Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link इ १० वी व १२ वी खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार

Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

IMG 20250114 230434
Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

Class 10th And Class 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Only

इ. १० वी व १२ वी खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे

क्र. क्रीयुसे/ग्रेसगुण/ऑन.अर्ज/२०२४-२५/का-४/१८९४

अतितात्काळ / ग्रेस गुण.

दिनांक: ०९ जानेवारी २०२५
14 JAN 2025

विषय – इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्याबाबत.

उपरोक्त विषयान्वये सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना सुचित करण्यात येते की, प्रतिवर्षीप्रमाणे इयत्ता १० वी व १२ वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन करुन कार्यालयाद्वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळास पाठविले जातात.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अधिक जाणून घ्या या ओळील स्पर्श करून

सन २०२३-२४ पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणीवांमुळे हे काम अचुक व दोषरहीत होणे क्लिष्ट होत होती. व त्याचा फटका विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी या वर्षीपासून म्हणजेच २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

IMG 20250114 230511
Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

खेळाडू विद्यार्थी / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार नाही व अशा प्रकारचा अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्विकारला जाऊ नये. जर अशी बाब मुख्यालयाच्या निदर्शनास आली तर त्यासंदर्भात होणा-या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसानीस संबधीत जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार राहतील..

तथापि, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा सवलत गुणांबाबतचा ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येवू नये व उपरोक्त विषयासंदर्भात दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची दक्षता घ्यावी. त्यानुसार खेळाडू विद्यार्थी व जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांना सदर प्रणालीद्वारे अर्ज करण्या बाबतच अवगत करण्यात यावे व जिल्हातील स्थानिक वर्तमान पत्रामध्ये यास प्रसिध्दी देण्यात यावे. या बाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.

(टिप्पणी मा. आयुक्त यांनी मान्य केली आहे.)

(सुधीर मोरे)
सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे

IMG 20250114 230538
Std 10th 12th Sportsman Students GRACE Marks Application Govt Aap Sarkar System Online Link

प्रति,
१. विभागीय उपसंचालक, (सर्व)
२. जिल्हा क्रीडा अधिकारी, (सर्व)

संकेतस्थळ: Website LINK

Mail 📧 LINK

Leave a Comment

error: Content is protected !!