Sudharit Sevantargat Ashvasit Pragati Yojana
राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत….
Sudharit Sevantargat Ashvasit Pragati Yojana
Shikshakettar karmchari Sudharit Sevantargat Ashvasit Pragati Yojana
Revised In-Service Assured Progression Scheme applicable to non-teaching staff in primary, upper primary and secondary schools
दिनांक : ३१ जुलै, २०२५
संदर्भ :-
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. एसएसएन-२६९५/प्र.क्र.५५०/माशि-२. दि.३०.०४.१९९८
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. एसएसएन-२६९८/प्र.क्र.१५७/माशि-२. दि.२३.०७.१९९८
३. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दिनांक १ एप्रिल, २०१०
४. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेतन-११०९/प्र.क्र.४१/सेवा-३, दिनांक ५ जुलै, २०१०
५. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. वेतन- २०१९/प्र.क्र. ४८/टीएनटी-३, दिनांक १४ मार्च, २०२४
प्रस्तावना:-
राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक ०१.०१.२०२४ पासून लागू करण्याचा शासन निर्णय दिनांक १४/०३/२०२४ घेण्यात आला आहे. सदर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करतांना कोणती वेतनश्रेणी देण्यात यावी, याबाबत विचारणा क्षेत्रिय स्तरावरुन करण्यात येत होती. त्यानुसार याबाबत सूचना देण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती.
शासन निर्णय
राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक ०१.०१.२०२४ पासून लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना या शासन निर्णयाला जोडलेल्या परिशिष्ट “अ” प्रमाणे वेतनश्रेणी देय राहतील.
२. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक २७/२०२५/ सेवा-३, दिनांक २३.०१.२०२५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०७३११२४१४२०५२१ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करा यामुळे या स्पर्श करून
उप सचिव, महाराष्ट्र शासन
राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना या शासन निर्णयाला जोडलेल्या परिशिष्ट “अ” प्रमाणे वेतनश्रेणी देय राहतील
शासन निर्णयाला जोडलेल्या परिशिष्ट “अ” प्रमाणे वेतनश्रेणी देय राहतील.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः वेतन-२०१९/प्र.क्र.४८/टीएनटी-३, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई