School Education Department Online Public Service Application Redressal Online Only
School Education Department Online Public Service Application Redressal Online Only
Regarding the redressal of applications for online public services provided under the School Education Department through online mode only.
शालेय शिक्षण विभागातर्गत पुरविण्यात येणा-या ऑनलाईन लोकसेवांच्या अर्जाचे निवारण ऑनलाईन पध्दतीनेच करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः प्रवेश-१२२५/प्र.क्र.१६/ एसडी-२, मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक:- ०१ सप्टेंबर, २०२५
वाचा-
१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, संकिर्ण १७२५/प्र.क्र.१२६/मातं दिनांक-३०.०५.२०२५
प्रस्तावना-
मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात १०० दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. त्यांनतर मा. मुख्यमंत्री यांनी १५० दिवसांचा कृती आराखडा या विषयावर दि.०७मे, २०२५ रोजी मंत्रालयीन अधिकारी व राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना हक्क परिषदेद्वारे (video conferencing), मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास, गृह निर्माण) यांच्या उपस्थितीत संबोधित केले आहे. यास अनुसरून शासकीय कार्यालयांमध्ये ई-प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील सर्व विभागांनी तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी आगामी १५० दिवसांमध्ये त्यांचे कार्यालय ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करून कार्यालय नागरीकांना सोईचे कसे होईल यासाठी विशेष मोहीम रावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांतील ई-प्रशासन प्रभावीपणे होण्यासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.
शासन परिपत्रक
राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील सर्व विभागांनी तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी आगामी १५० दिवसांमध्ये त्यांचे कार्यालय ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करून कार्यालय नागरीकांना सोईचे कसे होईल यासाठी विशेष सुविधा पुरवणे अपेक्षीत आहे. यास अनुसरुन पुढील सूचना निर्गमीत करण्यात येत आहेत.
(१) विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांचे ई-प्रशासन प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) या कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणा-या ऑनलाईन सेवांचे आपले सरकार पोर्टलशी त्वरील एकात्मिकरण करावे व सदर सेवा सर्व नागरिकांना विहित मुदतीत उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(२) शालेय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांचे (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व)) ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देणारे सर्व संकेतस्थळांचे / पोर्टलचे तात्काळ एकात्मिकरण करुन घेणे आवश्यक आहे जेणे करुन नागरिकांना एकाच लॉगीन वरुन सर्व पोर्टल वरील ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन घेता येतील व नागरीकांना विविध सेवा उपलब्ध करुन घेणे सोईचे होईल.
(३) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) या कार्यालयाद्वारे लोकसेवा हक्क कायदा २०१५ अंतर्गत अधीसूचीत केलेल्या सेवा यांचा निकाली काढण्याचा कालावधी या विषयीची सविस्तर माहीती पोर्टल वर अद्यावत करण्यात यावी. तसेच नागरीकांनी मागणी केलेली सेवा ही विहित मुदतीत न मिळाल्यास अपील प्राधिकारी यांची संपुर्ण माहीती देखिल पोर्टल वर अद्यावत करावी.
(४) विभागाचे ई प्रशासन प्रबळ व प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) या कार्यालयाद्वारे पुरविण्यात येणा-य ऑनलाईन सेवा या मुख्यत्वे ऑनलाईन माध्यमातूनच देण्यात यावी. ऑनलाईन माध्यमाने पुरविण्यात येणा-या सेवांचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात यावे. तसेच या सेवाचे निवारण देखील ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात यावे.
(५) अपवादात्मक परीस्थितीमध्ये उदाः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार गुणपत्रक/प्रमाणपत्रे, गुणपत्रक/प्रमणपत्राच्या दुय्यम प्रती, तसेच सदर गुणपत्रक व प्रमाणपत्रांना प्रमाणित करुन द्यावयाचे असल्यास या सेवांविषयी प्रथमतः अर्जदारास ऑनलाईन माध्यमाने तसे सुचीत करणे आवश्यक आहे. तद्नंतर अर्जदारास सदर सेवा ऑफलाईन अथवा पोस्टल पध्दतीने उपलब्ध करुन देता येतील.
(६) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे व विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) या सर्व कार्यालयांमध्ये नागरीकांच्या मदतीसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात यावा. जेणेकरुन आलेल्या नागरीकांना कार्यालयातच ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो व सेवा उपलब्ध करुन घेण्याविषयी उचित मार्गदर्शन देखील करता येऊ शकतो. तसेच ऑनलाईन सेवा / तक्रारींच्या अनुषंगाने काही प्रश्न असल्यास त्यांचे त्वरीत निवारण होऊ शकेल.
(७) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयाद्वारे लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उपलब्ध सेवांचा सविस्तर चारमाही तपशील मंत्रालय विभाग स्तरावर नियमित उपलब्ध करुन देण्यात यावा.
(८) १५० दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे ई प्रशासन प्रबळ करण्यासाठी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व आयुक्त,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे विभागीय परीक्षा मंडळ (सर्व) यांनी सदर सुचनांच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०९०११८१५२३०५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
उप सचिव, महाराष्ट्र शासन