनांक १० नोव्हेंबर २०२५ अखेर वाढविण्यात आलेली आहे. तदनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करावे. पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना देखील अवगत करावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
सोबत – सुधारित वेळापत्रक
उपसंचालक
सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे

F.No. 4-1/2025-PMP-6 (Part-1)
Government of India
Ministry of Education
(Department of School Education & Literacy), New Delhi
Dated: 31st October, 2025
Subject: Revision in timeline for Project Veer Gatha 5.0-reg.
The undersigned is directed to refer to the ongoing Project Veer Gatha 5.0 competition and the timelines revised vide letter No. 4-1/2025-PMP.6(Part-1) dated 30.09.2025.
- The participation levels across the country have been assessed and the school-level activity period (8th September to 31st October, 2025) is nearing completion.
- In view of requests for extension of timeline made by States / UTs and in order to maximise the participation across all States and Union Territories, it has been decided to extend the timeline for school-level activities up to 10th November, 2025. The timelines for district-level, state-level, and national-level evaluations have also been revised accordingly and attached as Annexure.
- The concerned Nodal Officers are requested to disseminate this information to all District Nodal Officers and Schools within their jurisdiction.
This issues with the approval of the Competent Authority.
Encl as above.
Under Secretary to the Government of India
To
State Nodal Officers (SNOs) for Veergatha 5.0 of all States/UTs.
Copy to:-
- MyGov Team with a request to publish the revised timeline on the portal.
- Chairman, CBSE for coordination with CBSE-affiliated schools.
- Ministry of Defence – for information and further necessary action.

ALSO READ 👇
जा.क्र./राशैसंप्रपम/सा.शा.वि/ वीर गाथा ५.०/ २०२५
दिनांकः /०९/२०२५
विषय: वीर गाथा ५.० प्रकल्प राबविणेबाबत …
संदर्भ : Hon. Joint Secretary, Government of India, Ministry of Education, Department Of School Education and Literacy, Shastri Bhawan, New Delhi Date: 01/09/2025
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वीर गाथा ५.० हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
Gallantry Awards Portal (GAP) अंतर्गत वीर गाथा प्रकल्पाची स्थापना सन २०२१ मध्ये करण्यात आली. देशातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित प्रकल्प/उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून (कला, कविता, निबंध, मल्टिमिडिया) प्रकल्प सादर करता येतात. सर्वोत्तम प्रकल्पांना संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येते. हा उपक्रम दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याबरोबर साजरा करण्यात येतो.
मा. शिक्षण मंत्री, भारत सरकार यांनी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक शाळेत “वीर गाथा कॉर्नर” स्थापन करण्याची शिफारस केली आहे. जेथे विद्यार्थ्यांचे कलागुणांचे प्रदर्शन करता येईल व त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी तयार करता येईल.
राज्यातील सर्व व्यवस्थानाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांची MYGOV या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता /परिच्छेद / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing) / Multi-Media Presentation / Short Video (Anchoring/Storytelling/Reporting) असे विविध प्रकल्प करू शकतात. सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.
शालेय स्तरावर इयत्तानिहाय पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धांचे आयोजन केले जावे.
विषय आणि वर्गवारी
वीर गाथा प्रकल्प ५.० स्पर्धाच्या काही महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे-
१. शाळांनी वीर गाथा प्रकल्प ५.० मधील कविता / परिच्छेद / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing)/Multi-Media Presentation / Short Video (Anchoring/Storytelling/Reporting) इ. सर्व प्रवेशिका नोंदणी MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावी.
२. शाळा स्तरावरून MYGOV या पोर्टलवर अपलोड झालेल्या नोंदणी जिल्हा स्तरावर रुब्रीक्स मूल्यांकन Annexure । अवलोकन करून, मूल्यांकन करावे. वीर गाथा प्रकल्प ५.० साठी मूल्यमापनासाठी तीन स्तर असतील. त्यामध्ये जिल्हा स्तर, राज्य/केंद्र शासित प्रदेश स्तर आणि राष्ट्रीय स्तर प्रत्येक स्तरावर विजेते असतील. घोषित करण्यात येणाऱ्या विजेत्याची संख्या पुढील प्रमाणे असेलः
जिल्हास्तर- ०४ विजेते (प्रत्येक श्रेणीतील एक) यांची निवड जिल्हा स्तरावर करण्यात यावी. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राज्य स्तरावर करण्यात यावे. (श्रेणी १ व २ मधून प्रत्येकी १ विजेता आणि श्रेणी ३ मधून २ विजेते यात इयत्ता ९ वी ते १० वी मधून १ विजेता व इयत्ता ११ वी १२ वी मधून १ विजेता)
राज्यस्तर – ०८ (प्रत्येक श्रेणीतील दोन) यांची निवड राज्य स्तरावर करण्यात येईल. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल. (श्रेणी १ व २ मधून प्रत्येकी २ विजेते आणि श्रेणी ३ मधून ४ विजेते यात इयत्ता ९ वी ते १० वी मधून २ विजेते व इयत्ता ११ वी १२ वी मधून २ विजेते)
राष्ट्रीय स्तरावरील १०० विजेते (सुपर १००) असतील. त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणेः
श्रेणी १ : इयत्ता ३ री ते ५ वी २५ विजेते
श्रेणी २: इयत्ता ६ वी ते ८ वी २५ विजेते
श्रेणी ३: इयत्ता ९ वी ते १२ वी ५० विजेते (इ.९ वी ते १० वी मधून २५ विजेते व इ.११ वी ते १२ वी मधून २५ विजेते)
३. विजेत्यांचा सत्कार – राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा संयुक्तपणे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सत्कार केले जाणार आहेत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी पर्यत वीर गाथा ५.० प्रकल्प मधील स्पर्धा घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या MYGOV या पोर्टलवर वीर गाथा ५.० स्पर्धेची माहिती पत्रात दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरण्यात यावी. तदनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करावे. पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना देखील अवगत करावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
सोबत – 1. VEER GATHA 5.0 CONCEPT NOTE.
- DISTRICT NODAL OFFICER LIST.
Websites for References: The Following links can be referred by Schools:
i. ii. Website-
to know in detail about the brave-hearts. NCERT book on Paramvir Chakra Awardees at the link:
https://ncert.nic.in/pdf/publication/otherpublications/veergatha.pdf
उपसंचालक
सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे- ३०
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.
५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
६. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
७. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (सर्व)



