इयत्ता १० वी राज्य मंडळ माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२६ सामाजिक शास्त्रे इतिहास व राज्यशास्त्र प्रश्न पत्रिका आदर्श उत्तरसह पीडीएफ SSC Board Exam 2026 HISTORY And POLITICAL Question Paper With Answer Pdf

SSC Board Exam 2026 HISTORY And POLITICAL Question Paper With Answer Pdf

SSC Board Exam 2026 HISTORY And POLITICAL Question Paper With Answer Pdf

Class 10th SOCIAL SCIENCES (73) HISTORY & POLITICAL SCIENCE-PAPER-I

इयत्ता १० वी राज्य मंडळ माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२६ सामाजिक शास्त्रे इतिहास व राज्यशास्त्र प्रश्न पत्रिका आदर्श उत्तरसह पीडीएफ

SSC Board Exam 2026 HISTORY And POLITICAL Question Paper With Answer Pdf

STD 10th History Paper Solution English & Marathi Medium

SOCIAL SCIENCES (73) HISTORY & POLITICAL SCIENCE-PAPER-I(M)

सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र-पेपर-१ (म) (REVISED COURSE)

Pages – 11 Total Marks: 40 पृष्ठे – ११ एकूण गुण ४० २०२६.०३.१६ – ११००Time: 2 Hours वेळ -२ तास
2026 III 16-1100 N 962 Seat Number बैठक क्रमाक 2026 III 16-1100 N 962 Seat Number बैठक क्रमाक

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

सूचना :-
(1) सर्व कृती/प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
(2) उजवीकडील अंक प्रश्नांचे/कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात,
(3) प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न/कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न/कृती राज्यशास्त्र या विषयांवरील आहेत.
(4) प्रश्न क्रमांक 2 (अ) आणि 8 (ब) मधील संकल्पनाचित्रे/कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने/पेन्सिलीने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
(5) प्रश्न 1ला (अ), (ब) व प्रश्न 6वा या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेली असल्यास तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल.

  1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
    (1) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ……………….. या शहराचे उत्खनन करतानां सापडले
    (अ) दिल्ली
    (ब) हडप्पा
    (क) उर
    (ड) कोलकाता

योग्य उत्तर – (क) उर

(2) महाराष्ट्राचे आदा कीर्तनकार ……………….. यांना मानतात.
(अ) संत ज्ञानेश्वर
(ब) संत तुकाराम
(क) संत नामदेव
(ड) संत एकनाथ

योग्य उत्तर – (क) संत नामदेव

(3) साधुनिक इतिहासलेखनाचा जनक ………………. यास म्हणता येईल.
(अ) व्हॉल्टेअर
(ब) रेने देकार्त
(क) लिओपोल्ड राफे
(ड) कार्ल मार्क्स

योग्य उत्तर – (अ) व्हॉल्टेअर

(च) पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीवी जोडी ओळखून पुन्हा लिहा 3
(1) (i) प्रभाकर आचार्य प्र. के. अत्रे
(ii) दर्पण बाळशास्त्री जांभेकर
(iii) दीनबंधु कृष्णराव भालेकर
(iv) केसरी बाळ गंगाधर टिळक

योग्य उत्तर –
दिलेल्या पर्यायांपैकी पहिली जोडी चुकीची आहे. ‘प्रभाकर’ या वृत्तपत्राचे संपादक भाऊ महाजन हे होते, तर आचार्य प्र. के. अत्रे यांनी ‘मराठा’ हे वृत्तपत्र सुरू केले होते.

चुकीची जोडी: प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
दुरुस्त केलेली जोडी: प्रभाकर - भाऊ महाजन (कुंटे)

टीप: बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, म्हणून त्यांना 'आद्य पत्रकार' मानले जाते. 'दीनबंधू' हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

(2) (1) बाळंभट देवधर -मल्लखांब
(ii) खाशाबा जाधव -फुटबॉल
(ii) मेजर ध्यानचंद – हॉकी
(iv) सचिन तेंडूलकर -क्रिकेट

योग्य उत्तर –

चुकीची जोडी: (ii) खाशाबा जाधव – फुटबॉल
(ii) दुरुस्त केलेली जोडी: खाशाबा जाधव – कुस्ती

स्पष्टीकरण:
खाशाबा जाधव हे भारताचे प्रसिद्ध कुस्तीगीर होते. त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात (कुस्ती) भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले होते.

(3) (i) महाराज सयाजीराव विदद्यापीठ दिल्ली
(ii) बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी
(iii) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी -अलिगढ
(iv) जिवाजी विद्यापीठ -ग्वालियर

योग्य उत्तर –

चुकीची जोडी: (i) महाराज सयाजीराव विद्यापीठ — दिल्ली
दुरुस्त जोडी: महाराज सयाजीराव विद्यापीठ — वडोदरा (बडोदा)

स्पष्टीकरण:
महाराजा सयाजीराव विद्यापीठ हे गुजरात राज्यातील वडोदरा शहरात आहे, दिल्लीत नाही. इतर सर्व जोड्या (बनारस हिंदू विद्यापीठ – वाराणसी, अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी – अलिगढ आणि जिवाजी विद्यापीठ – ग्वालियर) योग्य आहेत.

  1. (अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :4
    (1) दूरदर्शनशी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा :

दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन …………..
1972 …………..
रंगीत दूरदर्शनचे आगमन …………..
1991 …………..

SSC Board Exam 2026 HISTORY And POLITICAL Question Paper With Answer Pdf
SSC Board Exam 2026 HISTORY And POLITICAL Question Paper With Answer Pdf

योग्य उत्तर –

पूर्ण केलेली कालरेषा अशा प्रकारे दिसेल:
वर्ष / घटना तपशील
१९५९ – दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन
१९७२ – मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले
१५ ऑगस्ट १९८२ – रंगीत दूरदर्शनचे आगमन

टीप: परीक्षेत ही कृती सोडवताना दिलेल्या चौकटींमध्येच योग्य शब्द किंवा वर्ष लिहिणे अपेक्षित असते. वर दिलेली माहिती तुमच्या अभ्यासासाठी अधिक स्पष्ट करून सांगितली आहे.

(2) पुढील वृक्षतक्ता पूर्ण करा :

सांस्कृतिक वारसा

मूर्त       अमूर्त

(1) ……………………… (1) ………………………
(2) ……………………… (2) ………………………

योग्य उत्तर –

पूर्ण झालेला तक्ता खालीलप्रमाणे
मूर्त अमूर्त
(१) प्राचीन स्थळे व वास्तू वस्तू (१) मौखिक परंपरा (लोकसाहित्य)
(२) शिल्पे, चित्रे व हस्तलिखिते (२) सण-उत्सव व पारंपारिक कौशल्ये

(3) पुढील तक्ता पूर्ण करा :

जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालये      देश

(i) लुत्र संग्रहालय ………………………
(ii) ……………………… इंग्लंड
(iii) सालारजंग म्युझियम ………………………
(iv) ……………………… युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका

योग्य उत्तर –

जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालये देश
(i) लुव्र संग्रहालय फ्रान्स
(ii) ब्रिटिश म्युझियम इंग्लंड
(iii) सालारजंग म्युझियम भारत
(iv) मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका

(ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) :
(1) राष्ट्रवादी इतिहासलेखन

योग्य उत्तर –
(i) एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास ‘राष्ट्रवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.
(ii) या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला.
(iii) भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.
(iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच ऐतिहासिक इतिहास लिहिण्यालाही मिळाली.

(2) उपयोजित इतिहास

योग्य उत्तर –
(१) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातूननिघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे ‘उपयोजन’ होय.
(२) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्षकाढणे, यालाच ‘इतिहासाचे उपयोजन’ असे म्हणतात.
(३) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
(४) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.

(3) मार्को पोलो.

योग्य उत्तर –
१. मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इ.स. १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला.
२. तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोतग्रंथ ठरला.
३. आशियातील समाजजीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.
४. भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविद्या यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे.

  1. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) : 4
    (1) कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.

योग्य उत्तर –
(१) कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते.
(२) या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यांतील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो.
(३) कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे, हे कलाकारच ओळखू शकतात.
(४) एकूण, कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते; त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.

(2) विविध विषयांमधील कृर्तीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

योग्य उत्तर –
(१) इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे ही कामे करावी लागतात.
(२) जुने ग्रंथ, हस्तलिखिते, पुरावस्तू यांची काळजीपूर्वक साफसफाई करून त्या जतन करून ठेवणे, त्या प्रदर्शित करणे ही जबाबदारीची कामे करावी लागतात.
(३) इतिहासाच्या या साधनांचे जतन आणि हाताळणी करणे हे कौशल्याचे काम असते.
(४) या सर्व कृती करताना कोणती कौशल्ये आत्मसात करायची, कोणती सावधानता बाळगायची हे माहीत असले पाहिजे.
म्हणूनच विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

(3) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

योग्य उत्तर –
(१) इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
(२) त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
(३) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
(४) सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.-

(4) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे

योग्य उत्तर –
(१) ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.
(२) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते.
(३) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात.
(४) त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते.
एकूण, चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.

  1. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

सोहगौडा ताम्रपट : हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश) येथे सापडला.
हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राम्ही लिपीत आहे.
लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत
(एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात.
चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत,
असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.

प्रश्न : (1) सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते ? 1
योग्य उत्तर – सोहगौडा ताम्रपट मौर्य काळातील काळातील असावा असे मानले जाते .

(2) सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत आहे ? 1
योग्य उत्तर – सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राम्ही लिपीत आहे

(3) सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व सांगा. 2
योग्य उत्तर – या ताम्रपटातून मौर्य काळातील प्रशासन व्यवस्था आणि दुष्काळाच्या काळात धान्य साठवणूक करण्याची व्यवस्था होती, याची माहिती मिळते. सोहगौडा ताम्रपटामुळे प्राचीन भारतातील शासनव्यवस्था व समाजजीवन समजून घेण्यासाठी हा ताम्रपट महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

  1. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : 6
    (1) भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.

योग्य उत्तर –
मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे-
(१) पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस ‘मुस्लीम स्थापत्यशैली’ असे म्हणतात.
(२) या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (२४० फूट) आहे.
(३) मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते.
(४) इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे.
(५) फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे.
(६) दिल्ली आणि आग्रा येथे मुघल सम्राटांनी बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत.
वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत.

(2) आकाशवाणीचा इतिहास सांगा.

योग्य उत्तर –
(१) जुलै १९२४ मध्ये मद्रास (चेन्नई) येथे प्रथम एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले.
(२) ब्रिटिश सरकारने ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC)’ स्थापन केली. याच कंपनीचे पुढे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस (ISBS) असे नामकरण केले.
(३) पुढे ८ जून १९३६ रोजी याच कंपनीचे ‘ऑल इंडिया रेडिओ (AIR)’ असे नामकरण झाले.
(४) स्वतंत्र भारतात AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले.
(५) पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIR ला ‘आकाशवाणी’ असे नाव दिले गेले.

(3) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

योग्य उत्तर –
मैदानी खेळ

१.मैदानी खेळ मैदानात उभे के राहून खेळायचे असतात.
२.मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते.
३.मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते.
४.शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो.
५.मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो. आनंदही अधिक मिळतो.
६.मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते.

बैठे खेळ
१. बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या कोठेही जागेत, पारावर, खेळता येतात.
२. बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते.
३. या खेळांना शारीरिक क्षमतेची, -. शक्तीची गरज नसते.
४. शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही.
५. बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो.
६. बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते.

(4) ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे असते ते सांगा

योग्य उत्तर –

(१) ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता राखावी.
(२) भिंतींवर नावे लिहिणे किंवा चित्रे काढणे टाळावे.
(३) ऐतिहासिक वस्तू किंवा दगड-शिल्पांना नुकसान होईल असे वर्तन करू नये.
(४) शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.
(५) परिसरात कचरा टाकू नये व पर्यावरण स्वच्छ ठेवावे.
(६) लोकांमध्ये ऐतिहासिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करावी.
(७) ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांसारख्या संस्थांना सहकार्य करावे.

  1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा : 2
    (1) संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार …………………… आहे.
    (अ) संसदेला
    (ब) लोकांना
    (क) राष्ट्रपतींना
    (ड) उपराष्ट्रपतींना

योग्य उत्तर – (अ) संसदेला

(2) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ……………….. करण्यात आली.
(अ) जलक्रांती
(ब) हरितक्रांती
(क) औद्योगिकक्रांती
(ड) धवलक्रांती

योग्य उत्तर – (ब) हरितक्रांती

  1. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) : 4
    (1) सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे. (2)
    योग्य उत्तर –
    (1) सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे
    वरील विधान बरोबर आहे.
    कारण –
    (१) समाजातील मागास व दुर्बल घटकांना समान संधी देण्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे.
    (२) शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात त्यांना प्रवेश मिळावा यासाठी आरक्षण उपयुक्त ठरते.
    त्यामुळे सामाजिक व आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते.
    (३) समाजातील सर्व घटकांना प्रगतीची संधी मिळाल्याने सामाजिक न्याय प्रस्थापित होतो.
    या तरतुदी भारतीय संविधान मध्ये करण्यात आल्या आहेत.

(2) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
योग्य उत्तर –
(2) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
वरील विधान चूक आहे
कारण –
(१) निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
(२) राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.
(३) म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे; त्यामुळे एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.

(3) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
योग्य उत्तर –
(3) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
वरील विधान बरोबर आहे.
कारण –
(१) लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते.
(२) परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो.
(३) बनावट मतदान होणे, मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे, मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.

  1. (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक) :
    (1) प्रादेशिकता
    योग्य उत्तर –
    (१) भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात.
    (२) भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी यांबाबतीतही भारतात विविधता आढळते.
    (३) प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते.
    (४) आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच ‘प्रादेशिकता’ असे म्हणतात.

(2) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व.
योग्य उत्तर –
(१) संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले.
(२) त्यामुळे १९५२ च्या पहिल्या लोकसभेत २२ महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन २०१९ च्या निवडणुकीत ती ७६वर जाऊन पोहोचली आहे.
(३) लोकसभेच्या एकूण जागांच्या ५०% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात, असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे.
(४) स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णयप्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल.

(ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही एक) : 2
(1) दिलेला आकृतिबंध पूर्ण करा :
राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये
…………………………………
…………………………………
…………………………………
…………………………………

योग्य उत्तर –
राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे संगता येतील
सत्ता मिळवणे
पक्षाचा जनाधार
शासन व जनता
यात दुवा म्हणून काम करणे
विचारसरणीवर आधारित कार्यक्रम निश्चित करणे

(2) दिलेला आकृतिबंध पूर्ण करा :
स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी व स्थळे
रामोशी …………………………………
गोंड …………………………………
कोलाम …………………………………
मुंडा …………………………………

योग्य उत्तर –
रामोशी – महाराष्ट्र
गोंड – ओडीसा
कोलाम -छोटा नागपूर
मुंडा – बिहार

  1. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक) : 2
    (1) मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा.
    योग्य उत्तर –
    मुक्त वातावरणात आणि न्याय्य पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला पुढील आव्हानांना तोंड दयावे लागत आहे –
    (१) देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे.
    (२) निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे.
    (३) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घातलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे.
    (४) निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वाढत्या हिंसांमुळे निर्माण होणाऱ्या दहशतीच्या वातावरणात निवडणुका घेणे.

(2) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?
योग्य उत्तर –
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात
(१) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.
(२) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात.
(३) राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते.
(४) भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!