UDISE PLUS 2025 MBU UPDATE राज्यातील विद्यार्थ्यांचे MBU (Mandatory Biometric Update) आणि आधार व्हॅलिडेशन बाबत कार्यवाही करण्याबाबत

UDISE PLUS 2025 MBU UPDATE

UDISE PLUS 2025 MBU UPDATE

F. no. HQ-16034/1/2021-EU-I-HQ-Part(1)

Unique Identification Authority of India (UIDAI)

(Enrolment and Update-1 Division)

7th floor, UIDAI Head, New Delhi-110001

Dated: 29th September 2025

OFFICE MEMORANDUM

Subject: Waiver of charges for Mandatory Biometric Update-1 (MBU-1) of children aged 7 to 15 years-reg.

An Aadhaar number holder is required to update his/her Aadhaar with the biometric information upon attaining the age of 5 and 15 years. The Mandatory Biometric Update (MBU) service is free of cost to the children in the age groups of 5-7 years and 15-17 years.

2 In order to reduce the MBU pendency in mission mode, the Authority has decided to waive off the charges to be collected from the Aadhaar number holders for carrying out MBU-1 in the age group of 7-15 years for a period of one year, w.e.f. 1.10.2025.

  1. This is issued with the approval of competent authority.

Circular pdf copy

Deputy Director

UDISE PLUS 2025 MBU UPDATE
UDISE PLUS 2025 MBU UPDATE

To

  1. UIDAI Tech Centre
  2. All UIDAI Regional Offices
  3. Director, Media Division HO (with a request to provide wide publicity)
  4. Director, CRM
  5. File.

ALSO READ 👇

IMG 20250911 043615
UDISE PLUS 2025 MBU UPDATE

UDISE PLUS 2025 MBU UPDATE

Regarding action regarding MBU (Mandatory Biometric Update) and Aadhaar validation of students in the state

विषय :- राज्यातील विद्यार्थ्यांचे MBU (Mandatory Biometric Update) आणि आधार व्हॅलिडेशन बाबत कार्यवाही करण्याबाबत.

संदर्भ :- : १. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांचे मार्गदर्शक सूचना व आदेश.

२. शासन निर्देशः संकिर्ण-२०२३/प्र.क्र. ६९/एस.डी. ३ दि.०१.०९.२०२५.

३. इंडिया पोस्ट विभाग व शालेय शिक्षण विभाग यांची संयुक्त व्हिसी दि. ०९.०९.२०२५.

राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून सुमारे २,०५,६०३८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी १,९२,३५१६९ विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरलेले आहेत. सदरचे प्रमाण हे ९३.५५% इतके आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गटसाधन केंद्रावर २ असे एकूण ८१६ आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्यासाठी योग्य ते नियोजन क्षेत्रीयस्तरावर करुन कार्यवाही करणेत यावी.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्यामार्फत बालकांच्या ५ ते ७ व १५ ते १७ या वयोगटातील MBU आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने देशातील सर्व शाळांना आवाहन केले आहे. यासाठी UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना विशेष शिबिरे आयोजित करण्याची सूचना केली आहे. याकरिता UIDAI व शिक्षण मंत्रालयाने संयुक्त उपक्रम राबवत युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटची स्थिती उपलब्ध करून दिली आहे. सदर युडायस प्रणालीमध्ये विद्यार्थांची आधार प्रमाणीत माहिती यापुढे बंधनकारक असून त्याचा उपयोग विविध योजना व विद्यार्थी लाभांशी जोडण्यात येणार आहे.

तसेच NEET, JEE, CUET यांसारख्या स्पर्धा व विद्यापीठ परीक्षांमध्ये नोंदणी करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अडचणी येऊ नयेत याकरिता वेळेत बायोमेट्रिक अपडेट करणे महत्त्वाचे असल्याचे UIDAI ने स्पष्ट केले आहे. आधार अद्ययावत करणे बाबतची प्रक्रीया शाळांमधून शिबिरांच्या माध्यमातून अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते.

