SSC EXAM Absent Students
SSC EXAM Absent Students
Regarding students absent from the class 10th examination
Regarding students absent from the class 10th examination
क्र.नाविमं / माध्य.ब १/3711 नाशिक ४२२००३
दि. ०१/०१/२०२८
विषय :- इ १० वी च्या परीक्षेत गैरहजर विद्यार्थ्यांबाबत
संदर्भ :- १ शिक्षण आयुक्त जा. क. आशिका /२०२५/आढावा बैठक /आस्था-क-१४४/दि…/११/२०२५ रोजीचे पत्र
२ राज्य मंडळ पुणे यांचे क.रा.मं.परीक्षा ५ दिनांक १९.१२.२०२५ रोजीचे पत्र
वरील संदर्भीय पत्राच्या विषयानुसार, मा मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दि.३१.१०.२०२५ रोजी व्ही.सी. व्दारे झालेल्या आढावा बैठकचे इतिवृत्तानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. १० वी परीक्षेमध्ये २५-३० टक्के विद्यार्थी गैरहजर राहतात. याबाबत निदर्शनास आलेल्या प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करणेबाबत तसेच असे प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश प्राप्त झालेले आहे.
त्यानुसार आपणास कळविण्यात येते की इ. १० वी फेब्रु/मार्च २०२६ परीक्षेसाठी विद्यार्थी गैरहजर राहणार नाही याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबत काळजी घ्यावी.

विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक ४२२००३