Single Unified Portal

Single Unified Portal

IMG 20250410 222518
Single Unified Portal

Single Unified Portal

Single Unified Portal Link

क्रमांक :-प्रणाली ५६२४/प्र.क्र.५६ (भाग-२)/मातंक दिनांकः ४ एप्रिल, २०२५.

विषय: Single Unified Portal या प्रणालीबाबत.

या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणणे, विविध योजनांद्वारे करण्यात येणाऱ्या कामाची द्वरूिक्ती टाळणे, निधी वितरणाचे संनियंत्रण करणे, कामात एकसुत्रता आणणे तसेच सेवेची गुणवत्ता वाढविणे या दृष्टीने विभागात Single Unified Portal हा माहिती तंत्रज्ञान आधारित प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.

२ सदर प्रणाली ६ विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत प्रत्येकी एक याप्रमाणे पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या सहा जिल्हा परिषदांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर यशस्वीपणे राबविण्यात आली आहे.

३ Single Unified Portal या प्रणालीची उपयुक्तता विचारात घेऊन सदर प्रणालीया विभागांतर्गत २५१५-इतर ग्रामीण विकास कार्यक्रम ३०५४-रस्ते व पूल अंतर्गत कामे व इतर कामे याची मान्यता व निधी वितरण यांसाठी दि.१ एप्रिल, २०२५ पासून सर्व जिल्हा परिषदांमध्ये Go-Live करण्यात आली आहे. सदर प्रणालीचे प्रशिक्षण व त्यासंदर्भातील इतर सुचना सर्व जिल्हा परिषदांना स्वतंत्रपणे देण्यात येतील.

परिपत्रक पीडीएफ लिंक

उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई
प्रति,
१. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
२. सर्व अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.

Leave a Comment

error: Content is protected !!