Shalarth ID Scam SIT Implementation
Shalarth ID Scam SIT Implementation
Teaching Non Teaching Shalarth ID Scam SIT Proceeding
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
चौकशी प्रकरणी करावयाच्या कार्यवाहीबाबत बैठक दिनांक ०९/०९/२०२५ चे इतिवृत्त.
राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाहयरित्या समाविष्ट करुन वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक (SIT) तयार करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने चौकशी प्रकरणी करावयाच्या कार्यवाहीबाबत सदर बैठक दिनांक ०९/०९/२०२५ सायंकाळी ०५.०० वाजता मा. सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांच्या अध्यक्षतेखाली VC द्वारे आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीस मा. संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, शिक्षण मंडळ सर्व तसेच विभागीय उपसंचालक सर्व हे उपस्थित होते.
दिनांक ११/०९/२०२५ रोजी विशेष चौकशी पथक (SIT) व चौकशी प्रकरणे सोपाविलेले सर्व अधिकाऱ्यांची पहिलीच बैठक होणार आहे. त्याअनुषंगाने सदर बैठकीत विचारणा करण्यात येणाऱ्या मुद्यांची जाणीव करुन देण्याबाबत सदर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
खाली नमूद विषयांवर चर्चा होऊन कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या.
विषय – प्राप्त तक्रारीबाबत करावयाची कार्यवाहीबाबत.
दिलेले निर्देश/सूचना
२ मे २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शालार्थ व वैयक्तिक मान्यतेच्या नस्ती वर्षनिहाय लावून ठेवाव्यात.
आपल्याअधिनस्थ कार्यालयाचे सुध्दा शालार्थ व वैयक्तिक मान्यतेच्या नस्ती वर्षनिहाय लावून ठेवलेले आहेत किंवा नाही, याबाबतची पडताळणी करावी. सदरची माहिती अद्ययावत अचूक ठेवावी.
आपल्याकडे आयुक्तालयाच्या तसेच SIT (प्रमुख/सदस्य) यांच्या नावाने तक्रार प्राप्त झाली असे तर सदर तक्रार sitcommitteemah@gmail.com या ई-मेल वर पाठविण्यात यावे. सदर ई-मेल चा वापर अन्य कुठल्याही पत्रव्यवहारासाठी करण्यात येऊ नये याची नोंद घ्यावी.
चौकशी प्रकरणांच्या अहवाल दि. २५/०९/२०२५
संबंधित अधिकारी
१. चौकशी प्रकरणे सोपाविलेले सर्व अधिकारी.
२. विभागीय अध्यक्ष शिक्षण मंडळ सर्व.
३. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व.
१५० दिवसाच्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने २ ऑक्टोंबर २०२५ ही अंतिम तारीख आहे मूल्याकनांची त्याअनुषंगाने आपल्या कार्यालयातील
संबंधित अधिकारी
१. चौकशी प्रकरणे सोपाविलेले सर्व अधिकारी.
२. विभागीय अध्यक्ष शिक्षण मंडळ सर्व.
३. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व.
विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व.
इतर विषय
१५० दिवसाच्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने २ ऑक्टोंबर २०२५ ही अंतिम तारीख आहे मूल्याकनांची त्याअनुषंगाने आपल्या कार्यालयातील
संबंधित अधिकारी
१. चौकशी प्रकरणे सोपाविलेले सर्व अधिकारी.
२. विभागीय अध्यक्ष शिक्षण मंडळ सर्व.
३. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व.
इतर विषय
१५० दिवसाच्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने २ ऑक्टोंबर २०२५ ही अंतिम तारीख आहे मूल्याकनांची त्याअनुषंगाने आपल्या कार्यालयातील
तसेच अधिनस्थ कार्यालयातील सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी प्रशिक्षण किमान ०५ इतके प्रशिक्षण पूर्ण केल्याची खात्री करावी. न केल्यास अंतिम तारीख लक्षात घेता सदरचे प्रशिक्षण तात्काळ पूर्ण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
गोपनिय अहवाल ज्या अधिकाऱ्यांचे अप्राप्त आहेत अशाची यादी आपणास पाठविण्यात येऊन सदर अधिकाऱ्यांचे गोपनिय अहवाल तात्काळ आयुक्तालयास सादर करावे. किंवा ऑनलाईन भरण्यात यावे. काही अडचण आल्यास आयुक्तालयास संपर्क साधावा.
विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या आस्थापने वर असणाऱ्या कर्मचा-यांच्या पदोन्नती, बिंदू नामावली, सेवाजेष्ठता यादी, अनुकंपातत्वावर भरती प्रक्रीया इ. आस्थापना विषयक बाबीं पूर्ण झाल्या पाहीजेत. वरील तारखेच्या पूर्वी.
आपले सरकार व PG पोर्टल वरील तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात.
ई-ऑफिस प्रणाली द्वारे काम करित असल्याबाबतची माहिती तसेच आपल्या व अधिनस्थ सर्व कार्यालयातील वस्तुस्थितीदर्शक सदर प्रणालीचा वापर करीत असल्याचे व नसल्याची माहिती अद्ययावत ठेवावी. ज्या कार्यालयाची सदर प्रणाली सुरु नसेल किंवा अडचण र्निमाण होत असल्यास तात्काळ संबंधित व्यक्तीस संपर्क साधावा. सदरचे काम वेळेत पूर्ण करावे.
मा. प्रधान सचिव याच्या अध्यक्षतेखाली दि. २२/०८/२०२५ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने ज्या शाळांचे जिओ टॅगिंग होऊन मॅपिंग पूर्ण झालेले नसेल अशा शाळांची यादी आपणास पाठविण्यात येत असून एमआयएस कॉर्डिनेटर शी संपर्क करुन सदरचे काम पूर्ण करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.
युडायस प्लस मध्ये विभागीय उपसंचालक यांनी आपले लॉगिन करावे. अडचण आल्यास संपर्क करावा.
वरील ई-गव्हर्नस च्या सर्व विषयाबाबत अडचणी सुटण्यासाठी आपण सर्वांनी ई-गव्हर्नस सेल ऍक्टिव्ह करावे.
विषय क्र. २ चे सर्व मुद्यांवर १५० दिवसाच्या कार्यक्रमांचे मूल्याकन ठरणार आहे. त्याची अंतिम तारीख २ ऑक्टोंबर २०२५ ही आहे. तेव्हा आपण सर्वांनी सदरचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होईल यादृष्टीने लक्ष देवून पूर्ण करुन घ्यावे.
वरीलप्रमाणे आदेशित करुन बैठकीत उपस्थित मान्यवरांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.
विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व.
शिक्षण सहसंचालक, (प्रशासन, अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

Regarding the action to be taken regarding the complaint received by the SIT regarding the Shalarth ID scam.
A Special Investigation Team (SIT) has been formed in the state regarding the illegal inclusion of names of ineligible teaching and non-teaching employees in the Shalarth system and payment of salaries. Accordingly, regarding the action to be taken in the investigation case