Shasvat Sheti Din हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ एम एस स्वामिनाथन यांचा ७ ऑगस्ट हा जन्मदिवस शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करणेबाबत शासन निर्णय

Shasvat Sheti Din

Shasvat Sheti Din

Regarding celebrating “Sustainable Agriculture Day”

Regarding celebrating the birth anniversary of Bharat Ratna Dr. M.S. Swaminathan, the pioneer of the Green Revolution, on 7th August as “Sustainable Agriculture Day”.

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा ७ ऑगस्ट हा जन्मदिवस “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करणेबाबत.

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१२०/३-से (ई-१२१४६००),मुंबई

दिनांक :- २९ जुलै, २०२५

संदर्भ:-
१) आयुक्त (कृषि) यांचे पत्र जा. क्र. शेमा/ AGRICOS दिवस/१६७/२०२५. दि.०४.०७.२०२५
२) आयुक्त (कृषि) यांचे पत्र जा. क्र. शेमा/क्र. कृ.२०२५/१८०/दि.वि. दि.१४.०७.२०२५
३) मा. मंत्री कृषी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. १६ जुलै, २०२५ रोजीची बैठक

प्रस्तावनाः

महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यावर केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे लाखो लोकांना उपासमारीतून (भूकमारी) वाचवून कृषी इतिहासात मैलाचा दगड रोवला, त्यामुळे भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. प्राध्यापक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना “भारतीय हरित क्रांतीचे जनक” म्हटले जाते. देशासाठी त्यांच्या महान कार्य, योगदान, समर्पण आणि नम्रतेसाठी भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये “भारतरत्न” नागरी पुरस्काराने सन्मानित केले. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने त्यांना “आर्थिक पर्यावरणाचे जनक” म्हटले आहे.

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून येत्या ७ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या १०० व्या जयंतीच्या औचित्याने त्यांचा जन्मदिवस दि. ०७ ऑगस्ट हा “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे-

      शासन निर्णय

१. हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस दि. ०७ ऑगस्ट हा “शाश्वत शेती दिन” म्हणून दरवर्षी साजरा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदान विचारात घेऊन प्रत्येक कृषी विद्यापीठाने शाश्वत शेती, हवामान अनुकूलन तंत्रज्ञान व अन्न सुरक्षा या संदर्भातील एक स्वंतत्र विषय निवडून विद्यापीठांतर्गत “डॉ. एम.एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर- संशोधन केंद्र” स्थापन करावे.

३. भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेती, हवामान अनुकूलन, महिला शेतकरी इत्यादी बाबींतील विशेष कार्य विचारात घेऊन त्याअनुषंगाने शाश्वत शेती दिन राज्य/ जिल्हा / तालुका स्तरावर साजरा करणे, विद्यापीठ स्तरावर साजरा करणे, भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या नावे पुरस्कार देणे, इत्यादी बाबींसंदर्भात आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शाश्वत शेती दिन साजरा करण्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात.

४. शाश्वत शेती दिन साजरा करताना आयोजित करावयाच्या कार्यक्रमासाठी कमीत कमी खर्च आयुक्त (कृषी) यांच्या अधिनस्त असलेल्या तरतुदीमधून करावा, शासनावर कोणताही अतिरीक्त आर्थिक भार येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०७२९१७०१३१३२०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

IMG 20250730 194747
Shasvat Sheti Din

Leave a Comment

error: Content is protected !!