UDISE PLUS पोर्टलवरील माहितीचा आढावा घेतला असता एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ५ ते ७या वयोगटातील ३८,९२,२३२ आणि १५ ते १७ वयोगटातील २३,७७,७६८ अशी एकूण ६२,७०,००० एववधा विद्यार्थ्यांचे MBU (Mandetory Biometric Update) संदर्भातील काम प्रलंबित आहे. प्रस्तुत प्रलंबित काम दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्याच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

सर्व प्रथम सर्व शाळांनी UDISE Plus या पोर्टलवरुन आपल्या शाळेतील MBU (Mandetory Biometric Update) करीता प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी तयार करुन ठेवावी.

सदर माहिती तयार करण्याची कार्यपध्दती सोबत जोडण्यात आलेली आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी पोस्ट विभागाचे विभागीय अधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन प्राधान्याने MBU (Mandetory Biometric Update) बाबतचे कामकाज पूर्ण करुन घ्यावयाचे आहे व MBU (Mandetory Blometric Update) काम संपल्यानंतर कॅम्पच्या शेवटी शाळेतील आधार व्हॅलिडेशन आणि मिसमॅचबाबतचे काम पूर्ण करुन घ्यावयाचे आहे.

iv. भारतीय पोस्ट विभागामार्फत शिक्षण विभागाकडील MBU (Mandetory Biometric Update) बाबत मोठ्या प्रमाणात प्रलंबित असणाऱ्या शाळांकरीता आधार नोंदणी संघ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतचे कॅम्प मोडवर नियोजन तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी शाळानिहाय प्रलंबित विद्यार्थी संखेचा आढावा घेऊन करावयाचे आहे.

यामध्ये प्राधान्याने तालुक्यातील सर्वाधिक प्रलंबित विद्यार्थी संखेच्या शाळेत सदरचा MBU (Mandetory Biometric Update) कॅम्प आयोजन करणेत यावी.

vi. MBU (Mandetory Biometric Update) नियोजन करण्यात आल्यानंतर त्याप्रमाणे कामकाज सुरु असल्याची खात्री यादृच्छिक पध्दतीने शाळांना भेटी देऊन करण्यात यावे तसेच प्रस्तुत कामकाजाकरीता काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्वरीत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्यात याया

vii. तालुकास्तरावरुन युडायस प्लस पोर्टलवर लॉगिनकरुन दैनंदिन माहितीचा आढावा घेण्यात यावा व आवश्यकतेनुसार सर्व शाळा आणि आधार नोंदणी संच ऑपरेटर यांना निर्देश देण्यात यावेत.

viii. वरील कामकाज पूर्ण करण्याकरीता उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येऊन त्यांचा संपर्क क्रमांक पोस्ट विभाग व संचालनालयास कळविण्यात यावा जेणेकरुन जिल्ह्यातील MBU (Mandetory Biometric Update) बाबतच्या कामकाजाचा आढाया घेणे सुलभ होऊ शकेल.

वरील कामकाजाकरीता खालील प्रमाणे काही सूचना सर्व शाळांना लेखी स्वरुपात त्वरीत निर्गमित करण्यात यावेत.

अ. शाळा लॉगिनवरुन MBU (Mandetory Biometric Update) करीता प्रलंबित आणि आधार व्हॅलिडेशन बाबत प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी तयार करणेत यावी तसेच प्रत्यक्ष शिबिराच्या दिवशी MBU (Mandetory Biometric Update) करीता प्रलंबित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करणेत यावा.

  1. MBU (Mandetory Biometric Update) बाबत अपडेट करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी इयत्तानिहाय तयार करुन ठेवावी (विशेषतः एक्सेल मध्ये व एक हार्ड कॉपी)

इ. MBU (Mandetory Biometric Update) करीता विहित नमुन्यातील फॉर्म कॅम्पच्या अगोदरच पूर्ण करुन घेण्यात यावा,

ई. आधार नोंदणी व एमबीयु करण्यासाठी वर्ग खोली निवडताना भौतिक सुविधा, इंटरनेट नेटवर्क व

पक्का रस्ता आदी सुविधा असलेली वर्गखोली निवडावी आणि सर्व विद्यार्थ्यांना सोईची जागा निश्चित करण्यात यावी.

