Student Security Certificate
Student Security Certificate
Vidyarthi Suraksha Pramanpatra
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य, पुणे
जा. क्र.आस्था-क/प्राथ १०६/वि.सु.प्र.प./२०२५/1327201
दि. 15.07.2025
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) विभाग
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा, सर्व
३. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका (उ/द/प)
४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व
विषय : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्गमित शासन निर्णय दि.१३.०५.२०२५ अन्वये आवश्यक कार्यवाही करण्याबाबत
संदर्भ :-
१. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.११९/एस.डी.४, दि.१३.०५.२०२५
२. या कार्यालयाचे आपणांस पत्र जा.क्र. १७८४, दि.१९.०५.२०२४
३. या कार्यालयाचे आपणांस पत्र जा.क्र.१३०८०२५, दि.०१.०७.२०२४
४. या कार्यालयाचे आपणांस पत्र जा.क्र.१३२१२७१, दि.१०.०७.२०२४
राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्गमित शासन निर्णय १३.०५.२०२५ मधील मुद्दा क्रमांक १२ अनुसार विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करावयाचे आहे. सदर समितीचे सदस्य सचिव शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांनी विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय/परपित्रक यांची शाळास्तरावर अंमलबजावणीबाबत प्रत्येक महिन्यात आढावा घेऊन संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे अहवाल सादर करावयाचा आहे. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत विहित प्रमाणपत्र शाळेच्या दर्शनी भागावर लावण्यात यावे. त्यासाठी विहित प्रमाणपत्र यासोबत जोडण्यात आले आहे.
तरी, आपल्यास्तरावरुन अधिनस्त सर्व शाळांना विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमाणपत्र शाळेच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच, शासन निर्णय १३.०५.२०२५ अन्वये विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणीबाबत प्राप्त अहवाल /माहिती यांची आपणांकडे स्वतंत्र नोंद घेण्यात यावी. जेणेकरुन तातडीच्या संदर्भासाठी सदर माहिती उपलब्ध करुन देता येईल.
(सोबत : प्रमाणपत्र नमूना आणि परिपत्रक ) पीडीएफ प्रत लिंक
शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन)
प्रत पुढील आवश्यक कार्यवाहीस्तवः
१. मा.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) संचालनालय, म.रा., पुणे
२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) संचालनालय, म.रा., पुणे
प्रत माहितीस्तवः
उपसचिव, (एसडी-४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.११९/एस.डी.४, दि.१३.०५.२०२५
विद्यार्थी सुरक्षितता प्रमाणपत्र
शाळा प्रमुख म्हणून प्रमाणित करुन देण्यात येते की,
शाळेचे नाव :-
व्यवस्थापन प्रकार :
संपूर्ण पत्ता :-
UIDSE नं. :
शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि.१३.०५.२०२५ नुसार आणि शासनाने वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय/परिपत्रक यांची विद्यार्थी सुरक्षा समितीकडून शाळास्तरांवर अंमलबजावणी करण्यात आली आहे.
दिनांक :
मुख्याध्यापक स्वाक्षरी व मोहर (शिक्का)