State Anthem Jai Jai Maharashtra Maja Garja Maharashtra Maja Playing Singing In All Schools

State Anthem Jai Jai Maharashtra Maja Garja Maharashtra Maja Playing Singing In All Schools
Regarding the playing/singing of the state anthem “Jai Jai Maharashtra Maja, Garja Maharashtra Maja” in all medium and all management schools in the state.
क्र. प्राशिसं/८०२/संकीर्ण/2221/२०२५
दिनांक- ०१/०४/२०२५
विषयः- राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” राज्यगीत वाजविले/गायले जाणेबाबत.
संदर्भ :-१) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र. १२७/एस.डी. ४. दि. १५/०३/२०२४
उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे.
उपरोक्त शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत वाजविले/गायले जाणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या.
शासन परिपत्रक दिनांक १५/०३/२०२४ मधील नमूद सूचनांचे पालन राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापन करतील याबाबतची दक्षता घेणेकरीता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आदेशित करण्यात आले आहे. तसेच संचालनालयामार्फत वेळोवेळी VC द्वारे दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत वाजविले/गायले जाणेबाबत आपणास यापूर्वी कळविण्यात आले आहे. तसेच संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी याबाबत तात्काळ अंमलबजावणी करणेसाठी आदेशित केलेले आहे. याबाबतचा जिल्हानिहाय अहवाल आपणास सादर करणेबाबत सूचित करण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत सदर बाबतचा अहवाल संचालनालयास अप्राप्त आहे.
तरी, याबाबत आपल्या विभागातील जिल्हानिहाय माहिती एकत्रित करून सोबतच्या प्रपत्रामध्ये भरून आजच संचालनालयास सादर करावी.
(रमाकांत काठमोरे)
शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०९
सहपत्र – वरीलप्रमाणे पीडीएफ लिंक
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय,
डॉ. अनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व