शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा आयोजन State Level Olympiad Competition

State Level Olympiad Competition

State Level Olympiad Competition

Regarding organizing a state-level Olympiad competition for teachers and officers/employees

shikshak Adhikari karmchari Rajastariy Olympiyad Spardha SCERT Guidelines

संपूर्ण परिपत्रकासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समाज माध्यमा मध्ये सामील व्हा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र./राशैसंप्रपम/रा. ऑलिंपियाड स्पर्धा/२०२५-२६/

दिनांक: १२.०१.२०२६

विषयः शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा आयोजनाबाबत….

संदर्भ: १. मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडील पत्र दि. १०/१०/२०२५.

२. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडील पत्र दि.१७/१०/२०२५.

३. शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका

उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून, राज्यातील शिक्षक, अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहेत. यापैकी विविध विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धा (मराठी, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्र, बुद्धिमत्ता, गणित इ.) प्रस्तुत कार्यालयातील संबंधित विषय विभागांमार्फत आयोजित करण्यात येत आहेत. तालुकास्तर व विभागस्तरावर सदर स्पर्धाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धातील विभागस्तरावरील प्रथम पाच क्रमांकात येणारे स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले असून त्यांची विषयनिहाय व विभागनिहाय यादी प्रस्तुत कार्यालयास प्राप्त झाली आहे त्यानुसार राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजन प्रस्तुत कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय सर्व ऑलिंपियाड स्पर्धा (मराठी, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शाख, बुद्धिमत्ता, गणित इ.) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे शुक्रवार दिनांक. ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळ सत्रात (११:३० ते १:००) व दुपार सत्रात (२:०० ते ३:३०) आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरून राज्यस्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध ऑलिंपियाड स्पर्धा आयोजनाबाबत सर्वसाधारण सूचना सोबत देण्यात आल्या आहेत

तरी, आपल्या जिल्ह्यातील विभाग स्तरावरील पात्र स्पर्धकांना (प्रत्येक विभागातील प्रत्येक स्पर्धा प्रकारातील प्रथम पाच स्पर्धक) सदर स्पर्धा आयोजनाच्या वेळापत्रकाबाबत अवगत करून नियोजित स्पर्धा स्थळी नियोजित दिनांकास सकाळी ठीक १०.०० वाजेपर्यंत उपस्थित राहतील या दृष्टीने कार्यमुक्त करावे तसेच सोबत देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी

सोबतः

सर्वसाधारण सूचनासाठी या ओळीला स्पर्श करा

विषयनिहाय स्पर्धक यादी साठी या ओळीला स्पर्श करा

सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा आयोजन State Level Olympiad Competition
शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा आयोजन State Level Olympiad Competition

प्रत माहितीस्तव सविनय सादर,

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई

मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे

State Level Olympiad Competition General Instructions Instructions for Competitors:

राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा

सर्वसाधारण सूचना

स्पर्धकांसाठी सूचना :

१) परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. प्रश्न व उत्तराचे पर्याय मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये देण्यात आले आहेत. (मराठी व इंग्रजी ऑलिंपियाड स्पर्धा वगळून)

२) परीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असतील.

३) मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता व सामाजिक शास्त्रे या विषयांच्या स्पर्धांसाठी प्रश्नपत्रिका एकूण १०० गुणांची असेल प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण १०० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास ०१ गुण असेल व स्पर्धेचा वेळ ९० मिनिटे असेल.

४) विज्ञान व गणित विषयांच्या स्पर्धांसाठी प्रश्नपत्रिका एकूण १०० गुणांची असेल. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण ५० प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नास ०२ गुण असतील व स्पर्धेचा वेळ ९० मिनिटे असेल.

५) स्पर्धेसाठी पात्र असणाऱ्या विषयनिहाय स्पर्धकांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. सदर यादीतील अनुक्रमांक हा स्पर्धकांचा बैठक क्रमांक असेल सर्व स्पर्धकांनी उत्तर पत्रिकेवर आपले नाव व प्राप्त बैठक क्रमांक नमूद करावा.

