Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link इ १० वी व १२ वी खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार

Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

IMG 20250314 202931
Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

  • Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

क्र.क्रीयुसे/क्रीगुस/मुदत/२०२४-२५/का-४

दिनांक : १३ मार्च २०२५

विषयः इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेत परीक्षेत वाढीव क्रीडा गुण सवलत मिळण्यासाठी सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत.

संदर्भ:
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि/२०१५/प्र.क्र.२६२/एस.डी.२, दि.२० डिसेंबर, २०१८.
२. शासन शुद्धीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि-एस.डी.२, दि.२५ जानेवारी, २०१९.
३. सचिव, राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांचे प्रकटन दि. ०६.०२.२०२५.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने संदर्भिय क्र. १ व २ अन्वये निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धेतील पात्र खेळाडूंना क्रीडा गुण सवलत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते.

सन २०२४-२५ पासून क्रीडागुण सवलतीचे अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्याबाबत दि. १४ जानेवारी २०२५ रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभरात आपले सरकार प्रणालीद्वारे अर्ज स्विकारण्यात येत आहेत.

यावर्षी इयत्ता १० वी व १२ वी परिक्षांचा निकाल दि. १५ मे २०२५ पुर्वी जाहीर करण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा मानस असल्याने, क्रीडागुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने दि. १५ एप्रिल २०२५ पूर्वी विभागीय शिक्षण मंडळांना पाठविण्याबाबतचे प्रकटन संदर्भ ३ नुसार कळविण्यात आले आहे.

शासन निर्णयामधील तरतुदीनुसार, क्रीडागुण सवलत अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा याकरीता केवळ दि. ११ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारावेत. याबाबतची व्यापक प्रसिध्दीद्वारे आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे

IMG 20250314 202943 1
Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

(मा.आयुक्त महोदयांच्या मान्यतेने)

सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास या ओळीला स्पर्श करा

सहसंचालक,

क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
प्रत माहितीसाठी सादर.
मा. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य.
प्रति, जिल्हा क्रीडा अधिकारी, (सर्व)
महाराष्ट्र राज्य.

IMG 20250114 230434
Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

Class 10th And Class 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Only

इ. १० वी व १२ वी खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे

क्र. क्रीयुसे/ग्रेसगुण/ऑन.अर्ज/२०२४-२५/का-४/१८९४

अतितात्काळ / ग्रेस गुण.

दिनांक: ०९ जानेवारी २०२५
14 JAN 2025

विषय – इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्याबाबत.

उपरोक्त विषयान्वये सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना सुचित करण्यात येते की, प्रतिवर्षीप्रमाणे इयत्ता १० वी व १२ वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन करुन कार्यालयाद्वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळास पाठविले जातात.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अधिक जाणून घ्या या ओळील स्पर्श करून

सन २०२३-२४ पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणीवांमुळे हे काम अचुक व दोषरहीत होणे क्लिष्ट होत होती. व त्याचा फटका विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी या वर्षीपासून म्हणजेच २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

IMG 20250114 230511
Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

खेळाडू विद्यार्थी / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार नाही व अशा प्रकारचा अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्विकारला जाऊ नये. जर अशी बाब मुख्यालयाच्या निदर्शनास आली तर त्यासंदर्भात होणा-या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसानीस संबधीत जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार राहतील..

तथापि, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा सवलत गुणांबाबतचा ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येवू नये व उपरोक्त विषयासंदर्भात दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची दक्षता घ्यावी. त्यानुसार खेळाडू विद्यार्थी व जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांना सदर प्रणालीद्वारे अर्ज करण्या बाबतच अवगत करण्यात यावे व जिल्हातील स्थानिक वर्तमान पत्रामध्ये यास प्रसिध्दी देण्यात यावे. या बाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.

(टिप्पणी मा. आयुक्त यांनी मान्य केली आहे.)

(सुधीर मोरे)
सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे

IMG 20250114 230538
Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

प्रति,
१. विभागीय उपसंचालक, (सर्व)
२. जिल्हा क्रीडा अधिकारी, (सर्व)

संकेतस्थळ: Website LINK

Mail 📧 LINK

Leave a Comment

error: Content is protected !!