Use Of SSO MahaID Mandatory Mahasarthi Project
Use Of SSO MahaID Mandatory Mahasarthi Project
Use Of SSO MahaID Mahasarthi Project
Regarding making the use of MahaID mandatory as the single login mechanism (Single Sign On (SSO)) to avail all schemes and services of the Maharashtra Government and ensuring a mechanism to implement the Mahasarathi project.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी एकमेव लॉगिन यंत्रणा (Single Sign On (SSO)) म्हणून महाआयडीचा वापर अनिवार्य करणे तसेच महासारथी प्रकल्प राबविण्यासाठी यंत्रणा सुनिश्चित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (मातं)
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-१७२५/प्र.क्र. २५१/मातं हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: २७ मार्च, २०२६
प्रस्तावनाः
महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांचे लाभ थेट हस्तांतरण पध्दतीने (डीबीटी) वित्तरित करते. यामध्ये अनुदान व रोख मदत इत्यादींचा समावेश आहे. हे लाभ व्यक्ती, कुटुंबे, महामंडळे, खाजगी सेवा प्रदाते, सार्वजनिक सेवा संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांना हस्तांतरीत केले जातात. याव्यतिरिक्त, राज्य शासन नागरिकांना अनेक सेवा प्रदान करते. अशा प्रकारे कल्याणकारी योजनांसाठी थेट लाभ हस्तांतरीत करताना किंवा सेवा प्रदान करताना राज्य शासनाच्या विविध विभागांच्या विविध सेवा नागरीकांना पुरविताना शासनास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सामाजिक लाभाच्या योजनांच्या अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी एकमेव लॉगिन यंत्रणा (Single Sign On (SSO)) म्हणून महाआयडीचा वापर अनिवार्य करणे तसेच महासारथी प्रकल्प राबविण्यासाठी यंत्रणा सुनिश्चित करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती.
शासन निर्णयः
महासारथी पोर्टल चा वापर करून प्रत्येक लाभार्थ्यास महाआयडी उपलब्ध करुन देणेबाबत तसेच या महाआयडीचा एकमेव साईन-ऑन (SSO) यंत्रणा म्हणून वापर अनिवार्य करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
१. नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी महाआयडी प्रदान करण्यात येईल. सदर महाआयडी दिनांक १ मे, २०२६ पासून अनिवार्य करण्यात येत आहे. याकरिता www.mahasarathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
२. महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधीनस्त कार्यालये, महामंडळे, सार्वजनिक सेवा संस्था, शैक्षणिक संस्था इ. यांना त्यांच्या संबंधित पोर्टल अथवा डेटाबेस मध्ये महाआयडी संलग्न (SEED) करणे अनिवार्य असेल.
३. महासारथी प्रकल्प राबविताना नागरीकांच्या माहितीच्या संरक्षणाबाबत अस्तित्वात असलेले सर्व कायदे/नियमांच्या तरतुदी उदाहरणार्थ आधार कायदा २०१६, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायदा २०२३, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० इत्यादी लागू राहतील.
४. महासारथी प्रकल्पाची प्रभावी आणि कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, संपूर्ण नियोजन, समन्वय आणि प्रकल्प देखरेखीसाठी एक मजबूत प्रशासकीय संरचना तयार करणे आवश्यक आहे. त्यानुसार महासारथी प्रकल्पासाठी “महासारथी प्रकल्प शिखर समिती (MahaSarathi Project Apex Committee)”. “महासारथी प्रकल्प कार्यकारी समिती (MahaSarathi Project Executive Committee)” व महासारथी प्रकल्प अंमलबजावणी समिती (MahaSarathi Project Implementation Committee) या समित्यांची स्थापना तसेच सदर समित्यांची कार्यकक्षा निश्चित करण्यात येत आहे.
अ) महासारथी प्रकल्प शिखर समिती (MahaSarathi Project Apex Committee)
महासारथी प्रकल्प शिखर समितीची रचना खालीलप्रमाणे असेल:-