६) स्पर्धेच्या कालावधीत स्पर्धकांना लॅपटॉप / संगणक / कॅल्क्युलेटर / डिजिटल घड्याळ / मोबाईल इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. या साधनांचा वापर करताना आढळल्यास स्पर्धकांना स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल.

७) स्पर्धकांना स्पर्धेची वेळ संपेपर्यंत स्पर्धेचे दालन सोडता येणार नाही. स्पर्धा दालनातून स्पर्धेच्या वेळेपूर्वी कोणाचीही उत्तरपत्रिका जमा केली जाणार नाही. स्पर्धा कालावधीत कोणत्याही स्पर्धकाला स्पर्धा कक्षातून बाहेर सोडता येणार नाही. (अपवादात्मक परिस्थिती वगळून)

८) उत्तरपत्रिका ओ.एम.आर. शीट स्वरुपात असेल. स्पर्धकांनी उत्तरपत्रिकेमध्ये योग्य पर्यायाला काळ्या अथवा निळ्या बॉलपेनने गोल करून उत्तर नमूद करावे.

९) उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही. एका पेक्षा जास्त उत्तरे नमूद केल्यास ते उत्तर चुकीचे घरले जाईल व त्या चुकीच्या उत्तराचे गुण मुद्दा क्रमांक १७ मधील नियमानुसार वजा केले जातील.

१०) राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:३० ते १:०० व दुपारी २:०० ते ३:३० या कालावधीत खालील तक्त्यात नमूद केलेनुसार आयोजित करण्यात येत आहेत.

११) स्पर्धेच्या कालावधीपूर्वी किमान अर्धा तास स्पर्धकांनी स्पर्धेच्या दालनात उपस्थित राहणे बंधनकारक राहील. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर उत्तरपत्रिका स्पर्धकांना देण्यात येतील उत्तरपत्रिकांचे वाटप झाल्यानंतर स्पर्धेच्या दालनात स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार नाही.

१२) स्पर्धकांनी उत्तर पत्रिका व प्रश्नपत्रिका दोन्हीही पर्यवेक्षक यांच्याकडे जमा करणे बंधनकारक राहील.

State Level Olympiad Competition Subject wise Schedule Time Table

  १३) विषयनिहाय स्पर्धा वेळापत्रक :

यासाठी या पोरीला स्पर्श करा

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा आयोजन State Level Olympiad Competition
शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा आयोजन State Level Olympiad Competition

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा आयोजन State Level Olympiad Competition
शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑलिंपियाड स्पर्धा आयोजन State Level Olympiad Competition

१४) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांनी भोजन व निवासाची व्यवस्था स्वतः करावी तसेच सदर स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱ्या स्पर्धकांना प्रवासभत्ता अनुज्ञेय नाही.

१५) पर्यवेक्षक यांनी स्पर्धेत दिव्यांग स्पर्धक सहभागी असल्यास अशा स्पर्धकांना आवश्यकतेनुसार बैठक

व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. दिव्यांग स्पर्धकांना कोणत्याही स्वरूपाचा वाढीव स्पर्धा कालावधी दिला जाणार नाही.

१६) सदर स्पर्धेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करतांना स्पर्धकाच्या उत्तरपत्रिकेतील योग्य/बरोबर उत्तरांनाच गुण दिले जातील.

१७) उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरांपैकी एक योग्य उत्तर उत्तरपत्रिकेत नमूद करावे. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी ५० % म्हणजे ०.५० गुण एकूण प्राप्त गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील. म्हणजेच प्रत्येक दोन चुकीच्या उत्तरांसाठी एका बरोबर उत्तर दिलेल्या प्रश्नाचे गुण वजा / कमी करण्यात येतील.

१८) एका पेक्षा अधिक स्पर्धकांना समान गुण पडल्यास सर्वात कमी निगेटिव्ह मार्किंग असणाऱ्या स्पर्धकास प्रथम क्रमांक दिला जाईल. तरीही समान गुण प्राप्त झाल्यास सेवाजेष्ठ स्पर्धकास प्राधान्य दिले जाईल, सेवा कालावधी समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या स्पर्धकास प्रथम घोषित करण्यात येईल.

१९) स्पर्धा निकालाबाबतचे सर्वाधिकार मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राहतील.

Leave a Comment

error: Content is protected !!