Student Admission And Promotion In U DISE Plus
Student Admission And Promotion In U DISE Plus
U Dise Plus Vidyarthi Pravesh vargonnti
Student Admission And Promotion In U DISE System
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
दिनांक : ०३.०६.२०२५
0/2971 क्रमांक : प्राशिसं/संकीर्ण-२५/३-५००
03 JUN 2025
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व
विषय : युडायस प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रवेश व वर्गोन्नतीबाबत
संदर्भ : मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांचे दिनांक ३०.०५.२०२५ रोजीची आढावा बैठक
उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भाधिन दिनांक ३०.०५.२०२५ रोजीची आढावा बैठकीमध्ये मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार सुचित करण्यात येते की, युडायस प्रणालीमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ सुरु करण्यात आलेले आहे. तरी सन २०२५-२६ मध्ये विद्यार्थी वर्गोन्नत व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद प्रणालीमध्ये करणे आवश्यक आहे. त्यानुसार सन २०२४-२५ मधील ऑनलाईन युडायस प्रणालीमध्ये नोंद असलेल्या सर्व विद्यार्थ्याचे नियमानुसार पुढील वर्गात वर्गोन्नती करणे आवश्यक आहे. सदरची कार्यवाही तातडीने होणे आवश्यक आहे.
त्यामुळे सन २०२४-२५ मध्ये प्रणालीमध्ये नोंद असलेल्या विद्यार्थ्याचे सन २०२५-२६ युडायस प्रणाली मध्ये वर्गोन्नती करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदरची कार्यवाही दिनांक १०.०६.२०२५ पुर्वी पुर्ण करुन घेण्यात येण्यासाठी आपल्या स्तरावरुन सर्व संबंधित प्राधिका-यांना सुचना निर्गमित कराव्यात व त्यानुसार झालेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
(श्रीराम पानझाडे) शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
(शरद गोसावी) शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रतः माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई ३२
२. मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे
Regarding Student Admission And Promotion In U DISE Plus