Syllabus for Upper Primary Scholarship Exam Class 7

Syllabus for Upper Primary Scholarship Exam Class 7
Syllabus for Upper Primary Scholarship Examination Standard 7th
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी करिता अभ्यासक्रम
Upper Primary Scholarship Examination Std 7th (UP)
Uchha Prathamik Shishayvrutti Pariksha Iytta Satvi Abhyaskram
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी परीक्षा पूर्व तयारीसाठी विषय निहाय प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी मध्ये सामील व्हा
| उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी करिता अभ्यासक्रम सर्व माध्यम सर्व विषय पीडीएफ |
| Upper Primary Scholarship Exam Syllabus for Class 7 All Medium All Subjects PDF |
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रमा करिता खालील दिलेल्या विषयावर टिचकी मारा
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी अभ्यासक्रम पीडीएफ करिता या ओळीला स्पर्श करा
ध्यम :- मराठी विषय :- गणित
| अ. क्र. | घटक | उपघटक | भारांश |
| 1. | संख्याज्ञान | 1. सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या चिन्हे. 2. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या. 3. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. 4. संख्या रेषा | 08% |
| 2. | संख्यावरील क्रिया | 1. विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या 2. वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ 3. लसावि, मसावि 4. अपूर्णांक दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक 5. घातांक 6. गुणोत्तर व प्रमाण, भागिदारी 7. चलन 8. काळ, काम, वेळ 9. सरासरी | 18% |
| 3. | भूमिती | 1. भूमितीतील मूलभूत संबोध बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन (सरळकोन, शून्य, पूर्ण, प्रविशाल) प्रतल, विरुद्धकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिकोन, कोनदुभाजक व लंबदुभाजक गुणधर्म, एकसंपाती रेषा, संपातबिंदू, बहुभुजाकृतीचे आंतरकोन. 2. समांतर रेषा गुणधर्म, संगतकोन, आंतरकोन, व्युत्क्रमकोन 3. वर्तुळ – वर्तुळकंस, केंद्रियकोन, कंसाचे माप. 4. त्रिकोण गुणधर्म 5. पायथागोरस प्रमेय 6. चौकोन गुणधर्म 7. त्रिमितीय आकार, मिती, चिती, सूची, गोल. घडणी पृष्ठे, शिरोबिंदू कडा. | 22% |
| 4. | महत्त्वमापन | 1. परिमाणे लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन नाणी व नोटा. 2. परिमिती – त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती, वर्तुळ 3. क्षेत्रफळ – त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ 4. घनफळ व पृष्ठफळ – इष्टिकाचिती व घन. | 16% |
| 5. | सांख्यिकी | 1. मध्यमान, वारंवारता सारणी 2. स्तंभालेख, जोडस्तंभालेख. | 06% |
| 6. | व्यावहारिक गणित\ | 1. शेकडेवारी 2. बँक व सरळव्याज 3. नफा तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली) | 14% |
| 7. | बीजगणित | 1. संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया, बैजिक राशींची किंमत, बैजिक राशीचे अवयव. 2. नित्यसमानता – बैजिक सूत्रे वर्गविस्तार. 3. एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे. | 16% |
