Students Smart Attendance VSK
Students Smart Attendance VSK
Swift Chat Application Smart Attendance LINK
Regarding recording online attendance of students on the “Smart Attendance” Bot under the Vidya Samiksha Kendra
क्र. आशिका-२०२५/स्मार्ट उपिस्थती / VSK/२०२५-२६
दिनांक: /०९/२०२५
विषय: विद्या समीक्षा केंद्रांतर्गत “स्मार्ट उपस्थिती” या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणेबाबत.
संदर्भ :
१) राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) अहवाल २०२२-२३ आणि २०२३-२४
२) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र. मप्राशिप/सशि/संगणक / VSK/२०२२-२३/२९८४. दि.०३ नोव्हेंबर २०२३
३) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांक: १२ मार्च, २०२४.
४) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा. क्र/रागैसंप्रपम/आयटी /VSK/२०२४-२५/०३१९९, दि.०४/०७/२०२५
उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभव्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम /योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.
संदर्भ क्र. २ अन्वये, दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते १० वीच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील “स्मार्ट उपस्थिती” या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेद्वारे आदेश देण्यात आले होते.
तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये, शासन निर्णयानुसार, सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना “स्मार्ट उपस्थिती” या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्यासाठी निर्देश देऊन, उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याचा जिल्हा स्तरावरून आढावा घेण्याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणेला पुनः च आदेशित करण्यात आले होते.
आतापर्यंत ५०००० पेक्षा अधिक शाळांनी या Bot द्वारे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद यशस्वीपणे केलेली आहे. तथापि, सद्य:स्थितीत राज्यातील केवळ २००० ते २५०० शाळाच नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवत आहेत. सदर बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार आदेश देऊनही जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून येत आहे.
राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) मध्ये डिजिटल विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती या दर्शकासाठी स्वतंत्र गुणांकन आहे. विद्या समीक्षा केंद्रांतर्गत “स्मार्ट उपस्थिती” या Bot वर नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविल्यास PGI मध्ये राज्याचा प्रतवारी निर्देशांक सुधारण्यास मदत होणार आहे.
तरी, माहे ऑक्टोबर २०२५ पासून इ. १ ली ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना त्वरित निर्देश देण्यात यावेत. तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी VSK च्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा घ्यावा. क्षेत्रीय अधिकारी यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, तसेच अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घ्यावा.
परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
३. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
४. शिक्षण संचालक (प्राथ. व माध्य.), शिक्षण संचालनालय, पुणे
प्रत कार्यवाहीस्तव :
१. शिक्षणाधिकारी (प्राथ, व माध्य.), जि. प. सर्व
२. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व
३. शिक्षण निरीक्षण, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण)
Student Online Attendance Guidelines
विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती मार्गदर्शक सूचना
- Google play store वरून Swift Chat हे Application download करावे.
२. यापूर्वी प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी नोंदवावी. यामध्ये केवळ अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या नावासमोरील “अनुपस्थित” या बटणावर क्लिक करुन सबमिट करावे.
३. सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी Swift Chat या Application वर लॉगिन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.
४. उपस्थिती नोंदविताना शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा.
५. सद्यस्थितीत शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या सर्व शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. तसेच मुंबई मनपा शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना यु-डायस पोर्टलमधील PEN ID (Permanent Enrolment Number) द्वारे उपस्थिती नोंदविता येईल.
६. भविष्यात उच्च माध्यमिक (इ. ११ वी व १२ वी) चे विद्यार्थी तसेच इतर व्यवस्थापनाच्या व इतर मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती या Bot वर नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.
७. तूर्त एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.
८. काही शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय. डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.
९. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व यु-डायस पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील.
१०. या Attendance Bot (चॅटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी. शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास त्याच दिवशी इतर वेळेतही उपस्थिती नोंदविता येईल.
११. पहिले दोन महिने सर्वांनी विद्यार्थी उपस्थिती “स्मार्ट उपस्थिती” या Bot वर ऑनलाईन, तसेच नियमित हजेरी पत्रकातही नोंदवावी. त्यानंतर ऑनलाईन उपस्थिती नोंदीची पीडीएफ प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येईल. अशी सुविधा प्राप्त झाल्यावर नियमित हजेरी पत्रकात उपस्थिती नोंद करण्याची आवश्यकता नाही.
१२. ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यासाठी मार्गदर्शक सूचना व डेमो व्हिडीओ सोबत देण्यात येत आहेत.
१३. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.
१४. मासिक आढावा बैठकीत याविषयीचा नियमित आढावा या कार्यालयाकडून घेण्यात येईल.
१५. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी
या लिंकवर सादर कराव्यात.
प्रति,
१. आयुक्त, मनपा (सर्व)
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
३. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
