Varishtha Nivad Shreni Aashwasit Pragati Yojna
Varishtha Nivad Shreni Aashwasit Pragati Yojna
वरिष्ठ व निवड श्रेणी, आश्वासित प्रगती योजना
वरिष्ठ व निवड श्रेणी, आश्वासित प्रगती योजना ही पदोन्नतीची कुंठीता घालविण्यासाठी निर्माण केलेली योजना आहे. म्हणजे वरिष्ठ व निवड श्रेणी, आश्वासित प्रगती योजना ही पदोन्नतीशी संलग्न योजना आहे.वरिष्ठ वेतन श्रेणी सलग एकाच पदावर १२ वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना तर निवड श्रेणी सलग एकाच पदावर २४ वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना मंजूर केली जाते.
वरिष्ठ व निवडश्रेणी ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षकांना तर २ लाभांची आश्वासित प्रगती योजना ही शासकिय निमशासकीय कार्यालयालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसह अध्यापक विद्यालय,अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लागु होते असे वित्त विभाग महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहीतीचा अधिकारात दिलेली माहितीवरून व शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक १४ मार्च २०२४ च्या निर्गमित शासन निर्णयानुसार दिसुन येते.
वरिष्ठ व निवड श्रेणी टप्पा १२/२४ हा नोकरी सुरू दिनांकांपासुन सलग एकाच पदावर १२ वर्षे ज्या वर्षी होतील त्याच वर्षी व निवड श्रेणी २४ वर्षे सलग एकाच पदावर ज्या वर्षी पुर्ण होतील त्याच वर्षी स्थानिक प्रशासने मंजूर केली पाहिजे. कारण वरिष्ठ व निवड श्रेणी, आश्वासित प्रगती योजना ही पदोन्नतीशी निगडीत असल्याने पदोन्नती प्रक्रीया जशी दरवर्षी स्थानिक प्रशासन स्तरावर राबविली जाते त्यानुसार वरिष्ठ व निवड श्रेणी, आश्वासित प्रगती योजना दरवर्षी मंजूर करण्याची प्रक्रीया स्थानिक प्रशासनाने मंजूर करण्याची प्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त आहे. पण तशी कार्यवाही केली जात नाही. काही जिल्ह्यांमध्ये २/४ वर्षांनी, काही जिल्ह्यांमध्ये ५/६ व ८/१० वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर करण्याची प्रक्रिया राबविली जाते
त्यामुळे पात्र शिक्षक सेवानिवृत्त सुध्दा होतात. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र असलेल्या शिक्षकांची संख्या वाढते. वरिष्ठ व निवड श्रेणी ही प्रक्रिया पदोन्नती प्रक्रीयेप्रमाणे दरवर्षी राबविली तर पात्र शिक्षकांची संख्या कमी असते. यात निवडश्रेणीस पात्र शिक्षकांना संख्या कमी असते कारण बहुतांश शिक्षकांना पदोन्नती मिळाल्याने ही संख्या कमी होत व निवड श्रेणी फक्त १०० पैकी २०% सेवाज्येष्ठ शिक्षकांना मंजूर केली जाते. आश्वासित प्रगती योजनेचा टप्पा हा १०:२०:३० आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी ही नियमित सेवाज्येष्ठतेनुसार दरवर्षी मंजूर करण्याची प्रक्रिया राबविली तर पात्र सर्व शिक्षकांना नियमाप्रमाणे वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर होईल.