STARS MIEPA Headmaster Principal Empowerment Online Training Year 2024 25 Registration Link
STARS Project Enrollment for online training of Headmaster Principal in All schools of Class 1st to 12th in the state under Principal Empowerment Training
STARS MIEPA Principal Empowerment Online Training Year 2024-25
Maharashtra Institute of Educational Planning and Administration (ΜΙΕΡΑ).
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar
जा.क्र/प्रशिक्षण/SLA/२०२४-२५/७९
दूरध्वनी क – 0240-2970372
दिनांक – ०५/०६/२०२४
प्रति,
१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
२. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक, मुंबई दक्षिण, पश्चिम आणि उत्तर विभाग.
४. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई, मनपा
५. प्रशासन अधिकारी, मनपा, नपा, नप (सर्व)
विषय – स्टार्स प्रकल्प : मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत व्यक्तीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करणेबाबत.
संदर्भ – १.STARS प्रकल्प अंतर्गत मंजूर PAB मिटिंग इतिवृत्त दि. ३१ मार्च, २०२४. २. मा. संचालक, SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र./राशैसंप्रपम/सशि/STARS उपक्रम नियोजन/२०२४-२५/०१९६३/दि.०४.०४.२०२४.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की, राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहायीत, केंद्र पुरस्कृत Strengthening Teaching Learning And Results for States (STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२२-२३,२०२३-२४ मध्ये मुख्याध्यापक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले आहे. सदर उपक्रमाअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये उर्वरित (आतापर्यंत सदर ऑनलाईन प्रशिक्षण न घेतलेल्या) आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक/प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या (पदाचे/प्रभारी) यांनी पुढे दिलेल्या लिंकवर दि.३०/०६/२०२४ या तारखेपर्यंत नोंदणी करणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक कुणी भरावी याबाबत महत्वाची सूचना –
👉 प्रशिक्षणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
१. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर (पदाचे/प्रभारी) कार्यरत व्यक्ती २. प्रथम वेळी नोंदणी करणारे
३. पूर्वी नोंदणी केलेले परंतु ऑनलाईन प्रशिक्षणास सुरुवात न केलेले ४. नोंदणी करताना ईमेल आय-डी, संपूर्ण नाव (SPELLING), जिल्हा ही माहिती काळजीपूर्वक भरावी. आपले प्रशिक्षण आपल्या वैयक्तिक ईमेल आयडी द्वारेच होणार आहे.
५. लिंक मधील सर्व माहिती फक्त इंग्रजी भाषेतच भरावी.
सदर प्रशिक्षणात पूर्वचाचणी, फेज-1, फेज-2, फेज-3, उत्तरचाचणी, स्वाध्याय, प्रात्यक्षिक, PLC- व्यावसायिक अध्ययन समूह बैठक यांचा समावेश आहे. खालील नोंदणी लिंक भरणे अनिवार्य आहे.
ऑनलाईन लिंक-
Registration LINK
(डॉ. वैशाली जामदार)
संचालक महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा),
छत्रपती संभाजीनगर
STARS Project : Enrollment for online training of persons working on the post of Headmaster/Principal in schools of Class I to XII of Local Self-Government, Government, Aided Private, Social Welfare Department in the state under Principal Empowerment Training.