State Level Steering Committee For Implementation Of National Education Policy
State Level Steering Committee For Implementation Of National Education Policy
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ५+३+३+४ आकृतीबंधातील शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर) शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण मधील घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करणेबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४६/एसडी-४,मंत्रालय, मुंबई
दिनांक :- ०५ फेब्रुवारी, २०२५
संदर्भ :-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४६/एसडी-४, दिनांक २४ मे, २०२३ २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४६/एसडी-४, दिनांक ०२ जानेवारी, २०२४ ३) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्रमांक : राशैसंप्रपम / अविवि / सुकाणू / २०२५/०५८१, दिनांक ०३.०२.२०२५
प्रस्तावना :-केंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू करण्यात आले आहे. सदर शिक्षण धोरणाची राज्यात टप्याटप्याने अंमलबजावणी सुरु झालेली आहे. याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF- State Curriculum Framework) निर्मिती होय. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टिने आवश्यक बाबींचा समावेश, शिफारस व मार्गदर्शन तसेच ५+३+३+४ या रचनेतील शैक्षणिक कार्याचे सनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर सुकाणू समितीमध्ये संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये तीन नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या शासनास सादर केलेल्या संदर्भ क्र. ३ येथील प्रस्तावानुसार, राज्यस्तरीय सुकाणू समितीमधील मूळ सदस्यांव्यतिरिक्त अन्य सदस्यांचा समावेश करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती. त्यास अनुसरुन खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे :-
शासन निर्णय
राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये संदर्भ क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये समाविष्ट असलेल्या सदस्यांव्यतिरिक्त सदर सुकाणू समितीमध्ये खालील सदस्यांचा समोवश करण्यात येत आहे.अ.क्र.समिती सदस्यांचे नावश्री. नंद कुमार, सेवानिवृत्त, भा. प्र. से.पदनामश्री. रमेश पानसे, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ – सदस्य०३. श्री. शांतीलाल गुलाबचंद मुथा, सामाजिक कार्यकर्ते – सदस्य०४. श्री. सचिन उषा विलास जोशी, शिक्षण अभ्यासक२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०२०५१६०९३१२१२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन निर्णय / परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
उप सचिव, महाराष्ट्र शासन
Regarding the inclusion of new members in the State Level Steering Committee established for the quality and effective implementation of the National Education Policy in the state by reviewing the components of early childhood care and education (basic level), school education, teacher education and adult education in the 5+3+3+4 framework as per the National Education Policy 2020.