Schools Academic Result Primary_Upper Primary Schools Academic Result Academic Year 2022-23 Result शैक्षणिक वर्ष २०२२-२३ निकाल
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १०. डॉ. अनेक मार्ग, पुणे ४११००१ जा.क्र. प्राशिसं २०२३ शाळा ५१६ / ३५१७ प्रति, दि. २८ एप्रिल २०२३ १. विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग- सर्व २. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई ३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद- सर्व ४. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग, महानगरपालिका सर्व विषय: राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करणेबाबत. संदर्भ: १. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एसडी-४, दि. २०/०४/२०२३ २. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/ २०२३ / शाळासुट्टी/५१६/३२३६. दि. २०/०४/२०२३ राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत संदर्भिय क्र. १ वरील शासन निर्णयानुसार तपशिलवार सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या संदर्भिय क्र. २ वरील पत्रान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. उक्त सूचनांमध्ये सुट्टीचा कालावधी, शाळांचे निकाल जाहीर करणे, सन २०२३-२४ चे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादीबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षांची सांगता दिनांक ६ मे २०२३ रोजी आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे. १. दिनांक १ मे, २०२३ रोजी ‘महाराष्ट्र दिन’ सालाबादा प्रमाणे साजरा करण्यात यावा. २. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी / पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे. तसेच, निकालासोबत उपक्रम / कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा. ३. संदर्भिय क्र. १ वरील शासन निर्णय आणि संचालनालयाच्या संदर्भिय क्र. २ वरील पत्रामध्ये दिलेल्या सूचनांनुसार शाळांच्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) प्रतः माहितीस्तव सविनय सादर, १. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई. २. मा. आयुक्त (शिक्षणा, महाराष्ट्र राज्य, पुणे |