उ. ५ व १५ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या MBU (Mandetory Biometric Update) बाबत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तथापि शाळेतील प्रलंबित सर्व विद्यार्थी सदर दिवशी उपस्थित राहतील याची दक्षता संबंधित शाळांनी घ्यायी.

ऊ. शाळास्तरावर MBU (Mandetory Biometric Update) कामकाज पूर्ण झाल्यानंतर कॅम्पच्या शेवटी आधार व्हॅलिडेशनचे काम पूर्ण करुन घेण्यात यावे.

ऋ. MBU (Mandetory Biometric Update) कामकाज पूर्णपणे मोफत असून व्यतिरिक्त आधार विषयक इतर कामकाज करावयाचे असल्यास नियमानुसार शुल्क अदा करावे लागू शकते याचीही नोंद घ्यावी.

लू. सर्व मुख्याध्यापकांनी युडायस प्लस पोर्टलवर वेळोवेळी कॅम्पनंतर माहिती अद्यावत करावी व त्यानुसार खात्री करावी. दि. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी, अद्ययावतीकरण व एमबीयु (Mandetory Bio-metric) बाबतचे काम पूर्ण करून युडायस प्लस पोर्टलवर विद्याथ्यांच्या नावासमोर कॅम्पनंतर लगेच अपडेट करावे.

वरील सर्व मुद्यांच्या अनुषंगाने भारतीय पोस्ट विभाग आणि शिक्षण विभागाकडील आधार नोंदणी संच यांचे संयुक्तपणे नियोजन करुन राज्यातील सर्व शाळांमधील MBIU (Mandetory Biometric Update) आणि आधार व्हॅलिडेशन बाबतचे काम विहित कालावधीमध्ये पूर्ण करुन घेण्यात यावे.

(महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

परिपत्रक पीडीएफ लिंक

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य , पुणे

दिनांक:- ०९/०९/२०२५.

जा.क्र. प्राशिसं/आधार/२०२५/ ०३७०८०

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

३. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई

४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व

UDISE PLUS 2025 MBU UPDATE Link करणे म्हणजे काय ?

What does UDISE PLUS 2025 MBU UPDATE Mean

MBU (Mandatory Biometric Update) आधार कार्डमध्ये मुलांच्या बायोमेट्रिक माहितीचे अपडेट करणे अनिवार्य आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नुसार, 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील मुलांच्या आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फोटो अपडेट करणे आवश्यक आहे.

महत्वाचे मुद्दे :

5 ते 7 वर्षे: या वयोगटात MBU मोफत आहे. मुलांचे फिंगरप्रिंट आणि आयरिस पूर्णपणे विकसित झालेले नसतात, त्यामुळे हे अपडेट आवश्यक आहे. 7 वर्षांनंतर: जर MBU 7 वर्षांनंतर केले तर ₹100 शुल्क आकारले जाते. 15 ते 17 वर्षे: पुन्हा बायोमेट्रिक अपडेट आवश्यक आहे, आणि हे देखील मोफत आहे.

कुठे करावे :

आधार सेवा केंद्र, काही बँका किंवा पोस्ट ऑफिसमध्ये MBU करता येते.

MBU का गरजेचे :

MBU न केल्यास आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकते, ज्यामुळे शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती, सरकारी योजना (DBT) आणि इतर सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात.

प्रक्रिया :

जवळचे आधार सेवा केंद्र शोधा

https://uidai.gov.in

मुलाला घेऊन केंद्रावर जा. फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फोटो अपडेट करा. वेळेवर अपडेट करणे महत्त्वाचे आहे.

UDISE PLUS 2025 MBU UPDATE
UDISE PLUS 2025 MBU UPDATE

Leave a Comment

error: Content is protected !!